निवडणूक
भाजपचा जनसंपर्क उपयुक्त ठरणार -…या उमेदवाराचा दावा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात भाजप आणि मित्रपक्षांनी मतदारांत आघाडी राखली आहे.पहिल्या टप्प्यातील कार्यक्रम पुढे गेल्याने विरोधकांना पराभवाची कारणे शोधण्याची आणि पिछाडी काहीशी सावरण्याची संधी मिळाली असली,तरी जनतेशी असलेला थेट संपर्क त्यासाठी उपयोगी ठरत असून यावेळी नगरपरिषदेची सत्ता मतदार आमच्याकडे सोपवणार असल्याचा दावा भाजप प्रभाग एकचे उमेदवार वैभव आढाव यांनी केला आहे.

“कोपरगाव नगरपरिषद हद्दीत असलेल्या प्रभाग क्रमांक १ मध्ये मतदारांचा विशेष उत्साह दिसून आला आहे.माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्यामुळे या भागाचा शहरामध्ये समावेश (हद्दवाढ) करण्यात आला आणि त्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा,सांडपाणी व्यवस्था,उद्याने आदी मूलभूत कामांसाठी मोठा मार्ग मोकळा झाला आहे”-वैभव आढाव,उमेदवार प्रभाग क्र.एक.
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावसह १२ पैकी ०४ नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या असून ज्या नगरपंचायतींमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे त्या त्या ठिकाणी या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असून त्याची निवडणूक आता आगामी 20 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे.परिणामी राज्यात नगरपरीषद निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुन्हा एकदा नव्या दमाने सुरू झाली असून त्याचा पहिला टप्पा सुरू झाला असून त्यात प्रचार वेगाने होत असताना दिसुन येत आहे.दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळणार असून आगामी २० डिसेंबरला सर्व उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदासाठी पराग संधान विक्रमी मतांनी विजयी होतील,असा विश्वास वैभव आढाव यांनी व्यक्त केला आहे.विकास आणि स्वच्छ कारभार हीच भूमिका भाजप कोल्हे गटाची असून सातत्यपूर्ण जनसंपर्क या दोन गोष्टींमुळे शहरात सकारात्मक वातावरण अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
प्रभाग क्रमांक १ मध्ये मतदारांचा विशेष उत्साह दिसून आला आहे.माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्यामुळे या भागाचा शहरामध्ये समावेश (हद्दवाढ) करण्यात आला आणि त्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा,सांडपाणी व्यवस्था,उद्याने आदी मूलभूत कामांसाठी मोठा मार्ग मोकळा झाला आहे.या भागाने मागील अनेक वर्षांपासून विकासासाठी प्रतीक्षा केली होती.आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रभागाला ठोस निधी मिळावा यासाठी भाजप-मित्रपक्ष प्रयत्न करत आहे.
यामुळे प्रभाग क्रमांक सह सर्व 15 प्रभाग मधील मतदारांनी “विकासासाठी साथ” देण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.आगामी पुढील पाच वर्षे कोपरगावचा दर्जा उंचावण्यासाठी भाजप-मित्रपक्ष हेच सक्षम नेतृत्व असल्याचा विश्वास मतदार दाखवत असल्याचे वैभव आढाव यांनी शेवटी म्हटले आहे.



