निवडणूक
आ.काळे विजयी होणार…यांचा विश्वास
न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला अवघे काही तास उरले आहेत.या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या.तत्पूर्वी मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेण्याऐवजी दुचाकी प्रचारफेरी घेण्यावर भर दिला.या प्रचारफेरीमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करत शक्तिप्रदर्शन केले आहे त्यात काल दुपारी तीन वाजता आ.आशुतोष काळे यांनी प्रचार फेरी मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून शेवटी कृष्णाई मंगल कार्यालयात सांगता सभा संपन्न आली असून त्यात चैताली काळे यांनी आ.काळे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघ त्याला अपवाद नाही.यातील धाकट्या पवारांचे उमेदवार आशुतोष काळे आणि आपली पूर्ण ताकद पणाला लावली असल्याचे दिसून आले आहे.आधी हलक्यात घेतलेली निवडणुकीने त्यांचा नंतर चांगलाच घाम काढला असल्याचे दिसून आले आहे.तरीही त्यांच्या गोटात आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होणार ? हाच केवळ सवाल आहे.त्यातच,’व्होट जिहाद’ या मुद्द्याने त्यांना जीवदान दिले असल्याची माहिती हाती आली आहे तर थोरल्या पवार गटाचे व तुलनेने दिलेले नवखे उमेदवार ऍड.संदीप वपें यांनी चांगलीच वातावरण निर्मिती केली असल्याचे दिसून आले आहे तर अपक्ष उमेदवार संजय काळे यांनी या लढतीत आणखी रंग भरला होता.
दरम्यान आपल्या अलिप्तवादाने त्यांनी दोघांचा बेत पाहत आपण कसा तालुक्याचा खरा पर्याय आहे हे मतदारांना दाखविण्याचा आटापिटा माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे.आता मतदारांना आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रसंग येणार आहे.तो ते कसे निभावणार याकडे तालुक्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.त्यातच निरीक्षकांनी माजी आ.कोल्हे यांना महायुतीचे फ्लेक्स लावण्यास भाग पाडले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे आ.काळे यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
कोपरगाव तालुका तसा आजी आणि माजी आमदार आणि साखर सम्राट काळे-कोल्हे यांचा समजला जातो.मात्र या लढतीत माजी आ.स्नेहलता कोल्हे यांना या रिंगणातून माघार घ्यावी लागली आहे.त्यांच्या या बड्या कार्याची दखल वरिष्ठ केंद्रीय नेत्यांनी घेतली असा त्यांचा दावा आहे आणि त्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे इंधन पुरवत आहे.आता सदर गट कसा काम करणार त्यात आ.काळे यांना यश आले का असा प्रमुख सवाल निर्माण झाला आहे.मात्र बऱ्याच ठिकाणी महायुतीचे विधानसभा निरीक्षक तालुक्यात आल्यावर त्यांनी आ.काळे विजयी होणार…! यांचा विश्वास निर्माण झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.आता उद्या या सर्व प्रयत्नाचे परिणाम मतदान पेटीत बंद होणार आहे आणि आगामी २३ नोव्हेंबर रोजी समोर येणार आहे.