जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत रंगला तमाशा फड !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
 
   कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत आज नामनिर्देशन पत्र भरण्याच्या दुसऱ्या दिवशी माजी आ.कोल्हे गटाने आपला अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला असून अंदाजाप्रमाणे मागील निवडणुकीत पराभव पत्करलेल्या पराग संधान यांना पुन्हा एकदा संधी दिली असून कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांचे नातलग असणे नवीन,’ नातलग पॅटर्न’ उजवा ठरला असल्याचे उघड झाले आहे.आता या आगामी निवडणुकीत विधानसभेत माजी आ.कोल्हे गटाने काळे गटास केलेल्या मदतीची भरपाई आ.काळे गट करणार का ? असा सवाल निर्माण झाला आहे.दरम्यान आज कोल्हे गटाने आपल्या जवळपास 20 जागा जाहीर केल्या असून शिवसेनेला जवळ करत 04 जागांची खिरापत दिली असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे हा सेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे गटास मोठा दणका समजला जात आहे.

मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत दसऱ्याच्या दिवशी युवराज विवेक कोल्हे यांनी तहसील मैदानावर आ.आशुतोष काळे यांनी आपल्या पाच वर्षाच्या काळात 03 हजार 300 कोटींचा विकास नव्हे तर भ्रष्टाचार केला असा आव आणत आ.काळेंच्या विरूध्द घोषणा देत रावण जाळला होता.व आणि आगामी वीस दिवसात त्याच कोल्हेनी सर्व विसरून आ.काळे यांना गंगेच्या पावन पाण्यात स्नान घालून पवित्र करून घेत थेट मते दिली होती यातच सर्व काही आले.त्यामुळे आगामी काळात तमाशाचा दुसरा अंक पाहायला भेटला तर नवल वाटू देऊ नये इतकेच.

   राज्यातील नगरपरिषदांची निवडणुकीसाठी 02 डिसेंबरला मतदान होणार आहे.31 जानेवारीच्या आत सर्व निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत.त्या दिशेनं निवडणूक आयोगाने प्रवास सुरू केला असून काल दि.१० नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे.त्याची अंतिम मुदत-१७ नोव्हेंबर असून त्याची छाननीची तारीख-१८ नोव्हेंबर असून ते माघार घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर आहे.अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत-२५ नोव्हेंबर आहे.तर निवडणूक चिन्ह आणि अंतिम यादी- २६ नोव्हेंबर रोजी दुपारी जाहीर होणार आहे.तर माघार झाली नाही तर मतदानाचा दिवस-२ डिसेंबर मुक्रर करण्यात आला आहे.त्यामुळे सर्वच पक्ष आणि कार्यकर्ते कामाला लागले आहे.जोरजोराने ढोल ताशे बडवले जात असून रणभेऱ्या गर्जत आहे.कोपरगाव नगरपरिषद त्याला अपवाद नाही.इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्या जागेवर अनेक ओबीसी नेते आणि कार्यकर्ते इच्छुक आहे.त्यासाठी आता राजकीय घडामोडींना वेग आला असून आज माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या गटाने आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले असून इतर मागासांना वाटण्याच्या अक्षदा दाखवल्या असल्याचे उघड झाले आहे.अपेक्षेप्रमाणे त्यांनी आपले जवळचे समजले जाणारे पराग संधान यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे.मागील वेळी त्यांचा जोरदार पराभव झाला होता.मात्र यावेळी त्यांच्या अपेक्षा वाढल्या असून त्याला कारणही तसेच समजले जात आहे.कारण मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हे गटाने विद्यमान आ.आशुतोष काळे यांना (भाजपच्या ) राजकीय परिहार्यतेमुळे मनाविरुद्ध मदत करावी लागली होती.(की तडजोडीसाठी ) परिणामी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे जवळपास सव्वा लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले होते.त्यामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीत कोल्हे गटाची परतफेड करण्याची वेळ आता आ.काळे गटावर आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसत आहे.त्यामुळे आता वेळेआधीच त्यांनी उमेदवार जाहीर केल्याचे मानले जात आहे.व इच्छुक ओबीसींना अदखलपात्र करत जोरदार दणका दिला आहे.त्यामुळे आता आ.काळे गट तुलनेनं नगराध्यक्षपदासाठी दुबळा उमेदवार देण्याची मोठी शक्यता वाढली आहे.परिणामी आ .काळे गट व्यापारी आणि जातभाई नाकारतील असा लंगडा उमेदवार देण्याची शक्यता वाढली असून त्यातून कोल्हेंच्या उमेदवाराच्या विजयाची वाट सोपी होणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता भाजपचे निष्ठावान असलेले माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना पक्षाने केराची टोपली दाखवली असल्याचे उघड झाले आहे.भाजप आता पूर्वीची राहिली नाही त्यांना निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज उरली नाही हे पुन्हा एकदा उघड झाली असून ते आता काँग्रेसी संस्कृतीचे इमानदार पाईक बनले असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,’यावेळी आम्ही आमच्या सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणार” हे आश्वासन सपेशल फोल ठरले आहे.त्यांनी आपल्या निष्ठावानांचा पोपट केला आहे.तर त्यांना मद्यसम्राट आणि साखर सम्राट,आणि थैलिशहा यांना लाल कार्पेट टाकून ते आपल्याला अधिक प्रिय असल्याचे उघड केले असून त्याचा फटका या निवडणुकीत बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तविण्यात येत आहे.

