निवडणूक
निवडणुकीतील ‘उपयुक्त मूर्ख’…!
न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे.राज्यात महाविकास आघाडी व महायुती या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये राजकीय सामना असला तरी काही प्रवाहाच्या विरुध्द जावून काही अपक्षानी आपले नशीब आजमावले आहे.त्यात एक कोपरगाव शहरातील संजय काळे यांनी तर दुसरे एक सेवानिवृत्त सैनिक खंडू गहिनाजी थोरात यांचेसह अन्य दहा जणांनी आपले नशीब अजवामवले आहे.त्यांनी एक बाब दाखवून दिली आहे की,सार्वजनिक निवडणूक ही कोणाची मक्तेदारी नाही तो कोणीही लढवू शकतो.त्यामुळे तालुक्यातील शेतकरी,मजूर,उद्योजक,झोपडीतील सामान्य नागरिक,शेतकरी यांचे व्यथा जाणून घेता येतात.त्यातील संजय काळे यांनी आपले निवडणुकीबाबत आपले मनोगत व्यक्त केले असून ते सामान्य मतदारांना नक्कीच अंतर्मुख व्हायला भाग पाडणारे आहे यात शंका नाही.ते वाचकांनी अवश्य वाचावे ते आगामी पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका वाटत नाही.
त्यानी आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की,”आपण दिनांक २३ ऑक्टोबर रोजी विधानसभा नामनिर्देशन पत्र भरले आणि प्रचाराला सुरवात केली.मला आजवर कुठल्याही निवडणूकीचा अनुभव नव्हता.खिशात पैसा नाही पण विधानसभा लढवण्याचा आपण चंग बांधला.आपण प्रथम खिशातले पन्नास (हजार की लाख रुपये हा उल्लेख नाही) टाकले आणि त्यातून मतदार संघातील ८९ खेडी व अवाढव्य शहर फिरु लागलो माझी निशाणी शेवट पर्यंत पोहचवण्यासाठी.सोबतच्या सवंगड्यांनी त्या दिवसा पासून माझ्याकडे सपशेल पाठ फिरवली.त्यातून प्रस्थापित नेत्यांची दहशत दिसून आली आहे.
मला रोज दिसते व दिसायचे कि प्रत्येक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हे केवळ लाभार्थी होते व आहेत,कोणाचे नोकरीला,कोणाला लाभाचे पद,कोणाला ठेका,कोणाला पाकिट, एक नव्हे अनेक.पण मी एकांडा शिलेदार थकलो नाही शारीरिक अथवा माणसिक.विरोधक हसता हसता माझी खिल्ली उडवत असतं,मला दुर्लक्षित करीत होते पण आपण हिम्मत सोडली नाही.एकटा दारोदारी उमेदवार म्हणून फिरत राहीलो आहे व ‘कचरा पेटी’ माझी निशाणी तळागाळात पोहचविण्याचा प्रयत्न करीत होतो.जात धर्माचे शिक्षीत अशिक्षित गरिब श्रीमंत व्यापारी शेतकरी ग्रामीण शहर असे मतदारांचे विभाजन आपण कधी केले नाही,कारण आपण समाज एक समजतो,कारण आपण सामाजिक काम करतो,राजकारण नाही.आपण कुठल्याही जाती धर्माचे अथवा समुह संघटनांना एकत्रित भेटलो नाही कारण आपण इतर उमेदवारांचे मानाने कफल्लक होतो.घरचे डबे खाऊन निवडणूक लढलो.या प्रचार काळात तालुक्यातील खूप समस्या बघीतल्या एका आमदाराचे नजरेने.खरच मन हेलावलं,माझ्या प्रचार सभेत भावनिक होऊन काही महत्वाच्या समस्या व्यक्त झालो.कागदा शिवाय भाषणाचा अनुभव नसताना दिड तास एका दमात बोललो वास्तविक ही आपली समाधी अवस्था होती.एखाद्या विषयाला वाहून घेतले की टी प्राप्त होते.त्याबाबत आपले युट्युब वर भाषण उपलब्ध आहे.आज संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपणार आहे.