निवडणूक
आमदार केल्यास ऊसास ०५ हजारांचा भाव देऊ-…या उमेदवाराचे आश्वासन
न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
सहकारी कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक पिळवणूक करत असून त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नाही त्यामुळे शेतकरी निराश होत असून त्यातून त्यांच्या मुलांचे लग्न,त्यांचे उच्च शिक्षण करणे त्यांना अवघड होत आहे.त्यामुळे आपल्या आमदार म्हणून मतदारांनी निवडून दिल्यास आपण शेतकऱ्यांना ०५ हजार रुपये प्रतिटन भाव देण्याबरोबर कृषी मालासाठी डॉ.एम.एस.स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करू असे आश्वासन संगमनेर विधानसभेचे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार भागवत धोंडीबा गायकवाड यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत हा चर्चेचा विषय ठरला आहे.
लोकशाहीत ‘राजकारण’ हे खरे तर समाजकारणाचे एक साधन.‘समाजकारण करता यावे,समाजसेवा करता यावी म्हणून सत्तेचा सोपान चढतो आहोत’, असे म्हणणारे नेतेही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत.ही भूमिका फक्त सत्ताप्राप्तीपर्यंतच मर्यादित असते,हे त्यांच्या पक्के ध्यानी असते; आता फक्त जनतेने हे लवकर ध्यानी घेणे आवश्यक आहे.समाजसेवेचे नाव घेत सत्तेचे पद एकदा हस्तगत केले की मग त्यांना लोकांच्या भल्याचा विसर पडतो आणि ‘घरभरणी’ सुरू होते.एकदा सुरू झालेली ही घरभरणी मग पाच-सात पंचवार्षिक आणि त्याहीनंतर-पुढच्या पिढ्यांपर्यंत-थांबायचे नावच घेत नाही. ‘लोकशाही राजा-राणीच्या उदरातून नव्हे; तर मतपेटीतून जन्माला येईल’ असे म्हटले जाते.पण वर्तमानात आमच्या सरंजामी मानसिकतेने हे फोल ठरवले आहे.याला संगमनेर विधानसभा मतदार संघ अपवाद नाही याठिकाणी वर्तमानात आम्हीच निळवंडे धरणाचे पाणी आणले आहे असा सर्रास खोटा प्रचार आ.बाळासाहेब थोरात,राधाकृष्ण विखे,आ.काळे यांचे कडून सुरू आहे.पाणी निळवंडे कालवा कृती समितीचे उच्च न्यायालयात जावून आणला ही सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ बाब आहे.तरीही खोटे बोलण्यात या मंडळींचा हात कोणी धरणार नाही.गेली पंचेचाळीस वर्ष यांनी जनतेला फसवले आहे.आजही निळवंडे,भोजपुर चारी चे खोटे गाजर दाखवण्याचे काम ही मंडळी करत आहे.तरीही यांच्या खोट्या आश्वासन जनता भाळत आहे हे विशेष ! वर्तमानात विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे.यांचा निवडणूक काळातील स्नेह हा वारांगणाप्रमाणे असतो याचे भान मतदारांना येत नाही यात या नाटकी लोकांचे फावते आहे.त्यांचे कार्यकर्ते म्हणजे विंचवाचे पेवच असते.ते गावोगावच्या लोकांना केवळ नांग्या मारण्याचे काम करत असतात.याचा दाहक अनुभव वर्तमानात काळात येत आहे.मात्र काही माणसे खऱ्या भावनेने काम करत असताना त्यांचेकडे मतदारांचे लक्षच जात नाही असेच एक व्यक्तिमत्व संगमनेर तालुक्यातील कासारे येथील भूमिपुत्र असून त्यांनी आपली कर्मभूमी मुंबई मानून तेथे आपली सेवा बजावली होती.त्या ठिकाणी राहूनही त्यांनी गावाकडे दुर्लक्ष केले नाही.ग्रामपंचायतीची निवडणूक गेली २५ वर्षे लढवून सदस्य आणि सरपंच अशा चढ्या क्रमाने काम केले होते.त्यातून त्यांनी वेळोवेळी गावात विविध सामाजिक कामे केली आहे.