निवडणूक
शहरात आपण ०५ हजार घरे मंजूर करून देऊ-…या मंत्र्यांचे आश्वासन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्य सरकारने आता तुकडेबंदी कायदा उठवला आहे.त्यामुळे आता घराच्या नोंदी लावण्याचे काम सरकार करणार आहे याशिवाय वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकच्या करून देणार असून मोकळे प्लॉट असतील तर एन.ए.करण्याची गरज ठेवलेली नाही,राज्यात नरेंद्र मोदी सरकारने ३० लाख घरे दिले आ
असून त्यातील कोपरगाव शहरात आपण ०५ हजार घरे मंजूर करून देऊ असे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोपरगावकरांना दिले आहे.त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

“चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जामंत्री असताना त्यांनी १३२ के.व्हि.ए.उपकेंद्र मंजूर केले आहे.या शिवाय ग्रामीण भागात चार उपकेंद्रे मंजूर केले असल्याचे कौतुक केले आहे.नगरपालिका क्षेत्रात अनेक प्रलंबित कामे आहे.त्यांच्या काळात मार्गी लावतील असा विश्वास व्यक्त केला आहे.लाडकी बहीण योजना राबवली,राज्य परिवहन मंडळाच्या बस प्रवासात महिलाना ५० टक्के प्रवास सवलत दिली होती”-स्नेहलता कोल्हे,माजी आमदार, कोपरगाव.
कोपरगाव नगरपरिषद निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहचत असून भाजपने (कोल्हे गट) पुर्ण शक्तिनिशी आपला सहभाग नोंदवला असून आज दुपारी ५.४५ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी या भाजपच्या प्रचार सभेसाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,माजी सभापती सुनील देवकर,विजय आढाव,माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,दिलीप दारुणकर,केशव भवर,विजय वाजे,दत्तोबा जगताप,उमेदवार पराग संधान,संतोष गंगवाल आदीं प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

“राज्यातील नगरपरिषदा,महानगरपालिकांच्या निवडणूका या स्थानिक नेत्यांच्या नशीबाच्या नाही तर त्या देशाचे पंतप्रधान यांच्या विविध ४८ योजना सामान्य माणसापर्यंत पोहचवण्याची व संकल्पूर्ती करण्याची आहे व विकासाचा संकल्प करण्याची आहे.सन -२०४७ च्या प्रगत विकास आराखड्याची व भारत देशाच्या विकासाची आहे”-चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्री,महाराष्ट्र राज्य.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”राज्यातील महिला बचत गटांच्या नावावर एक लाख रुपयांचे अनुदान मिळवून देणार आहे.शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याचे आवाहन केले होते.ते फडणवीस मुख्यमंत्री असताना खरे केले आहे.पुढील पाच वर्षे वीज बिल येणार नाही.कोपरगाव तालुक्यातील गावाना सौर ऊर्जा निर्माण करून देणार आहे.वीज केवळ प्रति वॅट ०६ रुपयांनी दराने देणार आहे.१०० युनिटपेक्षा कमी वापर करणाऱ्यांना पंतप्रधान सौर घर योजना राबवून ०५ हजार नागरिकांना सौर ऊर्जा देऊ असे आवाहन केले आहे.राज्य सरकारने आता तुकडेबंदी कायदा उठवला आहे.त्यामुळे आता घराच्या नोंदी लावण्याचे काम करणार आहे.वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकच्या करून देणार आहे.प्लॉट असतील तर एन.ए.करण्याची गरज नाही असे काम करून दिले आहे.

