निवडणूक
…या मतदार संघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान आज बुधवार दि.२० नोव्हेंबर पार पडल्यानंतर लगेचच एक्झिट पोल्सचे अंदाज यायला सुरुवात झाली असून त्यावरून राज्यात तर्ककुतर्कांना उधाण आले असून या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक २३ नोव्हेंबर रोजी कोपरगाव विधानसभा मतदार संघाची मतमोजणी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाशेजारी असलेल्या सेवा निकेतन स्कूल येथे संपन्न होत असून त्यासाठी निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी ३५० ते ३६० कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आले आहे.या कर्मचार्यांना त्याबाबत मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू करण्यात येणार असून साधारणपणे दहाव्या फेरीपासून निकालाचा प्राथमिक कल हाती येणार असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी सायली साळुंके यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान या मतमोजणीसाठी शहरातील वाहतूक धारणगाव रस्त्याद्वारे लक्ष्मीनगर मार्गे ग्रामीण रुग्णालय मार्गे वळविण्यात आली आहे.त्यासाठी नागरिकांनी याची दखल घ्यावी असे आवाहन सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश सावंत यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून उद्या शनिवारी जिल्ह्यातील बारा मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे.साधारण एका मतदारसंघासाठी १०० ते १५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून या सर्वांना आज शुक्रवारी मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.दरम्यान,जिल्ह्यात मतदान केंद्राच्या संख्येनूसार मतदानाच्या फेर्या ठरणार असून प्रत्येक ठिकाणी मोजणीसाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली असली तरी कोपगावत ती २० तेबलद्वरे करण्यात आली आहे.एकावेळी २० टेबलची मोजणी पूर्ण झाल्यावर मोजणीचा एक राऊंड होणार आहे.यासह सैनिक व पोस्टल मतांच्या मोजणीसाठी स्वतंत्र टेबल असणार आहेत.

दरम्यान या मतमोजणीसाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.त्यासाठी १५० केंद्रीय राखीव पोलिस बळ तैनात केले असून दुसऱ्या फळीतील अन्य पोलिस २५ तर स्ट्राँगरूम मधील २४ मिळून १९९ पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.
दरम्यान कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या एकूण २७२ केंद्रांची मतमोजणी टेबल २० द्वारे १९ फेऱ्या होणार आहे.पोस्टल १७०० मतदान झाले आहे.मतदान ७१.३१ टक्के झाले आहे.पहिला निकाल ८.३० वाजता तर शेवटचा निकाल ०४ वाजणार असल्याचा अंदाज निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांनी दिली आहे.दरम्यान एका टेबलवर आधी पोस्टल मोजणी होणार आहे.त्यानंतर अन्य मतमोजणी २० टेबलद्वारे संपन्न होणार आहे.त्यासाठी वीस टेबल साठी ९० कर्मचारी,संगणीकृत कर्मचारी १५,मॅन्युअल टॅब्लेशनसाठी ०६,या शिवाय तीन अधिकारी,चतुर्थ श्रेणी कर्मचारी २५ इतर सहाय्यक कर्मचारी १२ असे एकूण १५१ कर्मचारी असणार आहे.

दरम्यान या मतमोजणीसाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.त्यासाठी १५० केंद्रीय राखीव पोलिस बळ तैनात केले असून दुसऱ्या फळीतील अन्य पोलिस २५ तर स्ट्राँगरूम मधील २४ मिळून १९९ पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.
दरम्यान या मतमोजणीसाठी शहरातील वाहतूक लक्ष्मीनगर मार्गे ग्रामीण रुग्णालय,धारणगाव रस्त्याद्वारे वळविण्यात आली आहे.त्यासाठी नागरिकांनी याची दखल घ्यावी असे आवाहन सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश सावंत यांनी केले आहे.