निवडणूक

उमेदवारांना निवडून द्या,कोपरगावची बारामती करणार -…आश्वासन

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे यांचेसह पंधरा प्रभागातील तीस उमेदवार निवडून द्या आपण कोपरगाव शहराचे रूपांतर बारामती शहरात करू असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताना दिसत आहे.

“कोपरगाव तालुक्यात काही दिवसांपुर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एक बालक व एक महिला असे दोन बळी गेले आपण त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतो.त्यावेळी आ.काळे यांनी फोन केला मात्र मी स्वीय सहाय्यक फोन घेण्यास नकार दिला असता आ.काळे यांनी फोन घ्यावा लागेल कारण नागरिकांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन करून आपल्या घटनेचे गांभीर्य दाखवून दिले होते.त्यावेळी आपण साउंड ओपन करून सदर बैठकीत नगर येथील जिल्हाधिकारी यांना फोन करून तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले होते”-अजित पवार,उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.

    राज्याचे लक्ष लागून असलेल्या 288 नगरपरिषदांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत.कोपरगाव नगरपरिषद निवडणूक दिसानजिक वेगळेवेगळे रंग भरत आहे.येथे भाजप आघाडीसह राष्ट्रवादी,शिवसेना उबाठा,शिवसेना एकनाथ शिंदे,आदींचा सामना होत आहे.त्यासाठी गोळा बारुद ठासून भरण्याचे काम जोरात सुरू आहे.भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली असताना त्यानंतर आता त्यावर कडी करण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने उचल खाल्ली होती.त्यांनी आज दुपारी 4.30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा डॉ.आंबेडकर मैदानावर लावली होती.त्यावेळी येथील मैदानावर नागरिकांनी गर्दी केली होती.

कोपरगावचे आ.आशुतोष काळे हे बोलताना दिसत आहे.

कोपरगावातील नेत्यांना विस्थापितांची उबळ !
     आ.काळे यांनी आपल्याला सभास्थानी येतानाच सन-2011 साली 10 मार्च रोजी जवळपास 02 हजार विस्थापितांना विस्थापित व्हावे लागले असल्याचे सांगून ते विस्थापितांबाबत सहानुभूती दाखवत मते मिळविण्याचा फंडा अवलंबला असून विस्थापितांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे गेली सहा वर्षे त्यांना या विस्थापितांच्या समस्यांची आठवण का आली नाही ? असा सवाल निर्माण झाला आहे.त्यावर विशेष म्हणजे अजित पवार यांनीही मधाचे बोट चाटवले असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.या पूर्वी ईशान्य गडाच्या एका स्वर्गीय नेत्याने सन-2011 च्या निवडणुकीत बस स्थानकाजवळ धारणगाव रोडलगत रांगोळ्या काढून याच विस्थापितांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याची जखम पुन्हा भळभळळी आहे.

    सदर प्रसंगी कोपरगाव विधानसभेचे आ.आशुतोष काळे,माजी आ.आशुतोष काळे,राष्ट्रवादीचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे,माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,महानंदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,संभाजी काळे,युवा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा आढाव,संदीप कोयटे,जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे,स्वाती कोयटे,माजी नगरसेवक दिनार कुदळे,डॉ.अजेय गर्जे,युवा आघाडीचे अध्यक्ष नवाज कुरेशी आदीसह सर्व उमेदवार आणि त्यांचे समर्थकासह मोठ्या संख्येने नागरिक,महिला उपस्थित होत्या.