“विधी मंडळात चांगले काम करणाऱ्या आमदारांचे सर्वेक्षण करण्याचे काम करण्यास सांगितले होते.त्यात माजी आ.स्नेहलता कोल्हे यांना त्यांच्या कामाला निवडून दिले होते.ही माणसे आजही काम करत असल्याचे सांगितले आहे.देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.सरकार सामान्य माणसाच्या विकासाला बांधील आहे.राज्यातील नगरपरिषदा,महानगरपालिकांच्या निवडणूका या कोल्हेंच्या नशीबाच्या नाही तर त्या देशाचे पंतप्रधान यांच्या विविध ४८ योजना सामान्य माणसापर्यंत पोहचवण्याची व संकल्पूर्ती करण्याची आहे व विकासाचा संकल्प करण्याची आहे.२०४७ चा भारत देशाच्या विकासाची आहे.विकास नाम्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी सरकार देणार आहे.विकास आराखडा मंजूर करण्याची जबाबदारी आपल्यावर असून आपण स्वतः मुख्यमंत्री यांची सही घेऊन देऊ असे आश्वासन उपस्थिताना दिले आहे.राज्य सरकारने आता तुकडेबंदी कायदा उठवला आहे.त्यामुळे आता घराच्या नोंदी लावण्याचे काम करणार आहे.वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकच्या करून देणार आहे.प्लॉट असतील तर एन.ए.करण्याची गरज नाही असे काम करून दिले आहे.राज्यात नरेंद्र मोदी सरकारने राज्यातील नागरिकांना ३० लाख घरे दिले आहे.कोपरगाव शहरात आपण ०५ हजार घरे मंजूर करून देऊ असे आश्वासन दिले आहे.सरकारने आगामी काळात नक्षा योजनेत शहरातील घरांची मोफत मोजणी करून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.शहरातील उपनगरातील घराची यादी करून द्या प्लॉट वाटून देतो असं आश्वासन दिले आहे.कोपरगाव शहर विकासाची चार चाकाची गाडी निवडून द्या तरच विकासकामे होतील.असे सांगून त्यांनी शेवटी त्यांनी कमळ,कपबशी आणि छत्री असलेल्या सर्व ३१ उमेदवारांना निवडून द्या असे सर्वांची नावे घेऊन आवाहन केले आहे.कोल्हे परिवार आपल्यासाठी सामाजिक काम करत आहे.त्यांना साथ द्या असे सांगितले आहे.

यावेळी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.त्यात त्यांनी म्हटले आहे,की,”चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जामंत्री असताना त्यांनी १३२ के.व्हि.ए.उपकेंद्र मंजूर केले आहे.या शिवाय ग्रामीण भागात चार उपकेंद्रे मंजूर केले असल्याचे कौतुक केले आहे.नगरपालिका क्षेत्रात अनेक प्रलंबित कामे आहे.त्यांच्या काळात मार्गी लावतील असा विश्वास व्यक्त केला आहे.लाडकी बहीण योजना राबवली,राज्य परिवहन मंडळाच्या बस प्रवासात महिलाना ५० टक्के प्रवास सवलत दिली होती.औद्योगिक वसाहतात गारमेंट् सेंटर सुरू केले आहे.पराभव झाल्यावर दुप्पट वेगाने काम करत असतो असे सांगितले.आपल्या तोंडी नाही ते वाक्य घालून टीका जात आल्याचा कोयटे यांचे नाव न घेता टीका केली आहे.धरणातून पाणी देण्याचे काम ठरवले होते.मात्र विरोधकांनी त्यास खोडा घातल्याचा आरोप केला आहे.

सदर प्रसंगी संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे त्यात त्यांनी सावळीविहिर येथील सीमारेषेवर असलेल्या औद्योगिक वसाहत कोपरगाव तालुक्यातील औद्योगिक वसाहत म्हणून समजली जावी.पश्चिमेचे पाणी वळवावे,झोपडपट्टीधारकांना जागा मिळून त्यांना सातबारा उतारे मिळावे असे आवाहन केले आहे.विश्वासनाम्यात आम्ही ५० टक्के घरपट्टी व नळपट्टी माफ करणार आहे.ज्यांचे पाल्य नगरपरिषद शाळेत आहे. त्यांची २० टक्के घरपट्टी माफ करणार असल्याचे सांगून आम्ही केवळ विकासावर बोलणार आहे.विरोधकांवर टीका करणार नसल्याचे सांगितले आहे.१७० कुटुंब अतिक्रमणात राहतात त्याच्या नावावर सातबारा उतारे करावे असे आवाहन महसूल मंत्री बावनकुळे यांना केले होते.
सदर प्रसंगी सूत्रसंचालन किरण ठाकरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी मानले आहे.



