जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

‘लव्ह जिहाद’ आणि ‘गोवंश हत्ये’ बाबत का बोलत नाही-वहाडणे

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
 
  कोपरगाव शहरातील निवडणुकीत भाजपचे म्हणून स्वतःच्याआरत्या ओवाळणारे नेते शहर आणि तालुक्यात होणाऱ्या ‘ लव्ह जिहाद’ आणि ‘ गोवंश हत्ये’ बाबत का बोलत नाही त्यांना आपल्या मतांची काळजी असल्याने ते असे करणार नाही त्यांना केवळ कोपरगाव नगरपरिषद ताब्यात घेऊन आपल्या तुंबड्या भरावयाच्या असल्याने ते असे करणार नाही असा आरोप निष्ठावान भाजपचे अपक्ष उमेदवार विजय वहाडणे यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.

  

“नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या आधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याशी संपर्क साधला असल्याचे सांगून टाकले आहे.आपण त्यांना याबाबत प्रश्न विचारला होता आपल्याला राज्यात सर्वाधिक मते मिळवूनही आपण केवळ आठ हजार मते मिळवणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी कशी दिली असा सवाल केला आहे.त्यावर त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते”-विजय वहाडणे,अपक्ष उमेदवार,निष्ठावान भाजप.

   कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक आता शेवटच्या टप्यात आली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणावर झडत आहे.त्यात आता पाणी चोरी,भ्रष्टाचार आदींवर आरोप होऊ लागले असून थेट हल्ले होऊ लागले आहे.मर्यादा ओलांडल्या जात आहे.विशेष म्हणजे या सर्व एकाच झाडाच्या फांद्या असून ते निवडणुकीत एकमेकावर आरोपांची कुऱ्हाड चालवताना दिसत आहे.त्यामुळे हे आरोप किती दिवस चालणार आहे.आगामी निवडणुकीची वीस डिसेंबर तारीख संपली की पुन्हा एका ताटात जेवले तर आश्चर्य वाटणार नाही अशी स्थिती आहे.अशा वेळी हा आरोप माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी वसंत स्मृती येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

 

“आपल्या पंचेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीत अनेक मित्र मुस्लिम आहेत.त्यात त्यांनी कादर शेख,शब्बीर पठाण,आदी अनेक परिवार आपल्याशी जोडलेले आहे याची आठवण करून दिली आहे.माजी नगरसेवक महमूद सय्यद,आरिफ कुरेशी आदी प्रभागात जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकासकामे केली असल्याची आठवण करून दिली आहे.१५ वर्षापूर्वी गरीब मुस्लिम व्यापाऱ्याला त्रास दिला त्याला न्याय देण्यासाठी म्हणून आपण जेलमध्ये गेलो होतो”-विजय वहाडणे,माजी नगराध्यक्ष.

