जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

…या नगरपरिषद निवडणुकीत होणार बंडाळी !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव नगरपरिषद निवडणूक तोंडावर आली असताना आता वेगवान घडामोडी घडू लागल्या असून कोपरगाव शहरात नगराध्यक्षपद आरक्षण निघाल्याने अनेक इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.त्यामुळे ज्यांना अपेक्षाभंग होण्याची भीती वाढली आहे त्यांनी आपला दबाव वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून आज सकाळी 10 वाजता माळी समाजाने बाळासाहेब मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली सदर उमेदवारी आपल्या समाजातील तरुण तथा नगर परिषदेचे माजी गटनेते विरेन बोरावके यांना मिळावी अशी मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान उबाठा शिवसेनेत भरत मोरे यांच्या रूपाने बंडाळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तर माजी नगराध्यक्ष बबनराव वाजे यांचे चिरंजीव दिपक वाजे यांनीही डोक्याला बाशिंग बांधून प्रचार सुरू केला आहे.त्याचा फटका कोल्हे गटास बसणार असे दिसत आहे.तर शिंदे सेनाही तयारीत असून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दंडाच्या बेटकुळ्या दाखवल्या आहेत.

    राज्यातील नगरपरिषदांची निवडणुकीसाठी 31 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.तर मतदानकेंद्र निहाय मतदार यादी 7 नोव्हेंबर 2025 ला जाहीर होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.31 जानेवारीच्या आत सर्व निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत.त्या दिशेनं निवडणूक आयोगाने प्रवास सुरू केला असून उद्या दि.१० नोव्हेंबर २०२५,अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे.त्याची अंतिम मुदत- १७ नोव्हेंबर असून त्याची छाननीची तारीख-१८नोव्हेंबर असून ते माघार घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर आहे.अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत-२५ नोव्हेंबर आहे.तर निवडणूक चिन्ह आणि अंतिम यादी- २६ नोव्हेंबर रोजी दुपारी जाहीर होणार आहे.
तर माघार झाली नाही तर मतदानाचा दिवस-२ डिसेंबर मुक्रर करण्यात आला आहे.त्यामुळे सर्वच पक्ष आणि कार्यकर्ते कामाला लागले आहे.कोपरगाव नगरपरिषद त्याला अपवाद नाही.इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्या जागेवर अनेक ओबीसी नेते आणि कार्यकर्ते इच्छुक आहे.मात्र अनेकांना याबाबत अपेक्षाभंग होण्याची भीती वाढली आहे.कारण प्रस्तापित नेत्यांना आपल्या खिशातील उमेदवार अथवा नात्यातील उमेदवार (खास वसुलीसाठी म्हणण्यापेक्षा खंडणीसाठी योग्य ठरेल) हवा आहे.त्यासाठी त्यांनी देव पाण्यात बुडवले आहेत.शहर विकासासाठी कोणालाही काही देणेघेणे नाही.त्यामुळे अनेकांच्या चिंतेत भर पडली आहे.कारण त्यांचा इतरांवर कोणावरही विश्वास राहिला नाही अशी स्थिती आहे.त्यामुळे इतर मागासवर्गीय नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे त्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे.अशीच एक बैठक आज माळी बोर्डिंग येथे बोर्डिंगचे अध्यक्ष बाळासाहेब पांढरे हे होते.त्यांच्यासह माळी समाजातील अनेक प्रमुख कार्यकर्ते त्या वेळी उपस्थित होते.त्यांची नावे उपलब्ध होऊ शकले नाही.त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे यांचे वतीने गटनेते पद भूषविले आहे.ते मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून परिचित असले तरी प्रसंगी कठोर होण्याची त्यांची तयारी असते.त्यामुळे ते या पदाला न्याय देऊ शकतात असा त्याचा डावा आहे.परिणामी विरेन बोरावके यांचे नाव समोर आले आहे.या आधी याच गटाकडून माजी नगरसेवक दिनार कुदळे यांचे नाव चर्चेत होते.मात्र त्यांची या (पवित्र मात्र वर्तमानात गलिच्छ ठरलेल्या ) क्षेत्रात येण्याची इच्छा दिसत नाही.शिवाय त्यांच्या व्यवसायाचा व्याप मोठा असल्याने त्यातून वेळ काढणे त्यांच्यासाठी अवघड मानले जात आहे.परिणामी राष्ट्रवादीचे गटनेते वीरेन बॉरावके याचे नाव समाजातून समोर आले असल्याचे मानले जात आहे.त्यांनी आपल्या कामाने गेली पाच वर्षे कोपरगाव नगरपरिषद गाजवली आहे.शिवाय ते सूसंस्कृत युवा राजकारणी म्हणून त्यांची ख्याती आहे.त्यामुळे आता आ.आशुतोष काळे गट नेमकी काय भूमिका घेणार याकडे मतदार आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