आज माजी आ.कोल्हे गटाने जाहीर केलेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.नीताताई गिरमे,वैभव आढाव,राहुल खरात,दिपक जपे,जनार्दन कदम,दिपाली संजय उदावंत,वैशाली वाजे,पद्माताई योगेश बागुल,विक्रम सातभाई,प्रसाद बालासाहेब आढाव,सुवर्णाताई अजमेरे,दत्तू पगारे,फरदीन कुरेशी,जितेंद्र रणशूर,संदीप देवकर,रवींद्र कथले,वैशाली गणेश आढाव,स्वप्निल मंजुळ,फिरोज पठाण,सुरेखा विनोद राक्षे,अनिल उर्फ कालू आव्हाड आदींचा समावेश आहे.

   दरम्यान तीच बाब उबाठा सेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांना लागू झाली असून त्यांनी आपला महत्वाचा वेळ आंबा सोडून बाभळीला दगड मारण्यात घालवला असल्याचे उघड झाले आहे.ज्या कोल्हे गटाबरोबर त्यांनी युती करण्याचे योजले होते.तो कोल्हे गट आता बराच पुढें निघून गेला असून आता भाजप आणि उबाठा शिवसेना याचे फाटले आहे याची जाणीव त्यांना होऊ नये हे दुर्भाग्य मानले पाहिजे.त्यांनी आपल्या सहकारी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसला तिष्ठत ठेवले होते हे बरे नव्हे ! परिणामी त्यांना आजच्या कोल्हे गटाच्या जागा वाटपात आपले बरेच नव्हे जवळपास चार ते पाच सहकारी गमवावे लागले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे त्यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला असल्याचे उघड उघड दिसून येत आहे.कोल्हे आणि काळे या पारंपरिक विरोधी समजल्या जाणाऱ्या गटांना आता सहकारी पक्षांची गरज उरली नाही.ते ऐन वेळी विरोधकापेक्षा एकमेकाची मदत करणेत आता धन्यता मानत आहे.मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत दसऱ्याच्या दिवशी युवराज विवेक कोल्हे यांनी तहसील मैदानावर आ.आशुतोष काळे यांनी आपल्या पाच वर्षाच्या काळात 03 हजार 300 कोटींचा विकास नव्हे तर भ्रष्टाचार केला असा आव आणत आ.काळेंच्या विरूध्द घोषणा देत रावण जाळला होता.व आणि आगामी वीस दिवसात त्याच कोल्हेनी सर्व विसरून आ.काळे यांना गंगेच्या पावन पाण्यात स्नान घालून पवित्र करून घेत थेट मते दिली होती यातच सर्व काही आले.दुसरी घटना गत 03 नोव्हेंबर 2025 रोजी रांजणगाव देशमुख येथील एका कार्यक्रमात बिपीन कोल्हे यांनी आपल्या पुढील युवराजाना सल्ला देताना,माजी नेते आणि मंत्री काळे कोल्हे यांनी जसे तालुक्याचे राजकारण सामंज्यस्याने केले तसेच तुम्ही करा “असा वडीलकीचा सल्ला दिला होता.आणि दोन दिवसात विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा आ.आशुतोष काळे यांना आगामी नगरपरिषदेवर झेंडा फडकविण्यासाठी चिखलफेक करत आ.काळेवर बेछूट आरोप केले होते.म्हणजे यांचे राजकारण आता राजकारण रहिले नसून ते आता एक चांगला तमाशा फड बनला म्हंटले तर वावगे ठरू नये किंबहुना काळू-बाळू पेक्षा नव्हे त्यापेक्षा सरस तमाशा ठरले असल्याचे उघड झाले आहे.आणि त्यांचेवर विश्वास ठेवणारे कोपरगाव शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते आणि मतदार मात्र महामूर्ख बनले असल्याचे उघड झाले आहे.

  

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हे गटाने विद्यमान आ.आशुतोष काळे यांना (भाजपच्या ) राजकीय परिहार्यतेमुळे मनाविरुद्ध मदत करावी लागली होती.(की तडजोडीसाठी ) परिणामी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे जवळपास सव्वा लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले होते.त्यामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीत कोल्हे गटाची परतफेड करण्याची वेळ आता आ.काळे गटावर आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसत आहे.

   दरम्यान आज माजी आ.कोल्हे गटाने जाहीर केलेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.नीताताई गिरमे,वैभव आढाव,राहुल खरात,दिपक जपे,जनार्दन कदम,दिपाली संजय उदावंत,वैशाली वाजे,पद्माताई योगेश बागुल,विक्रम सातभाई,प्रसाद बालासाहेब आढाव,सुवर्णाताई अजमेरे,दत्तू पगारे,फरदीन कुरेशी,जितेंद्र रणशूर,संदीप देवकर,रवींद्र कथले,वैशाली गणेश आढाव,स्वप्निल मंजुळ,फिरोज पठाण,सुरेखा विनोद राक्षे,अनिल उर्फ कालू आव्हाड आदींचा समावेश आहे.दरम्यान यातील पद्माताई योगेश बागुल,विक्रम संजय सातभाई,रवींद्र कथले,अनिल आव्हाड,दत्तू पगारे आदी पाच जण शिवसेनेने उमेदवार असल्याने माजी आ.कोल्हे यांनी सेनेला अध्यक्षपदाला झुलवून चांगलाच दणका दिला असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे आगामी जाहीर होणाऱ्या जागेत अजून किती दणका बसणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close