निवडणूक
मतदारांचा वाढता पाठिंबा विजयात रूपांतरित होणार-…यांचा दावा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आगामी काळात भाजपा मित्रपक्षांना मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता आगामी काळात त्याचे रूपांतर नक्कीच विजयात होईल असा ठाम विश्वास भाजपा मित्रपक्ष लोकसेवा आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी एका कॉर्नर सभेत बोलताना व्यक्त केला आहे.

“प्रामाणिक आणि पारदर्शक कारभार हे धोरण घेऊन काम करण्याचा आमचा हेतू आहे.जनतेच्या हक्कासाठी आणि प्रश्नासाठी लढणे यासाठी आम्ही सर्व प्रभागातील उमेदवार कार्यरत असतो यामुळे जनतेत आम्हाला प्रचारा दरम्यान सकारात्मक वातावरण अनुभवण्यास मिळत आहे”-पराग संधान,नगराध्यक्ष पदाचे उमेदवार,भाजप व मित्रपक्ष आघाडी.
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावसह १२ पैकी ०४ नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या असून ज्या नगरपंचायतींमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे त्या त्या ठिकाणी या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असून त्याची निवडणूक आता आगामी २० डिसेंबर रोजी संपन्न होत आहे.परिणामी राज्यात नगरपरीषद निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुन्हा एकदा नव्या दमाने सुरू झाली असून त्याचा पहिला टप्पा सुरू झाला असून त्यात प्रचार वेगाने होत असताना दिसुन येत आहे.त्यात भाजपा मित्रपक्ष लोकसेवा आघाडीने पहिल्या टप्प्यात प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.त्यांच्या शहराच्या विविध ठिकाणी प्रचारासाठी कॉर्नर सभा संपन्न होत असून त्यात हे प्रतिपादन केले आहे.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”प्रामाणिक आणि पारदर्शक कारभार हे धोरण घेऊन काम करण्याचा आमचा हेतू आहे.जनतेच्या हक्कासाठी आणि प्रश्नासाठी लढणे यासाठी आम्ही सर्व प्रभागातील उमेदवार कार्यरत असतो यामुळे जनतेत आम्हाला प्रचारादरम्यान सकारात्मक वातावरण अनुभवण्यास मिळत असल्याचा त्यांनी दावा केला आहे.यावेळी पुढे म्हणाले की,”रस्ते,धूळ,आरोग्य,पाणी,स्वच्छता यासह पर्यटन आणि सुशोभीकरण असे अनेक प्रश्न आणि कामे करण्यासाठी सादर केलेला विश्वासनामा लोकप्रिय ठरला असून अनेक नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले असल्याचा त्यांनी दावा केला आहे.दरम्यान पहिल्या टप्प्यात बरेच मतदार आमच्याशी जोडलेले असून त्याचा परिपाक म्हणून आगामी काळात आमच्या आघाडीच्या विजयाचा गुलाल मतदार आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर टाकतील असा विश्वास संधान यांनी शेवटी व्यक्त केला आहे.