माझ्या खिशातले निवडणूकी साठीचे माझे कष्टाने कमांवलेले पैसे पण संपणार.एकट्याने रोज पंचवीस किलोमीटर धावपळ करणे थांबणार जनतेला भेटायचं थांबणार आहे.निवडणूक बुथवर मी माझा प्रतिनिधी देऊ शकणार नाही याची मला जाणीव आहे.सगळ्या बुथला भेट देऊ शकणार नाही अथवा देणार नाही;आपण मतमोजणीला देखील जाणार नाही.कारण मला दाखवायचं होतं कि एकटा माणूस निवडणूक लढू शकतो,प्रामाणिक पणे निवडणूक लढता येते,मतदार राजाला त्याचे दारात जाऊन उमेदवार भेटू शकतो.प्रचाराला गेल्यानंतर प्रत्येकाच्या समस्या कळतात हे आपण अनुभवलं.आपण संघर्ष देऊ शकतो परिणामांची निकालाची हमी नाही.आपल्या मतदार संघाची परंपरा आहे शेवटच्या रात्री पैसा,साड्या इत्यादी साहित्य वाटप होते आणि निवडणूकीचे वारे दिशा बदलतात.तरीही आपण सकारात्मक आहे कि माझ्या वर नव्हे माझ्या प्रामाणिक देशसेवेवर,सामाजिक कामावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे.हो पण आपण कोणत्याच नेत्याचा जवळचा नाही,कुठल्याही जातीच्या धर्माचा जवळचा नाही कुणालाही पॅकेज दिले नाही कबूल केले नाही तरी जनता माझ्या वर प्रेम करणार.
प्रेम करणारे मतदार बहूसंख्येने आहात.समजू नका तुम्ही ह्या रात्रीच्या पैशांना हरवू शकत नाही.एकदा प्रामाणिक पणे प्रामाणिक देशसेवा करणाऱ्या सोबत आहोत हे दाखवण्यासाठी आपले मत ‘कचरा पेटी’ चिन्हाला दान करुन पहा.इतिहास घडेल..!
आपण पुन्हा उद्यापासून माझे सामाजिक कामाला परत जुंपणार आहे.त्यासाठी आपण वचनबध्द आहे.आपण आपल्या स्वखर्चातील देशसेवा सोडणार नाही.आपण जर जनतेला निवडणूक फंड मागितला असता तर भरभरून दिला असता.पण आपण माझ्या तत्वांना मुरड घातली नाही.
दरम्यानच्या काळात आपल्याला शेतकऱ्यांमधील नाराजी विधानसभा निवडणुकीपूर्वी दूर करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत आहेत.त्यामुळे कांद्याचे दर वाढत असतानाही निर्यातीवर बंदी न टाकता निर्यात शुल्क सप्टेंबरमध्ये ४० टक्क्यांवरून २० टक्के केले.खाद्यातेलावरील आयात शुल्क २० टक्क्यांनी वाढवले.तांदळाची निर्यात खुली केली.यामुळे तात्पुरती महागाई वाढणार याची सरकारला पूर्ण कल्पना आहे.मात्र निवडणुका जिंकण्यासाठी केंद्र सरकार हा धोका पत्करण्यास तयार आहे.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील काही अपवाद वगळता सर्वच जागांवर महायुतीला फटका बसला होता.त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खटाटोप सुरू असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान आपला प्रचार करण्यासाठी व निवडणूक लढवण्यासाठी माझ्या कुटुंबाने मला कष्टाचा पैसा,हिम्मत,वेळ,माणसिक धैर्य दिले त्याबद्दल मी त्यांचे माझ्या वरील उपकार कधी विसरणार नाही.दरम्यान या प्रचारा दरम्यान कोणाविरुध्द अपशब्द निघाले असतील कोणी दुखावले गेले असतील तर मला मोठ्या मनाने माफ करावे.मतदारांना आवाहन आपले भवितव्य,पुढच्या पिढीचे भविष्य,आदर्श ओळखून सदसदविवेक बुध्दी जागृत ठेऊन मतदान करा.अशी संधी वारंवार मिळत नाही मिळणार नाही.
