जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

…या मतदार संघात मतदार जागृती फेरी संपन्न !

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव नगरपरिषद व तहसील कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळेतील विद्यार्थी व विविध सामाजिक संघटना यांचेमार्फत आज सकाळी दहा वाजता मतदार जनजागृती रॅली तहसील कार्यालयापासून सुरु होऊन शहराच्या मध्यवर्ती भागातून काढण्यात आली व तहसील कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

“आगामी दि.२० नोव्हेंबर रोजी २१९-कोपरगाव विधानसभा मतदार संघाकरिता मतदान होणार असून सदर मतदान केंद्रावर जास्तीत जास्त मतदान करण्याकरिता निवडणूक कर्मचाऱ्यांनी सर्व मिळून प्रयत्न करावयाचे आहेत,त्यासाठी सर्व नागरिकांनी मतदान करावे”- सायली साळुंके,निवडणूक निर्णय अधिकारी,कोपरगाव.

   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ ची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे.राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.राज्यात एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार आहे.त्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघात दोन्ही पवार गटाच्या बाजूंनी जोर लावला जात असून ग्रामीण व शहरी भागात सभा आणि फेऱ्याना ऊत आला आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघ त्यालाअपवाद नाही.यात मतदार निवडणुकीत मतदारांना जागृत करण्यासाठी निवडणूक आयोग मागे राहिला नाही.त्यांनी आज सकाळी मतदार जागृती फेरी आयोजित करून मतदारांना जागृत केलं असल्याचे पाहायला मिळाले आहे.


   त्याबाबत त्यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की,”लोकांचे सरकार,लोकांद्वारे आणि लोकांसाठी हि अभिव्यक्ती तेव्हाच अचूक आहे जेव्हा प्रत्येक नागरिक निवडणूक प्रक्रियेत भाग घेतो.मतदान प्रक्रियेचे महत्व आणि देशाचे भवितव्य ठरविताना प्रत्येक मताचे महत्व या दोन्ही गोष्टी समजून घेण्यासाठी मतदारांच्या विचारामध्ये मुलभूत बदल होणे आवश्यक आहे.त्याकरिता नगरपरिषद प्रशासन व तालुका प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली एस.जी.विद्यालय,एम.के.आढाव विद्यालय,सेवा निकेतन,के.बी.पी.विद्यालय,सी.एम.मेहता विद्यालयाचे विद्यार्थी,शिक्षक वृंद तसेच लायन्स-लिओ-लायनेस क्लब,रोटरी क्लब,गोदामाई प्रतिष्ठान,सूर्यतेज संस्था व व्यापारी महासंघ यांच्या माध्यमातून मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. तहसील कार्यालय येथे मतदार शपथ घेण्यात येऊन रॅलीस तहसिलदार महेश सावंत व मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी झेंडा दाखवून रॅली सुरु करण्यात आली होती.  

  

  सदर रॅली तहसील कार्यालयापासून सुरु होऊन शहराच्या मध्यवर्ती भागातून काढण्यात आली व तहसील कार्यालय येथे संपन्न झाली.तहसील कार्यालय येथे सी.एम.मेहता विद्यालयामार्फत मतदार जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले आहे.      

दरम्यान आगामी दि.२० नोव्हेंबर रोजी २१९-कोपरगाव विधानसभा मतदार संघाकरिता मतदान होणार आहे.सदरील मतदान केंद्रावर जास्तीत जास्त मतदान करण्याकरिता आपण सर्वांना मिळून प्रयत्न करावयाचे आहेत,त्यासाठी सर्व नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती सायली सोळंके यांनी उपस्थितांना केले आहे.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close