त्यांची पत्नी सरपंच बनल्या होत्या.त्यांच्याच काळात निळवंडे कालवा कृती समितीचा लढा यशोशिखरावर होता.त्यावेळी त्यांनी गावात निळवंडे प्रश्नी जनतेला फसविनाऱ्याना प्रवेश बंद केला होता.त्याची चर्चा राज्यभर झाली होती.भागवतराव गायकवाड यांनी पहिली विधानसभा निवडणूक डोंबिवली मधून लढवली होती.तर आता पर्यंत राष्ट्रपती,लोकसभा,विधानसभा,शिक्षक पदवीधर (विधानपरिषद) विधानसभा मतदार संघ आदी निवडणुका लढवल्या आहेत.दक्षिण नगर लोकसभेची निवडणूक त्यांनी एप्रिल मध्ये लढवली होती.त्यावेळी त्यांना पाच हजाराहून अधिक मते मिळाली होती.ते स्वतःला सयाजीराव गायकवाड यांचे वंशज मानतात.त्यांच्या पत्नीचे मागील वर्षी निधन झाले आहे.तरीही त्यांनी आपल्या समाजसेवेचा वसा सोडलेला नाही.त्यांनी केवळ दोन मुलींवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेली असून ते व्यसनमुक्त आहेत.त्यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात हे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हंटले आहे की,आपण शेतकऱ्यांच्या दुधाला ४५ रुपये प्रति लिटर भाव देऊ.शेतकऱ्यांना आपल्या घामाचे योग्य दाम देण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून शेती मालाला योग्य भाव देणार,सर्व पाणंद रस्त्यांचे डांबरीकरण करणार,शेती पंपासाठी दिवसा वीज देणार आहे.वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ०३ लाखांपर्यंत ०४ टक्के दराने व्याज दराने कर्ज देणार आहे.कृषी विद्यापीठाचे अत्याधूनिकीकरण करणार,निळवंडे कालव्यांचे दोन्ही बाजूंचे पाझरतलाव भरून देण्यासह निळवंडे धरणाचे चार आवर्तन देणार आहे.शेती मालाच्या प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य देणार,शेतीचे रासायनिक खते,बी बियाणे,पशू खाद्य आदींच्या किमती ५० टक्क्यांनी कमी करणार असल्याचे जाहिर केले आहे.
राज्यात दारूबंदी कायदा करणार आहे.पुढील ११ वर्षाच्या काळात नदीतील वाळू उपसा बंद करणार आहे,एस.टी.तर नागरिकांना महिला प्रमाणे अर्थ्या तिकितात प्रवास सुरू करणार,भेसळयुक्त अन्न पदार्थांवर बंदी टाकणार,आर्थिक व अन्य सामान्य गुन्हेगारांना सहा महिन्यात तर गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करणार,आरोग्य व शिक्षण सेवा सर्वांना मोफत करणारा असल्याचे जाहीर केले आहे.
जनतेच्या पैशातून उभारलेल्या स्थानिक पुढाऱ्यांच्या सहकारी संस्था,हॉस्पिटल आदींचे सरकारीकरण करणार,गौण खनिजाची बंदी उठवणार आहे.वृक्ष तोडीसाठी कायदा करणार,२५ टक्के आमदार हे यू.पी.एस.सी.मधून निवडणार,पर्यावरण संवर्धनासाठी शेतकऱ्यांना अनुदान देणार आहे.
दरम्यान तरुणांना रोजगार निर्मिती करणार आहे.शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे लग्नं करण्यास प्राधान्य देणार आहे.संगमनेर तालुक्यात औद्योगिक वसाहत स्थापन करणार आहे.सैन्य,पोलिस,शिक्षक,आदींना वेतन सुधारणा कायदा आणणार आहे.दरम्यान नोकरदारांसाठी त्यांच्या आवडीनुसार बदली करणार,पती पत्नी एकत्रीकरण करणार,दर महिन्याचा पगार एक तारखेला देणार असे आश्वासने दिली आहे.या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार भागवतराव गायकवाड यांच्या जाहीरनाम्याची सर्वत्र चर्चा होत आहे.