जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

…हा नेता भरणार शुक्रवारी आपला अर्ज,तर अन्य पक्षीयांची मोठी तयारी ?

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून महायुतीत भाजपने नुकतीच 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.त्यात कोपरगाव येतील विद्यमान आमदार आशुतोष काळे यांचे नाव नव्हते मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पक्षाच्या वतीने ए.बी.फॉर्म दिला असून ते आपले नामनिर्देशनपत्र आगामी शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी दाखल करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचे स्वागत केले आहे.

   

कोपरगाव विधानसभा मतदार संघ अपवाद नाही.येथील विद्यमान आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.सदर भेतील त्यांना त्यांनी पक्षाचा ए.बी.फॉर्म सुपूर्त केला आहे.

  बहुप्रतीक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे.राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन २८८ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रासोबतच झारखंड विधानसभा निवडणुकांचीही घोषणा केली आहे.विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते कार्यप्रवण झाले आहे.त्याला कोपरगाव विधानसभा मतदार संघ अपवाद नाही.कोपरगाव येथील माजी आ.स्नेहलता कोल्हे व त्यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांचे तळ्यात मळ्यात सुरू असताना येथील विद्यमान आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.सदर भेटीत त्यांना त्यांनी पक्षाचा ए.बी.फॉर्म सुपूर्त केला आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना स्वकीय भाजपकडून न्याय मिळत नसल्याने ते अस्वस्थ असून त्यांनी आपली तयारी सुरू केली असून त्यांचे बरोबरच राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे,माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनीही दंड थोपटले आहे.शिवाय या आधीच ऍड.दिलीप लासूरे,यांचे सह मराठा सेवा संघ मैदानात उतरण्याची तयारी करत आहे.

   दरम्यान प्रचारात आघाडी ठेवण्यासाठी शुक्रवार दि.२५ऑक्टोबर रोजी आ.काळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.सकाळी ११.०० वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.त्यानंतर त्या ठिकाणाहून शहराच्या मुख्य मार्गावरून अहिंसा स्तंभ,गुरुद्वारा रोड मार्गे तहसील कार्यालयापर्यंत फेरी काढून आ.आशुतोष काळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.या कार्यक्रमासाठी महायुतीतील कार्यकत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close