निवडणूक
…हे बडे नेते कोपरगावात घेणार जाहीर प्रचार सभा,पारडे फिरणार ?
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांचे उमेदवार संदीप वर्पे यांच्या प्रचाराची जाहीर प्रचार सभा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ०२ वाजता संपन्न होणार आहे.त्यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे या प्रचार सभेमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनी धास्ती घेतली असून त्यांचे पारडे जड होणार की फिरणार हे लवकरच समजणार आहे.
बंडखोरी करणाऱ्या ४० जणांवर अखेर भाजपकडून हाकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अखेर पक्षाकडून हाकालपट्टी केली आहे.तर दुसरीकडे महायुतीत लाडकी बहिण योजनेचे श्रेय घेण्यासाठी चडाओढ सुरू आहे.आरोप प्रत्यारोप तर आता वाढत चालले असताना आता महायुती आणि महाआघाडीने आपल्या प्रचार सभा घेण्यासाठी पावले उचलली असून कोपरगाव विधानसभा मतदार संघ त्यास अपवाद नाही.कोपरगाव मतदार संघात मोठ्या पवार गटाचे उमेदवार संदीप वर्पे यांनी आपल्या प्रचाराचा नारळ ऐन माघारीच्या दिवशीच फोडून आघाडी घेतली होती. त्यांनंतर आ.आशुतोष काळे यांनी जुन्या गंगादेवी मंदिरात आपल्या प्रचाराचा श्री गणेशा केला होता.
आघाडीने महाआघाडीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार संदीप वर्पे यांना हिरवा कंदील दाखवला असून त्यांनी गावोगाव जाऊन आपला प्रचार सुरू केला असून सर्व मंदिरातील देवांना साकडे घालताना दिसत आहे.तर दुसरीकडे त्यांनी आपल्या प्रचार सभेसाठी बडे नेते मतदार संघात आणून अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष काळे यांना धक्का देण्याची पुरी तयारी सुरू केल्याची माहिती हाती आली आहे.त्यात त्यांनी पहिल्याच टप्प्यात राष्ट्रवादीचे पितामह म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची जाहीर सभा घेण्याचे ठरवले असून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तसा पाठपुरावा सुरू केला असल्याची माहिती हाती आली आहे त्यासाठी मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ०२ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान त्यासाठी मुक्रर केले असल्याची माहिती हाती आली आहे.
त्यामुळे जाहीर प्रचारात संदीप वर्पे यांची आघाडी दिसत असून प्रसार माध्यमात मात्र ते पिछाडीवर दिसत आहे आता ते आगामी काळात ती प्रचार आघाडी कशी टिकवणार याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.