असे आवाहन संजय संजय काळे यांनी शेवटी केले आहे.
दरम्यान ज्या सेवेचा परिणाम चित्तशुद्धी साठी होतो ती खरी सेवा अशी काहींची श्रद्धा असते त्याचा अनुभव संजय काळे यांनी घेतला असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही अशा भूमिपुत्रांनी देशाला आणि राज्याला खरी गरज आहे.एका पत्रकाराने समाजसेवक अण्णा हजारे यांना दुरचीत्र वहिनीच्या मुलाखतीत प्रश्न विचारला होता की,”तुम्ही निवडणूक का लढत नाही ? तर त्यांनी त्याला फार सुंदर उत्तर दिले होते.माझी अनामत रक्कम जप्त होऊन जाईल….तेंव्हा त्या पत्रकाराने पुन्हा विचारले ते कसे ? तर या देशातील मतदार पाश्चात्य देशातील मतदारांसारखा अद्याप राजकीय साक्षर नाही.त्यामुळे तो पाच वर्षातील ५९ महिने २९ दिवस ज्या नेत्याला शिव्या घालतो त्याच नेत्याला तो १००० किंवा ५०० रुपयांची नोट पाहून मतदान करतो.त्यामुळे मी त्या फंदात पडत नाही.परिणामी देशात सिंहांच्या सिहांसनाच्या जागी लायक नसलेले ग्रामसिंह (कुत्री)बसत असतात.परिमाण आज समस्त राज्यासमोर समोर आहेच असो…!
या प्रसंगावरून एक उदाहरण आठवले ते सांगणे इष्ट ठरेल.रशियामध्ये कम्युनिस्ट क्रांती घडवून आणणारा कॉम्रेड नेता लेनिन याचे एक वचन फार प्रसिद्ध आहे.सोव्हिएत राजवटीत विचार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी केलेली असताना पाश्चात्य विद्वान आणि उदारमतवादी शहाणे लेनिन च्या राजवटीचे फार कौतुक करायचे.जी व्यवस्था विचार स्वातंत्र्याची गळचेपी करते तिचेच समर्थन हे विचारवंत करतात”असे विचारता लेनिन म्हणाला होता,”दे आर युजफुल इडियट” म्हणजेच ते उपयुक्त मूर्ख आहेत.मूर्ख असतील तर त्यांचा उपयोग काय ? असे विचारता लेनिन म्हणाला होता की,”ते स्वतःसाठी मूर्ख पण आमच्यासाठी उपयुक्त आहेत ना ? आज लेनिन हयात नाही आणि सोव्हिएत साम्राज्य सुद्धा लयाला गेलेलं आहे.पण ‘उपयुक्त मूर्ख’ वर्गात येणाऱ्या शहाण्या लोकांची संख्या बेसुमार वाढली आहे.आपण जे काम करत आहोत ते आपल्यासाठी अपायकारक आहे.याचेही भान सोडलेला शहाणा म्हणजेच ‘उपयुक्त मूर्ख’ असे लेनिन म्हणाला होता.पण आज असे मूर्ख ज्यांच्या उपयोगी पडत असतात ते लोक मात्र त्या मुर्खांना शहाणे ठरवत असतात.आपल्या देशात आणि राज्यातही अशा मुर्खांचा तोटा नाही.हे वेळोवेळी होणाऱ्या निवडणुका दाखवून देत असतात.ही निवडणूक त्याला अपवाद नाही.मतदारांच्या या नादान पणामुळे समाज जीवनातील प्रामाणिक मोहरे हातातील वाळू सारखे निसटून जातील.
मोबाईल-9423 43 9946.