   त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”आपण राज्यात बारामती नगरपरिषदेत परिवर्तन घडवले आहे.त्याठिकाणी मोठी कामे केली आहे.पण एक बारामती बनवून उपयोग नाही राज्यातील अनेक शहरे आपल्याला पायाभूत सेवा,रस्ते,पाणी,वीज,स्वच्छतागृहे,पार्किंगची व्यवस्था,मुलींचे शिक्षण,कचरा एकत्रीकरण,विलगीकरण,आरोग्य करून हे शहर स्वयंपूर्ण करावयाचे आहेत.पण शहरातील मोकाटे कुत्रे,जनावरे आदींचा बंदोबस्त करावयाचा आहेत.पण निवडणून येणाऱ्या नगरसेवकानी आणि नगराध्यक्षांनी मिशन परिवर्तन मधून आगामी शंभर दिवसाचा कार्यक्रम ठरवून घ्या आणि त्याप्रमाणे कामे करा.पहिल्या शंभर दिवसात एक हजार वृक्षांची लागवड करा,त्यानंतर एक वर्षाचा कार्यक्रम ठरवून उद्दिष्टे ठेवून कामे करा तरच जनतेला न्याय देऊ शकलात असे मला वाटेल.आ.काळे यांनी आपल्याला सभास्थानी येतानाच 2011 साली 02 हजार विस्थापितांच्या समस्या सांगितल्या आहेत.त्याबाबत आपण नक्की निर्णय करून त्या समस्या सोडून दाखवू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.आपण भूमिगत गटारीसाठी 280 कोटी रुपये दिले आहे.अशुद्ध पाण्याचे शुद्धीकरण प्रकल्प देऊन त्यापासून उत्पन्न मिळवता येईल असे आश्वासन दिले आहे.आपल्या पस्तीस वर्षाच्या कालखंडात आपण जनतेत राहून कामे करतो.त्यामुळे आपण शब्दाचे पक्के आहोत.पिंपरी चिंचवड या ठिकाणी परिवर्तन काय असते ते पाहून या.या ठिकाणी राज्यभरातून तरुणांना उद्योग आणि रोजगार उपलब्ध होत आहे.कोणीही उपाशी राहत नाही.काही लोक झोपडपट्टीत राहतात त्यांच्या साठी आपण उद्योग कंपन्यांना जो नफा मिळतो त्या सी.एस.आर.फंडातून घरे बांधून दिली आहे.शहर झोपडपट्टीमुक्त केले आहे.आपण अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत.त्यामुळे खोटे बोलत नाही.दरवर्षी इंदोर शहर देशात पहिलं क्रमांक मिळवत आहे.त्याचा अभ्यास करून आपल्याला कोपरगाव शहर आदर्श करावे लागणार आहे.नगरपालिका हद्दीत असलेल्या मोकळ्या जागेतील ठिकाणी वृक्ष लागवड करून शहराचे सौंदर्यीकरण करावे लागणार आहे.शहरातील प्राचीन स्थळांचा विकास करून पर्यटकांना आकर्षित करावयाचे आहे.शहरातील नाल्याचे प्रवाह सुरळीत करण्यासाठी वीस कोटींचा निधी मंजूर केला आहे.पाण्याच्या पाच क्रमांकाचे तलावाचे काम,जॉगिंग ट्रॅकचे काम,इनडोअर गेम हॉल तातडीने पूर्ण करायचे आहे.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव तालुक्यात काही दिवसांपुर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एक बालक व एक महिला असे दोन बळी गेले आपण त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतो.त्यावेळी आ.काळे यांनी फोन केला मात्र मी स्वीय सहाय्यक फोन घेण्यास नकार दिला असता आ.काळे यांनी फोन घ्यावा लागेल कारण नागरिकांनी ‘ रास्ता रोको ‘ आंदोलन करून आपल्या घटनेचे गांभीर्य दाखवून दिले होते.त्यावेळी आपण साउंड ओपन करून सदर बैठकीत नगर येथील जिल्हाधिकारी यांना फोन करून तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले होते अशी आठवण करून दिली आहे.राज्यात 288 नगरपरिषदेच्या निवडणुका सुरू असून सर्व ठिकाणी आपले उमेदवार आपण दिले आहे.तर सर्व चांगले असल्याचे त्यांनी सांगून कोपरगावसह राज्यातील सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे.त्यावेळी त्यांनी उमेदवाराचे नाव व फोटो पाहून मतदान करा चूक करू नका असे आवाहन केले आहे.

   कोपरगावचे आ.आशुतोष काळे विधासभेत अनेक प्रश्न उपस्थित करतात.बऱ्याच वेळा माझ्यावर (प्रमाणे) दादागिरी करतात व त्यांच्या मतदार संघाची कामे करून घेतात.कोपरगाव येथील राष्ट्रवादीचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे हे अनुभवी नेतृत्व व चांगला चेहरा असून सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन चालणारे आहेत.त्यांनी समता पतसंस्था आणि राज्य पतसंस्था फेडरेशनचे माध्यमातून संघटना केली असून सहकाराच्या समस्या सोडवल्या आहेत.त्यांच्या कामाचा तुम्हाला कोपरगाव शहराच्या विकासाला नक्कीच लाभ होईल.

    सदर प्रसंगी प्रास्तविक आ.आशुतोष काळे यांनी केले तर उपस्थिताना पद्माकांत कुदळे,कृष्णा आढाव आदींनी मनोगत व्यक्त केले आहे.तर सूत्रसंचालन रमेश गवळी यांनी केले आहे.तर उपस्थिताचे आभार शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close