जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

आ.काळे यांना…या समाजाचा पाठिंबा !

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    महाराष्ट्रात विधासभा निवडणूक पार पडण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.प्रचारसभांचा धडाका सुरु असताना कोपरगाव विधानसभा मतदार संघात धाकटे पवार यांचे उमेदवार आशुतोष काळे यांनी यांच्या प्रचाराला वेग आला आहे.त्यांना तिळवण तेली समजांने पाठिंबा दिला असल्याची माहिती त्या संघटनेचे अध्यक्ष व ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी यांनी दिली आहे.

  

श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची जयंती कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी कुठेच सांस्कृतिक भवन नव्हते.त्यामुळे त्यांची पुण्यतिथी,जयंती,तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आव्हान निर्माण झाले होते.त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी दहा लाखांचा निधी देऊन ही समस्या दूर केली आहे.

  महाराष्ट्रात विधासभा निवडणूक पार पडण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.नगर सह राज्यात प्रचारसभांचा धडाका सुरु आहे.शरद पवार यांनी कोपरगाव मतदार संघात आपल्या पक्षाचे उमेदवार संदीप वर्पे,राहाता मतदार संघात प्रतिभाताई घोगरे,राहुरीत प्राजक्त तनपुरेंसाठी सभा घेतली.या सभेत त्यांनी भाजपावर आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली असून अद्याप आज आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी धाकट्या पवारांची सभा आज सायंकाळी पाच वाजता कोपरगाव मतदार संघात संपन्न होत आहे.त्यामुळे आता या लढतीत रंगत वाढू लागली आहे.या पार्श्वभूमीवर तिळवण तेली समाजाचे आ.काळे यांना त्यांच्या उपस्थितीत पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे आता या निवडणुकीत चांगलीच चुरस वाढताना दिसत आहे.

  गवळी हे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पुढे म्हणाले की,”कोपरगाव शहरासह मतदार संघात तिळवण तेली समाजाने सामाजिक,धार्मिक क्षेत्रात योगदान दिलेले आहे.परंतु कोपरगाव तालुक्यात कुठेच श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे मंदिर उभारलेले नव्हते व समाजाचे सभागृह देखील नव्हते.त्यामुळे मागील तीन दशकांपासून कुठेच श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची जयंती कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी कुठेच सांस्कृतिक भवन नव्हते.त्यामुळे त्यांची पुण्यतिथी,जयंती,तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आव्हान निर्माण झाले होते.

      त्यावेळी सर्व तिळवण तेली समाज बांधवांनी एकत्र येत आ.काळे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मंदिर आणि सांस्कृतिक भवनाचा प्रश्न मांडला असता शंभर टक्के सहकार्य करण्याचे फक्त आश्वासनच देऊन दहा लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला होता.त्यामुळे तिळवण तेली समाज बांधव यापुढेही सोबत राहणार असल्याचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close