जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव तालुक्यात सरपंच आरक्षणात झाला …हा बदल!

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या आरक्षणासाठी आज २३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता तहसिल कार्यालय,कोपरगाव येथे तहसीलदार महेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोडत पार पडली असून यात वेस- सोयगाव येथील पूर्वीच्या सर्वसाधारण पुरुष आरक्षणात बदल होऊन त्या जागी आता इतर मागासवर्ग पुरुष (ओ.बी.सी.)असे आरक्षणात बदल झाला आहे.या शिवाय दहीगाव बोलका येथील पूर्वीचे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हे आरक्षण बदलून त्या जागी सर्वसाधारण महिला हे आरक्षण आले आहे.तर कोळगांव थडी येथील पूर्वीचे अनुसूचित जाती महिलांचे आरक्षण आहे तेच राहिले आहे.असल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली आहे.बाकी सर्व जागांचे आरक्षण “जैसे थे” असल्याची माहिती त्यांनी दिली आल्याने अनेकाना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान अनुसूचित जमातीसाठी जाहीर करण्यात आलेल्या १६ ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहे.त्यात मनेगाव,खिर्डी-गणेश,काकडी-मल्हारवाडी,भोजडे,मढी बुद्रुक,सुरेगाव,खोपडी,नाटेगाव,शिंगणापूर,वारी,बहादराबाद,बहादरपूर,खोपडी,रांजणगाव-देशमुख,जवळके,शहापूर आदींचा समावेश आहे.

   तीन महिन्यांपूर्वी २४ एप्रिल २०२५ रोजी तहसिल कार्यालय,कोपरगाव येथे ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले होते.मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षणात बदल केला जाण्यासाठी आज तहसील सभागृहात आज बैठकीचे आयोजन केले होते.त्यावेळी हा बदल झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे,

दरम्यान पुढे अनुसूचित जातीच्या १० गावांचे आरक्षण असून त्यात ०५ महिलांचे आरक्षण पाहिले दर्शवले आहे त्यात कोळगाव थडी,(जैसे थे)अंचलगाव,मुर्शतपुर,धोत्रे व घारी यांचा समावेश आहे.तर अन्य अनुसूचित जाती पुरुषांसाठी ०५ ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहे त्यात कोळपेवाडी,आपेगाव, पढेगाव,तळेगाव मळे,सोनेवाडी आदींचा समावेश आहे.

   तर अनुसूचित जमातीत १६ ग्रामपंचायती आरक्षित असून त्यात ०८ महिला तर ०८ पुरुष आहे.त्या पुढील प्रमाणे आहे – प्रथम महिला आरक्षण खिर्डि गणेश,नाटेगाव,भोजडे,शिंगणापूर,मढी बू.,मनेगाव,काकडी -मल्हारवाडी,बहादरपुर आदींचा समावेश आहे.तर गावाचे नाव व अनुसूचित जमातीचे पुरुष जागा पुढे दर्शवले सुरेगाव,वारी,घोयेगाव,खोपडी,बहादराबाद,राजंणगाव देशमुख,जवळके,शहापूर आदींचा समावेश आहे.

   या शिवाय नागरीकांचा मागास प्रवर्ग यासाठी २० जागा राखीव असून त्यात ५० टक्के महिला १० तर ५० टक्के पुरुष १० असे प्रमाण ठरवले आहे.त्यात प्रथम महिला असलेल्या गावांची नावे पुढील प्रमाणे-कारवाडी,सोनारी,वडगाव,गोधेगावं,बोलकी,धारणगाव,कान्हेगाव,डाऊच बू.जेऊर कुंभारी आदींचा समावेश आहे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष चासनळी,ओगदी , येसगाव,तीळवणी,उक्कडगाव,कोकमठाण,माहेगाव देशमुख,मढी खु.,देर्डे कोऱ्हाळे,पोहेगाव आदींचा समावेश आहे.