   त्यावेळी पुढे बोलताना विजय वहाडणे म्हणाले की,”सर्वच राजकीय पक्षाचे नेते लाडक्या बहिणीचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करत आहेत.मात्र ‘ लव्ह जिहाद’ बाबत शहरात जो नंगा नाच चालू आहे त्यावर ते अजिबात बोलणार नाही हे आम्हाला माहिती आहे.अनेक हिंदूच्या मुली राजरोस पळविल्या जात आहे.त्यांना बाटवले जात आहे.मात्र भाजप मध्ये आलो याचे ढोल बडवून सांगणारे कोपरगाव शहरातील नेते (कोल्हे गट ) एक शब्द बोलणार नाही हे आम्हाला माहिती आहे.शिवाय शिवरायांच्या राज्यात मोठ्या प्रमाणावर गोहत्या होत आहे.शिवरात्रीच्या दिवशी येथे गटारीद्वारे गोदावरीत रक्ताचे पाट वाहत आहे.मात्र या आगंतुक भाजपच्या मंडळींना ही गोवंश हत्या दिसणार नाही.त्यांनी स्वतःच्या डोळ्यावर कातडे ओढून घेतले आहे.जिल्ह्यातील संत-महंत याबाबत आवाज उठवत आहे.मात्र या संधिसाधू नेत्याना त्यांचे बोल ऐकू येणार नाही.आपण हे कठोरपणे बोलतो याचा अर्थ आपण मुस्लिम विरोधी आहोत असा अजिबात नाही ज्या अपप्रवृत्ती आहे त्यावर आपला हल्ला आहे.अनेक मुस्लिम कुटुंबातील अल्पवयीन मुलांच्या ताब्यातून आपण सोडवून दिले आहे याची आठवण त्यांनी करून दिली आहे.शिवाय आपले आपल्या पंचेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीत अनेक मित्र मुस्लिम आहेत.त्यात त्यांनी कादर शेख,शब्बीर पठाण,आदी अनेक परिवार आपल्याशी जोडलेले आहे याची आठवण करून दिली आहे.माजी नगरसेवक महमूद सय्यद,आरिफ कुरेशी आदी प्रभागात जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकासकामे केली असल्याची आठवण करून दिली आहे.१५ वर्षापूर्वी गरीब मुस्लिम व्यापाऱ्याला त्रास दिला त्याला न्याय देण्यासाठी म्हणून आपण जेलमध्ये गेलो होतो.मात्र आज पुतणा मावशीचे प्रेम दाखवून मतदारांना भुलविण्याचे काम सुरू आहे.शिवाय आपल्या कार्यकाळात आपण भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांचे नाव नगरपरिषद रुग्णालयाला नाव दिले याचे स्मरण करून दिले आहे.त्यामुळे खरे हिंदुत्ववादी कोण आहे हे नागरिकांनी ओळखावे व त्याचा विचार करून आपले मते द्यावी असे आवाहन केले आहे.

विजय वहाडणे.

   मात्र वर्तमानात अनेक जण भाजपचे बुजगावणे घालून मतदारांना भुलविण्याचे काम करत आहे.त्याला बळी पडू नका.छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतिकारक राघोजी भांगरे,घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदींच्या अनुयायांनी विचार करून मतदान करायला हवा,काळ कठीण आहे त्यामुळे सावध रहा,नजिकचे धाबे,हॉटेल हाऊसफुल आहे.यातून समाजाला मोठा धोका असल्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे.

   दरम्यान त्यांनी त्यांच्या कार्यकाळात आलेल्या अडचणींबाबत माजी आ.स्नेहलता कोल्हे यांना जबाबदार धरून आपल्या काळात भाजपचे सरकार असताना निधी मिळून दिला नाही असा आरोप केला आहे.याचे आपल्याला कधीही विस्मरणे होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी व रस्त्यातील काटा दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून पाहिला होता याचे स्मरण करून दिले आहे.त्यासाठी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या आधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याशी संपर्क साधला असल्याचे सांगून टाकले आहे.आपण त्यांना याबाबत प्रश्न विचारला होता आपल्याला राज्यात सर्वाधिक मते मिळवूनही आपण केवळ आठ हजार मते मिळवणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी कशी दिली असा सवाल केला आहे.त्यावर त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते.शिवाय आपल्या कार्यकाळात आपण शहर विकासाचे अनेक प्रस्ताव देऊनही आपल्याला निधी का दिला नाही ? असा सवाल केला असल्याचे सांगितले आहे व त्यात कोणाची अडचण होती असे विचारले आहे.मात्र त्यावर त्यांनी साळसूदपणे ,”त्यावेळी कोणी आडकाठी आणली ? असा आश्चर्यकारक बनाव केला असल्याचे सांगून टाकले आहे.काल झालेल्या जाहीर सभेत तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट भाजपचे नगराध्यक्ष निवडणून आले तर मोठ्या प्रमाणावर निधी देऊ असे जाहीर करून पक्षाला छोटे केले आहे.ही त्यांची मोठी चूक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देऊन विरोधी नगरपरिषदा आल्या तर त्यांना तुम्ही निधी देणार नाही का ? असा तिखट सवाल केला आहे.त्यातून तुम्ही लोकशाही पायदळी तुडवत आहे असा आरोप केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close