निवडणूक
मतदान प्रक्रियचे काम अचूकपणे करावे-..यांचे आवाहन
न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राना भेटी देत तेथील सुविधा आणि मतदान व्यवस्थेची पाहणी केली.मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अचूकपणे काम करावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा,सुभाषवाडी,ऐनतपूर (बेलापूर) व नरसाळी जिल्हा परिषद शाळा,शहरातील डी पॉल इंग्लिश मिडीयम स्कूल,डी.डी.काचोळे माध्यमिक जनता विद्यालय,मूकबधीर विद्यालय व राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या मतदानकेंद्रांना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे,गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी आदी उपस्थित होत्या.
यावेळी कोळेकर पुढे बोलताना म्हणाले की,”मतदान केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी व मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निर्भय राहून काम करावे,निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.मतदारांना मतदान करतांन गैरसोय निर्माण होऊ नये,यादृष्टीने मतदान केंद्रांवरील व्यवस्था असावी, मतदान केंद्राच्या परिसरात प्रत्येक ठिकाणी शंभर मीटर व दोनशे मीटर रेषा आखण्यात याव्यात,अशा सूचनाही त्यांनी केल्या.दरम्यान मतदान केंद्रांवरील निवास,भोजन व इतर सुविधांचाही त्यांनी पाहणी केली आहे.युवा मतदान व सखी मतदान केंद्रांनाही अपर जिल्हाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.
दरम्यान कोपरगाव विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान केंद्र-२७२ असून तेथील टेबल संख्या,साहित्य वितरणासाठी २६ टेबलवर १५६ अधिकारी,कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.तर त्यासाठी वाहन संख्या-२७ असून बसेस व २१स्कूल बस ०७ जीप मधून मतदान केंद्रावर पथके पोहचणार आहे.त्यासाठी एकूण मतदान कर्मचारी संख्या ०१ हजार २०० आहे.त्यासाठी सुमारे ३५० पोलीस कर्मचारी व ३५० केंद्रीय सशस्त्र सुरक्षा बल (सी.ए.पी.एफ.) कर्मचारी तैनात केले आहे”- बाळासाहेब कोळेकर,अपर जिल्हाधिकारी,शिर्डी.