राष्ट्रवादीचे माजी गटनेते वीरेन बोरावके याचे नाव समाजातून समोर आले असल्याचे मानले जात आहे.त्यांनी आपल्या कामाने गेली पाच वर्षे कोपरगाव नगरपरिषद गाजवली आहे.शिवाय ते सूसंस्कृत युवा राजकारणी म्हणून त्यांची ख्याती आहे.त्यामुळे आता आ.आशुतोष काळे गट नेमकी काय भूमिका घेणार याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

    दरम्यान दुसरीकडे माजी आ.कोल्हे गटाने कंबर कसली असून त्यांनी आपल्या नगरसेवकांच्या दोन दिवसांच्या मुलाखतीनंतर दोन दिवसानंतर नगराध्यक्ष पदासाठी उच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर,राजेंद्र शिंदे,संजीवनीचे संचालक बाळासाहेब वक्ते,माजी तालुकाध्यक्ष शरद थोरात,जिल्हा परिषदेचे म अजी गटनेते केशव भवर मान्यवर नेते उपस्थित होते.इच्छुकांच्या यादीत पराग संधान,माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,वैभव गिरमे,शहराध्यक्ष वैभव आढाव,मागील वेळी आ.काळे गटाकडून उमेदवारी लढवलेले व नंतर कोल्हे गटात प्रवेशकर्ते झालेले उमेदवार विजय आढाव आदी इच्छुकांच्या यादीत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

 

दरम्यान माजी नगराध्यक्ष संजय सातभाई गट मात्र कोल्हे गटाच्या कच्छपी लागणार हे उघड आहे.मात्र शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष तथा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल मात्र बंड करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

   दरम्यान दुसरीकडे शिवसेना उबाठा गटाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,माजी पंचवार्षिक मध्ये सर्वाधिक काम केलेले कोणताही सन्मान स्वतः न घेतलेले,काम केले मात्र प्रचार कमी केला आणि सत्ताधारी नेत्यांच्या विखारी प्रचाराला बळी पडलेले निष्ठावान भाजपचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे.दरम्यान उबाठा शिवसेनेत उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्याने माजी शहराध्यक्ष भरत मोरे यांच्या रूपाने बंडाळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तर माजी नगराध्यक्ष बबनराव वाजे यांचे चिरंजीव दिपक वाजे यांनीही डोक्याला बाशिंग बांधून प्रचार सुरू केला आहे.त्याचा फटका कोल्हे गटास बसणार असे दिसत आहे.तर शिंदे सेनाही तयारीत असून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दंडाच्या बेटकुळ्या दाखवल्या आहेत.त्यांना भाजप कोल्हे गट सामावून घेणार का यासाठी त्यांनी टाचा उंचावल्या आहेत.शेवटच्या क्षणी त्यांना एक किंवा दोन जागा दिल्या जावू शकतात अशी शक्यता आहे.माजी नगराध्यक्ष संजय सातभाई गट मात्र कोल्हे गटाच्या कच्छपी लागणार हे उघड आहे.मात्र शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष व नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल मात्र बंड करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.ते कोल्हे गटात जाणार अशी शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close