    तालुक्यात सर्वसाधारण सरपंच पदाच्या एकूण २९ जागा असून यात १५ महिला तर १४ पुरुष आहेत.त्यात पुढे प्रथम महिला आरक्षण दर्शवले आहे-मायगाव देवी,मळेगांव थडी, रवंदे,मंजूर,हांडेवाडी,सांगवी भुसार,ब्राम्हणगाव,करंजी बू.,टाकळी,कासली,लौकी,हिंगणी,देर्डेचांदवड,चांदेकासारे,धोंडेवाडी आदींचा समावेश आहे.यात पुढे सर्वसाधारण पुरुष सरपंच दर्शवले आहे – मोर्वीस,धामोरी,बक्तरपुर,वेळापूर,शिरसगाव-सावळगाव,संवत्सर,सडे,कुंभारी,शहाजापुर,चांडगव्हाण,जेऊर-पाटोदा,डाऊच खुर्द,अंजनापुर आदींचा समावेश आहे.

तर कोपरगाव तालुक्यातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींचे आरक्षण गतवेळी २३ एप्रिल रोजी जाहीर केले होते त्यातील आज पुन्हा नव्याने जाहीर करण्यात आलेले आरक्षण पुढील प्रमाणे असून यात अनुसूचित जातीसाठी १० ग्रामपंचायती जाहीर झाल्या आहेत त्यात धोत्रे,सोनवाडी,पढेगाव,मुर्शतपुर,अंचलगाव,तळेगाव-मळे,कोळपेवाडी,आपेगाव,घारी आदी दहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे.त्यामुळे कोठे समाधान तर कोठे नाराजी असे चित्र पाहायला मिळाले आहे.

  दरम्यान अनुसूचित जमातीसाठी जाहीर करण्यात आलेल्या १६ ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहे.त्यात मनेगाव,खिर्डी-गणेश,काकडी-मल्हारवाडी,भोजडे,मढी बुद्रुक,सुरेगाव,खोपडी,नाटेगाव,शिंगणापूर,वारी,बहादराबाद,बहादरपूर,खोपडी,रांजणगाव-देशमुख,जवळके,शहापूर आदींचा समावेश आहे.

   तर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी तालुक्यातील २० ग्रामपंचायतींचा समावेश झाला असून त्यात माहेगाव-देशमुख,कारवाडी,ओगदी,बोलकी,येसगाव, कोकामठाण,तिळवणी,कान्हेगाव,डाउच बुद्रुक,जेऊर कुंभारी,देर्डे-कोऱ्हाळे,मढी खुर्द,पोहेगाव,गोधेगाव,उक्कडगाव,दहेगाव बोलका,सोनारी,धारणगाव,चासनळी,वडगाव आदींचा समावेश झाला आहे.

दरम्यान यातील सर्वसाधारण सरपंच पदाच्या २९ जागांसाठी ग्रामपंचायती निश्चित असून त्यात मोर्विस,धामोरी,मायगाव देवी,सांगवी भूसार,मळेगाव थडी,रवंदे,कुंभारी,मंजूर,बक्तरपुर,हंडेवाडी,शहापूर,हिंगणी,ब्राम्हणगाव,करंजी बुद्रुक,टाकळी,चांदगव्हाण,जेऊर-पाटोदा,संवत्सर, कासली ,शिरसगाव,लौकी, सडे,देर्डे-चांदवड, डाऊच खुर्द,चांदेकसारे,अंजनापुर,धोंडेवाडी,वेळापूर,वेस-सोयगाव आदींचा समावेश झाला आहे.

यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षणासाठी  ०८ ग्रामपंचायती होत्या त्यातील ०६ ग्रामपंचायतीची सोडत पद्धतीने (चिठ्ठी ) लहान मुलीच्या कु.नियारा क्षीरसागर या मुलीच्या हाताने निघालेल्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहे.सोनारी,वेळापूर,चासनळी,उक्कडगाव,दहिगाव,धरणगाव,चासनळी,वडगाव आदींचा समावेश त्यात बदल झालेला नाही.

सदर प्रसंगी तहसीलदार महेश सावंत यांचेसह नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे,प्रफुल्लिता सातपुते,राजेंद्र उदावंत आदी मान्यवरांसह बहु संख्येने नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close