निवडणूक
…या बंधाऱ्याची परत फेड करा-जाधव यांचे आवाहन
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून आ.आशुतोष काळे यांनी ४१.५१ कोटी निधी आणला आहे.निवडणुक आटोपताच या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात पण होणार आहे.पण तत्पूर्वी आ.काळेंनी दिलेल्या निधीची परतफेड २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत करून द्या असे आवाहन महानंदा दुध संघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी नुकतेच केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ ची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे.राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.राज्यात एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार आहे.त्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघात दोन्ही पवार गटाच्या बाजूंनी मोठा जोर लावला जात असून ग्रामीण व शहरी भागात सभा आणि फेऱ्याना ऊत आला आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघ त्यालाअपवाद नाही.या मतदारसंघाच्या निवडणुकीत वर्तमान आ.काळे यांनी मोठी ताकद लावली असून त्यासाठी गावोगाव बैठका आणि कॉर्नर सभा आदींना ऊत आला आहे.त्यांनी कोपरगाव मतदार संघातील मायगाव देवी येथे प्रचार सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,’आपला कोपरगाव मतदार संघ हा अवर्षणग्रस्त असल्यामुळे आपल्याकडे दरवर्षी पाऊस कमीच पडतो.गोदावरी कालवे पिण्याची आणि सिंचनाची गरज पूर्ण करीत असले तरी सातत्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वाढत जावून सिंचनाचे पाणी कमी झाले.आपल्या कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर के.टी.वेअर अर्थात कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांची साखळी आहे.त्यामुळे गोदाकाठ समृद्ध होवून भूजल पातळी वाढण्यास देखील मोठी मदत झाली.त्यामुळे गोदातीरी असलेल्या गावांच्या शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य या के.टी.वेअरमुळे प्रकाशमान झाले.आपण शेतकरी असल्यामुळे याची जाणीव असून माझ्या देखील शेतीला माहेगाव देशमुखच्या के.टी.वेअरचा फायदा होतो त्यामुळे गोदाकाठच्या शेतकऱ्यांसाठी या सर्व के.टी. वेअरचे महत्व किती अनमोल आहे हे मी सांगण्याची गरज नाही.
नैसर्गिक आपत्तीमुळे आपला मंजूर बंधारा तीन वेळा वाहून गेल्यामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान तर झालेच त्याचबरोबर मंजूर,चास नळी,हंडेवाडी,धामोरी,मोर्वीस, मायगाव देवी,कारवाडी आदी गावातील शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य पण अंधकारमय झाले होते.भू-गर्भातील पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात खालावली जावून शेती सिंचनाचा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या बंधाऱ्याच्या लाभक्षेत्राच्या गावातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असतांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आ.काळे यांनी मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याचा शब्द दिला होता.दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करून या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४१.५१ कोटी निधी खेचून आणला.त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे सहकार्य लाभले आहे.त्यामुळे त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आ.काळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या.त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी कोपरगाव येथे सांगितले आहे की,”जास्त मतांनी निवडून द्या,जास्त निधी देतो आणि मोठी जबबादारी पण देतो’ याची आठवण करून दिली आहे.