निवडणूक

शहर विकासासाठी स्वाभिमानी नेतृत्व आवश्यक-वहाडणे

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पक्षांकडून उमेदवारी प्राप्त झालेले उमेदवार अर्ज माघारीनंतरच चिन्हासह प्रचार करत आहेत.मात्र अपक्षांना चिन्ह वाटप पाच दिवस उशिरा होत असल्याने त्यांचा प्रचार कालावधी कमी झाला आहे.प्रचारासाठी शेवटचे पाच दिवस शिल्लक असताना अपक्ष उमेदवार मतदारांच्या ओळखीचे असले तरी त्यांच्या चिन्हाची माहिती पोहोचविणे आव्हान ठरणारी असली तरी आपण कोपरगाव नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क साधला असून यात आपल्याला यश येणार असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षपदाचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नोंदवली आहे.

“माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपल्या कालखंडात पाच क्रमांकाच्या तलावाचे काम मार्गी लावले त्याशिवाय शहरातील रस्त्यांचे,गटारीचे काम मार्गी लावले आहे.पिण्याच्या पाण्याचा कालावधी कमी केला आहे.मात्र आता चार वर्षाचा कालखंड लोटला आहे.आता पुन्हा ही कामे मार्गी वेगाने लावण्यासाठी पुन्हा एकदा सत्ता त्यांच्या हाती दिली तर शहराची उर्वरित कामे आपण नक्की मार्गी लागतील”-किरण थोरात,युवा कार्यकर्ते,कोपरगाव.

    राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुका येत्या 02 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे.निवडणूक कार्यक्रमानुसार दि.26 रोजी म्हणजे कालच अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप झाले आहे.आता इच्छुक उमेदवारांना प्रचारासाठी आगामी 30 नोव्हेबर पर्यंत प्रचार कालावधी आहे.आता चार दिवसात त्यांना आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवावे लागणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख व चिन्ह वाटपाची तारीख यात मोठे अंतर असल्याचा परिणाम अपक्षांच्या प्रचारावर विपरीत झाला आहे.

प्रचार करताना नगराध्यक्षपदाचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे व त्यांचे सहकारी व त्यांना मिळणारा मोठा प्रतिसाद दिसत आहेत.

  

   मतदार मागील निवडणुकीत आपल्या परिचयाचा असले तरी आपली निवडणूक अपक्ष असल्याने आपले चिन्ह बॅट पोचवण्यात मोठी यातायात होत आहे.निवडणूक आयोगाने अपक्षांवर हा अन्याय केला असून आमच्या सारख्या सामान्य अपक्ष उमेदवारास नव्याने मिळालेले चिन्ह मतदारापर्यंत माहिती पोहोचविणे मोठी कसरतीचे ठरत आहे.राजकीय पक्षाच्या उमेदवारांच्या तुलनेत अपक्ष उमेदवारांकडे प्रचार यंत्रणा भक्कम नसते त्यातच आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी केवळ चार दिवसच मिळणार असल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.अपक्ष उमेदवारांमुळे दि.02 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीत मागील वेळेपेक्षा मोठी चुरस निर्माण झाली आहे.उमेदवारांकडून तीन प्राधान्यक्रमानुसार चिन्हांची मागणी घेतली जाते.एका चिन्हासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांची मागणी असल्यास सोडतीद्वारे अशा चिन्हाचे वाटप केले जाते.राजकीय पक्षाच्या उमेदवारांना प्रचारासाठी अधिक कालावधी मोठा मिळाला आहे.त्यात तुलनेत अपक्षांना आज चिन्हे मिळत असल्याने चार ते पाच दिवस प्रचारासाठी कमी पडतील,अशी चर्चा असतानाच अपक्षांनी आचारसंहितेचे नियम पाळून प्रचाराचे वेळपत्रक आखताना दिवसभरासह रात्रीचा दिवस करण्याची वेळ आली आहे.परिणामी आपण मतदारांच्या बैठका,वैयक्तिक गाठीभेटी,यावर भर दिला आहे.यातून प्रचारासाठी अधिकचा कालवधी मिळेल अस समीकरण साधले जात आहे.आपण सामान्य उमेदवार असून आपल्याकडे जेवणावळी,पार्ट्या आदींना स्थान नाही.पक्षीय उमेदवारांच्या तुलनेत अपक्षांकडे संसाधनांची व कार्यकर्त्यांची कमतरता असते याबाबत आपला अपवाद नाही.आपल्याकडे नागरिकांना देण्यासाठी प्रामाणिकपणा असून त्या बळावर ही निवडणूक संपन्न होत आहे.आपण सन -2016 पासून सन-2022 पर्यंत जनतेला कोणताही मोबदला न घेता जनसेवा केली आहे.आपल्या कालावधीत आपण ध्वजारोहणाचा मानसन्मान स्वतःकडे न घेता तो जणसामान्यांना,आरोग्य,स्वच्छता कर्मचारी आदींना दिला आहे.ठेकेदारांना अभय न देता कामे वेगाने करून दिली आहे.आपपरभाव न दाखवता सर्वांना समान न्याय दिला आहे.आपल्या भोवती ठेकेदारांचे कोंडाळे अथवा दलाल कधीही दिसले नाही.भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी खा.स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम केले आहे.पक्षाने आपल्याला न्याय दिला नाही मात्र आपणाला जनतेनं मागील वेळी न्याय दिला आहे.यावेळीही त्याचे फळ आपल्याला नक्कीच भेटणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

   आपण आपल्या कालखंडात पिण्याचे पाण्याचा पाच क्रमांकाच्या तलावाचे काम मार्गी लावले त्याशिवाय शहरातील रस्त्यांचे,गटारीचे काम मार्गी लावले आहे.पिण्याच्या पाण्याचा कालावधी कमी केला आहे.मात्र आपला कालखंड उलटून आता चार वर्षाचा कालखंड लोटला आहे.आता पुन्हा ही कामे मार्गी लावण्यासाठी पुन्हा एकदा सत्ता आपल्या हाती दिली तर शहराची उर्वरित कामे आपण नक्की मार्गी लावू असा विश्वास माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केला आहे,आपल्याकडे कोणतीही साधने प्रचारासाठी उपलब्ध नाही गाड्या-घोड्यांचा डौल उपलब्ध नाही.मात्र या विरुद्ध साखर सम्राटानी आपल्या हिताचे आणि दोन्ही गडावरून काम करण्यास सहाय्य करणाऱ्या उमेदवारांची निवड केली आहे.जनतेला आता यावर निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

  आपल्या कालखंडात यांनी प्रत्येक टेबलाजवळ आपले स्वीय सहाय्यक नेमून खबरा घेतल्या होत्या.मात्र पाच वर्षाच्या कालखंडात त्यांना कोणताही आरोप करता आला नाही.आता तर त्यांच्या हाती सत्तेची दोरी मिळाली तर सामान्य माणसाला नगरपरिषदेत जाण्याची आणि भेटण्याची सोय राहणार नाही.नगरपरिषदेच्या सर्व किल्ल्या ईशान्य आठवा पश्चिम गडावर जातील असा इशारा त्यांनी दिला आहे.त्यामुळे स्वाभिमानी,निर्णयक्षम उमेदवार हवा आहे की स्वाभिमान गहाण ठेवणारा उमदेवार हवा आहे यावर जनतेने विचार करण्याची वेळ आली आहे.मतदारांनी या निवडणुकीत जर स्वतःला विकले तर त्यांचे आगामी काळात मोठे हाल होतील असे आपण मतदारांना सावध करत आहोत असेही विजय वहाडणे यांनी शेवटी म्हटले आहे.व आपण नक्कीच विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close