निवडणूक
नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा सवता सुभा !

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नुकतीच पंधरा प्रभागांची आरक्षण सोडत नुकतीच जगजाहीर करण्यात आली आहे.त्यातच शिवसेना उबाठा आणि भाजप वहाडणे गटाने आपली भूमिका स्वतंत्र जाहीर केल्याने त्यांचे वाटेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट ) जाणार असल्याचे समजत आहे.त्यामुळे ही निवडणूक बहुरंगी आणि बहुढंगी होणार असल्याचे वर्तमान काळात तरी दिसत आहे.

ऊबाठा सेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी काळे कोल्हे बरोबर आले तर घेऊन नाही आले तर स्वतंत्र निवडणूक धोरण जाहीर केले आहे.त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा मोठा तीळपापड झाला असल्याचे समजत आहे.परिणामस्वरूप नगर जिल्हा राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी कालच राष्ट्रवादीचे संस्थापक खा.शरद पवार आणि प्रमुख नेत्यांची भेट घेतली असल्याचे माहिती हाती आली आहे.
तब्बल चार वर्षांपासून प्रशासकराज असलेल्या नगरपालिकेची लवकरच निवडणूक होणार असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांच्या टाचा वर झाल्या आहेत.या आरक्षणामुळे अनेक उमेदवारांचे नशीब उजळणार की त्यांना राम रट्टा बसणार याबाबतची नागरिकांची उत्सुकता आता संपली आहे.मोठ्या प्रतीक्षेनंतर ही कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक होत असल्याने प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे.आरक्षण सोडतीची सर्व उमेदवारांना प्रतीक्षा होती,कारण ती जाहीर झाल्याशिवाय उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार नव्हते.आता ही सोडत जाहीर झाल्याने इच्छुकांनी तथा भावी नगरसेवक आणि अध्यक्षांनी आपली कागदी भेंडोळे जमविण्याचे काम वेगाने सुरू केल्याने दिसून येत आहे.यावेळी एका प्रभागाची अधिकची भर पडली आहे.त्यामुळे नगरसेवकांची संख्या 28 वरून 30 वर जाणार हे ओघाने आलेच.त्याचा अतिरिक्त भार नेत्यांच्या नव्हे कारखान्यांच्या खिशावर पडणार हे वास्तव पुढे वाढलेले आहेच.त्यातच शिवसेना उबाठा आणि भाजप वहाडणे गटाने आपली भूमिका स्वतंत्र जाहीर केल्याने त्यांचे वाटेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट ) जाणार असल्याचे समजत आहे.राज्यातील नगरपरिषदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ढोल बडवले असून सर्वच राजकीय पक्षांनी,’जागते रहो’ ची हाळी दिली आहे.कोपरगाव,राहाता आणि शिर्डी नगरपरिषदा,नगरपंचायती त्याला अपवाद नाही.त्यांनीही बैठका सुरू केल्या असून आगामी काळात आता ही जूगलबंदी पाहायला मिळणार हे ओघाने आलेच या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी (वहाडणे गटाने) नुकतीच माजी नगराध्यक्षा विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक घेऊन आपल्या दंडाच्या बेटकुळ्या दाखवल्या असल्याने मागील वेळी या निष्ठावानानी सत्ताधारी काळे आणि कोल्हे या मतदारांना नादी लावणाऱ्या दुकडीला मोठा दणका दिला होता त्यामुळे आता यावेळी काय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.

कोपरगाव नगरपरिषदेचा कारभार करतांना विजय वहाडणे यांनी पक्षीय किंवा धार्मिक भेदभाव न करता सर्वच प्रभागात विकासकामे केली असल्याचा दावा केला आहे.त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकास कामाची ‘कर्तव्य’ ही पुस्तिका प्रसिद्ध केल्याची माहिती दिली आहे.
यावेळी विजय वहाडणे यांचेसह माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,सोशल मीडियाचे उत्तर विभाग प्रमुख समीर आंबोरे,योगेश वाणी,चेतन खुबानी,विनीत वाडेकर,राजेंद्र खैरे,वसंत जाधव,संजय वायखिंडे,अनिल वायखिंडे,नंदकुमार जोशी,किरण कानडे,माजी नगरसेवक संजय कांबळे,सतीश चव्हाण,सुरेश कांगुणे,गिरीश हिवाळे आदीसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बैठकीत कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद व सर्व पंधरा प्रभागातील तीस जागांच्या नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्याचे यावेळी ठरविण्यात आले असल्याचे माहिती उपलब्ध झाली आहे.त्यासाठी जवळपास अठ्ठावीस जणांनी आपले अर्ज सादर केल्याची माहिती आहे.

दरम्यान ऐन वेळी पंचायत नको म्हणून काँग्रेसने उमेदवार चाचपणी सुरू केली असल्याची माहिती आहे.त्यांच्या दृष्ठीपथात माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,कैलास पंडोरे आदी चेहरे असल्याचे दिसत आहे.त्यामुळे ही निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे आजतरी दिसत आहे.
कोपरगाव नगरपरिषदेचा कारभार करतांना विजय वहाडणे यांनी कुठलाही पक्षीय किंवा धार्मिक भेदभाव न करता सर्वच प्रभागात विकासकामे केली असल्याचा दावा केला आहे.त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकास कामाची ‘कर्तव्य’ ही पुस्तिका प्रसिद्ध केल्याची माहिती दिली आहे.त्यात त्यांनी कोणत्याही प्रभागात भेदभाव केला असल्याचे उदाहरण नसल्याचे जाहीर केले आहे.सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी यांना समान कामाची संधी दिली असल्याचे म्हंटले आहे.शहरातील नागरिकांचा गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला असून रस्ते आणि पायाभूत सुविधा दिल्या असल्याचे म्हंटले आहे.आगामी काळात उर्वरित कामे आपण मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे.
दरम्यान दुसरीकडे शिवसेना उबाठा गटाने जो येईल त्याला सोबत घेऊन व न आल्यास स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी जाहीर केले आहे.त्यामुळे सत्ताधारी स्थानिक पातळीवर काळे-कोल्हे जर बरोबर आले तर त्यांना घेऊन ही निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले असल्याने शरद पवार राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा मोठा तीळपापड झाला असल्याचे समजत आहे.परिणामस्वरूप नगर जिल्हा राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी कालच राष्ट्रवादीचे संस्थापक खा.शरद पवार,प्रदेश अध्यक्ष आ.शशिकांत शिंदे,खा.सुप्रिया सुळे,आ.रोहित पवार आदींची भेट घेतल्याने ते सवता सुभा उभारणार की विरोधी महाआघाडीत सामील होणार याबाबत चित्र अस्पष्ट दिसत आहे.
दरम्यान काँग्रेस आपला पारंपारिक मतदार सांभाळण्यासाठी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे ठरवीत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.त्यासाठी त्यांनी उद्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची बैठक आयोजित केली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्याला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.दरम्यान ऐन वेळी पंचायत नको म्हणून त्यांनी उमेदवार चाचपणी सुरू केली असल्याची माहिती आहे.त्यांच्या दृष्ठीपथात माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,कैलास पंडोरे आदी चेहरे असल्याचे दिसत आहे.त्यामुळे ही निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे आजतरी दिसत आहे.जस जशी निवडणूक तारीख जवळ येईल त्यावेळी हे चित्र बदलू शकते त्यामुळे आता तरी चित्र स्पष्ट दिसत नाही.त्यामुळे आगामी काळात हे चित्र स्पष्ट होणार असल्याचे मतदारांचे त्याकडे लक्ष लागून आहे.
———————————-
*नियमित विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.