जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

तालुक्याला विकासाभिमुख नेता मिळाला-..यांचा दावा

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   विद्यमान आ.आशुतोष काळे यांच्या रूपाने कोपरगाव मतदार संघाला लक्षवेधी नेता मिळाला आहे.त्यांनी पाच वर्षापूर्वी दिलेल्या वचनांची पूर्तता करून जनतेच्या अपेक्षेपेक्षा जास्त विकास करून दाखविला असून कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्यासह मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न पाच वर्षात आ.आशुतोष काळे यांनी सोडविले असल्याचा दावा माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी नुकताच एका प्रचार सभेत केला आहे.

   

“आपण आमदार झाल्यावर सर्वात प्रथम कोपरगाव शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवू आणि त्यांनी शब्द खरा करून पाणी प्रश्न सोडवून दाखवला,पाण्याच्या टाक्या दूर करण्याचे काम व कोपरगाव शहरातील नागरिकांना तीन दिवसाआड पाणी देण्याचे काम आ.आशुतोष काळे यांनी करून दाखवले आहे”- मेहमूद सय्यद,माजी नगरसेवक,कोपरगाव नगरपरिषद.

  भाजपच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवण्यात येणार आहे. 25 लाख रोजगारांची निर्मिती,10 लाख विद्यार्थ्यांना वेतन,गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी सौरचा वापर करुन 30 टक्के कमी करणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.तर
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आज (10 नोव्हेंबर) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात माहविकास आघाडीने महिला, शेतकरी, तरुण यासाठी आकर्षक घोषणा केल्या आहेत तर महाविकास आघाडीने आपण सत्तेत आल्यास आम्ही महिलांना बसचा प्रवास मोफत करू,महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये देणार,जातीआधारित जनगणना करणार, महिलांना प्रत्येक वर्षाला 6 गॅस सिलिंडर फक्त 500 रुपयांना देणार आदी नानाविध योजनांची बरसाद केली असून आता निवडणूक रंग भरू लागली आहे.त्याला कोपरगाव विधानसभा मतदार संघ अपवाद नाही.कोपरगाव मतदार संघात दोन राष्ट्रवादीत लढत होत असून त्यात आशुतोष काळे विरुध्द संदीप वपें अशी लढत रंगत असून विविध ठिकाणी प्रचार सभा रंगत आहेत.अशीच सभा नुकतीच कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ०८ मधील टाकळी नाका येथे शनिवार दि.०९ रोजी आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कॉर्नर सभेत माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद बोलत होते.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव शहराला महिन्यातून दोन वेळेला पिण्याचे पाणी येत होते.त्यानंतर पिण्याच्या पाण्याची एवढी भीषण टंचाई निर्माण झाली की, कोपरगाव शहरातील नागरिकांना २० ते २८ दिवसांनी पाणी यायला लागले.दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत जावून कोपरगाव शहराची पाणी प्रश्नाबाबत अतिशय अवघड परिस्थिती निर्माण  झाली होती.त्यामुळे नागरिकांना पाणी साचवून ठेवण्यावाचून पर्यायच नव्हता व त्यासाठी प्रत्येक नागरिकांच्या दारासमोर पाण्याच्या टाक्या नित्याच्या झाल्या होत्या.मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी आ.काळे यांनी पहिला शब्द दिला होता की,”आपण आमदार झाल्यावर सर्वात प्रथम कोपरगाव शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवून दाखवेल आणि त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे पाणी प्रश्न सोडवून दाखवला असल्याचा दावा केला आहे.पाण्याच्या टाक्या दूर करण्याचे काम व कोपरगाव शहरातील नागरिकांना तीन दिवसाआड पाणी देण्याचे काम त्यांनी केले आहे.कोपरगाव शहरातील व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी व्यापारी संकुल उभारले जात आहे.शहरातील रस्त्यांचा विकास झाला आहे.शहराचे अनेक प्रश्न मार्गी लागल्यामुळे कोपरगाव शहर लवकरच विकासाच्या बाबतीत शेजारील विकसित शहरांशी स्पर्धा करणार याचा माझ्यासह कोपरगाव मतदार संघातील जनतेला विश्वास आहे.त्यामुळे दिलेला शब्द पूर्ण करणारे आहे.त्यांना मतदार संघातील सुज्ञ मतदार भरभरून मतदान करणार असल्याचा विश्वास माजी नगरसेवक सय्यद यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close