निवडणूक
कोपरगाव मतदार संघात अद्याप घालमेल सुरूच !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आज पासून सुरुवात झाली आहे.मात्र महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावर अद्याप सहमती होऊ शकलेली नाही.भाजपची यादी जाहीर झाल्यावर पक्षातील नाराज नेत्यांनी बंड करण्यास सुरुवात केली आहे.त्यांची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात पक्ष गुंतल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया खऱ्या अर्थाने मंगळवारपासून सुरू झाली आहेआज कोपरगाव विधानसभेसाठी २७ अर्जांची विक्री झाली असून एकूण अर्जांची संख्या ३९ वर पोहचली आहे.मात्र अद्याप कोणीही अर्ज दाखल केलेला नाही.
बहुप्रतीक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले असून राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन २८८ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकांचा निकाल जाहीर होनार आहे.आज अर्ज दाखल करण्याचा दिवस उजाडल्यानंतरही भाजप आणि वंचित आघाडी वगळता अन्य कोणत्याही पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.भाजपमधील नाराजांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.महायुतीत भाजप,शिवसेना (शिंदे),राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या जागावाटपावर अजूनही सहमती झालेली नाही.मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला ८० पेक्षा अधिक जागा सोडण्यास भाजप तयार नसल्याने जागावाटप अडल्याचे सांगण्यात आले.महाविकास आघाडीतही काँग्रेस आणि शिवसेनेत (ठाकरे) अद्याप एकवाक्यता झालेली नाही. विदर्भातील जागांवर चर्चेचे घोडे अडले असून ठाकरे गटाने केलेला दावा मागे घ्यावा अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे.नामांकन करण्याची शेवटची तारीख : २९ ऑक्टोबर २०२४ असून नामांकन छाननीची तारीख ३० ऑक्टोबर २०२४ आहे.आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर २०२४असल्याची माहिती आहे.तर मतदानाची तारीख बुधवार २० नोव्हेंबर २०२४ मतमोजणीची तारीख शनिवार २३ नोव्हेंबर २०२४ मात्र कोपरगाव विधानसभा मतदार संघात केवळ अजित पवार राष्ट्रवादी शिवाय कोणीही आपली उमेदवार जाहीर केलेले नाही.माजी आ.कोल्हे गटात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असून त्यांच्या हाती अद्याप काहीही लागलेले दिसत नाही.परिणामी त्या गोटात अद्याप सामसूम आहे.त्यामुळे त्याकडे विद्यमान आ.काळे गटासह नागरिकांचे लक्ष लागून आहे.भाजप त्यांना नेमके काय देणार या कडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.तर आ.आशुतोष काळे हे आगामी २५ ऑक्टोबर रोजी आपले नामनिर्देशन भरणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघात उबाठा सेनेकडून माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे तर शरद पवार राष्ट्रवादी कडून पक्ष प्रवक्ते संदीप वर्पे इच्छुक,अड.दिलीप लासुरें इच्छुक दिसून येत आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी याआधीच आपली उमेदवारी जाहीर करून बार उडवून दिला आहे व प्रचारास सुरुवात केली आहे.तर मराठा महासंघ यात उडी घेणार असल्याचे समजत आहे.त्यामुळे ही लढत कशी होणार हे उघड आहे.
दरम्यान उत्तर नगर जिल्ह्यात कोपरगाव सह आज दाखल अर्ज संख्या व पुढे एकूण अर्ज विक्री संख्या दर्शवली आहे.नेवासा २०-४१,संगमनेर ११-२५,शिर्डी १४-२३,श्रीरामपूर २४-५६,अशी विक्री झाली आहे.