निवडणूक
…या तालुक्यात गट,गण आरक्षणात संमिश्र प्रतिक्रिया

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये पंचायत समिती क्षेत्रांच्या आरक्षण सोडतीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आल्या होते त्यात कोपरगाव तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट आणि दहा गणांचे आरक्षण जाहीर झाले असून यात ब्राम्हणगाव संवत्सर,जिल्हा परिषद गट सर्वसाधारण व्यक्तीसाठी जाहीर झाले आहे.तर सुरेगाव आणि शिंगणापूर गट हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव झाला असून पोहेगाव गट हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला असल्याने ब्राम्हणगाव आणि संवत्सर आदी दोन गटात समाधानाचे तर सुरेगाव,शिंगणापूर,आणि पोहेगाव जिल्हा परिषद गटात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.अनेकांनी लग्न,सुपाऱ्या,दहावे,तेरावे आदी ठिकाणी आपली गेली आठ वर्षे पायधूळ झाडून ही उपयोग झाला नसल्याचे उघड झाले आहे.

गत वेळी सुरेगाव,शिंगणापूर जिल्हा परिषद गट सर्वसाधारण व्यक्तीसाठी जाहीर झाले होते तर ब्राम्हणगाव सर्वसाधारण महिला,वारी-अनुसूचित महिला तर चांदेकासारे गट-हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाला होता.यावेळी हे सर्वसाधारण जागेचे नशीब ब्राह्मणगाव आणि संवत्सर आदी गटांना लाभल्याने तेथील नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.तर उर्वरित जागी संमिश्र वातावरण पाहायला मिळाले आहे.
अहील्यानगर जिल्हा परिषदेचे ७५ गट तर पंचायत समितीचे १५० गण आहे.जिल्हा परिषदेतील अनुसूचित जातीचे ९ गट तर अनुसूचित जमातीचे ७ गट आरक्षितआहे. तर ओबीसींसाठी १९ गट तर सर्वसाधारणाच्या ३८ गट आरक्षित झाले आहे.त्यापैकी ३९ जागा महिलांसाठी राखीव आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३६ लाख ९ हजार २७ लोकसंख्या असून त्यात अंदाजे ओबीसी लोकसंख्या ८ लाख २७ हजार १५९,अनुसूचित जातीची लोकसंख्या ४ लाख ४७ हजार ६९५ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ३ लाख ५५ हजार ३७४ गृहीत धरण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या लोकसंख्येच्या आधार वर आता गट व गणाचे आरक्षण निश्चित झाले आहे.

“संवत्सर गट हा सर्वसाधारण गट म्हणून जाहीर करण्यात आला ही समाधानाची बाब असून आगामी काळात भाजपचे महायुतीचे नेते काय भूमिका घेणार आणि जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे काय भूमिका घेणार यावर आगामी राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहे”-राजेश परजणे,माजी सदस्य जिल्हा परिषद,अहिल्यानगर.
दरम्यान आज नगर जिल्हा परिषदेच्या जागांसाठी मुख्य सोडत कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नेहरू सभागृहात दुपारी १२ वाजता पार पडली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये गट व गणनिहाय चक्राकार (आळीपाळीच्या) पद्धतीने आरक्षण निश्चित केले जाते.यावेळी त्याचा अनुभव आला असून याकडे कोपरगाव तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट आणि दहा गणातील मतदार आणि राजकीय इच्छुकांचे लक्ष लागून राहिले होते.आज ज्यांचा भ्रमनिरास झाला त्यांना झोप येणे अवघड मानले जात आहे.

“शिंगणापूर हा गट ना.मा.प्र.महिला गट म्हणून जाहीर करण्यात आला ही आनंदाची घटना असून आगामी काळात राज्याचे महायुतीचे नेते काय भूमिका घेणार आणि आ.आशुतोष काळे हे काय भूमिका घेणार यावर आमची आगामी राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहे उमेदवारी मात्र नेते ठरवणार आहे”- अर्जुन काळे,माजी उपसभापती,कोपरगाव पंचायत समिती.
यातील कोपरगाव तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटांचे आरक्षणाचा फुगा फुटला आहे.त्यात यात ब्राम्हणगाव संवत्सर,जिल्हा परिषद गट सर्वसाधारण व्यक्तीसाठी जाहीर झाले आहे.त्यामुळे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मानले जात आहे त्यामुळे ब्राम्हणगाव आणि संवत्सर आदी दोन गटात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.तर सुरेगाव आणि शिंगणापूर गट हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव झाला असून पोहेगाव गट हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला असल्याने सोनाली राहुल रोहमारे यांना विद्यमान काळे गट पुन्हा संधी देणार का असा सवाल निर्माण झाला आहे.तर याच गटात निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी 182 गावात गेली 19 वर्षे न्यायिक आणि मोठ्या संघार्षतून शेती पाण्याचे पाणी आणणारी निळवंडे कालवा कृती समिती,शेतकरी संघटना आणि (उबाठा) शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.त्यामुळे ब्राम्हणगाव आणि संवत्सर आदी दोन गटात समाधानाचे तर सुरेगाव,शिंगणापूर,आणि पोहेगाव जिल्हा परिषद गटात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
दरम्यान कोपरगाव तालुक्यात दहा गण असून त्यांचे आरक्षण पुढील प्रमाणे आहे.सुरेगाव-सर्वसाधारण,धामोरी -अनुसूचित जमाती,ब्राम्हणगाव-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,करंजी-नागरिकांचा मागास प्रवर्ग,वारी-अनुसूचित जाती,संवत्सर-सर्वसाधारण,शिंगणापूर-सर्वसाधारण महिला,कोळपेवाडी-सर्वसाधारण महिला,चांदेकासारे – सर्वसाधारण,पोहेगाव -सर्वसाधारण महिला आदींचा समावेश आहे.