जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

निवडणूक कर्मचाऱ्यांनी पारदर्शकपणे काम करावे-सूचना

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

शिर्डी,(प्रतीनिधी)

मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि अनूचित पद्धतीच्या वापरावर निर्बंध आणण्याकरिता सर्व यंत्रणांनी सांघिक भावनेने, समन्वयाने, पारदर्शकपणे आणि तत्परतेने निवडणुकीचे कामकाज  करावे,अशा सूचना उपविभागीय अधिकारी तथा शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी दिल्या.

“प्रत्येकाने आपल्या मताचा अधिकार वापरला पाहिजे एका मतामध्ये सरकार बनविण्याची ताकद असते.त्यामुळे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वत: मतदान करण्यासोबत नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती करावी”- माणिक आहेर,प्रांताधिकारी,शिर्डी.

   आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शिर्डी विधानसभा मतदारसंघात स्थापन करण्यात आलेल्या विविध पथक प्रमुख (नोडल अधिकारी) यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, राहाता नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव लोंढे, शिर्डी नगरपरिषद मुख्याधिकारी सतीष दिघे आदी उपस्थित होते.

श्री.आहेर म्हणाल, शासकीय कार्यालये, खासगी आस्थापनांमध्ये दर्शनी भागावर लावण्यात आलेले राजकीय जाहिराती असलेले बॅनर व बोर्ड त्वरित काढण्यात यावे. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले राजकीय बोर्ड ४८ तासांच्या आत हटविण्याची कार्यवाही प्रशासनाने करावी. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता सर्वांनी घ्यावी.

प्रत्येकाने आपल्या मताचा अधिकार वापरला पाहिजे एका मतामध्ये सरकार बनविण्याची ताकद असते. त्यामुळे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वत:  मतदान करण्यासोबत नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती करावी,असे आवाहन  त्यांनी केले.

यावेळी सी-व्हीजील ॲपवरील आचारसंहितेच्या कारवाया,ईव्हीएम मशीन, पोस्टल मतदान प्रक्रिया,खर्च पथकाचे कामकाज, वाहतूक व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठीच्या सोयी-सुविधांचाही श्री.आहेर यांनी आढावा घेतला.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात २७० मतदान केंद्र; पन्नास टक्के मतदान केंद्रांचे वेबकास्टींग होणार

शिर्डी विधानसभा मतदार संघात २ लाख ९० हजार ८२१ मतदार आहेत. यात पुरूष १ लाख ४८ हजार ४४० व स्त्री १ लाख ४२ हजार ३७३ मतदार आहेत. तसेच २७० मतदान केंद्रे आहेत. पन्नास टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टींग  केले जाणार आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी २१ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एफएसटी व एसएसटीचे प्रत्येकी ६ पथके, व्हीएसटीचे ३ पथके व व्हीव्हीटीचे १ पथक नियुक्त्त करण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या परवानग्या ऑनलाईन देण्यात येणार आहेत. यासाठी राहाता येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एक खिडकी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी बँकेत खाते उघडणे आवश्यक आहे. नामनिर्देशनपत्रासोबत फोटो असणे आवश्यक आहे.

निवडणूकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यास २२ ऑक्टोबर २०२४ पासून सुरूवात होणार आहे. २९ ऑक्टोंबर २०२४ अंतिम तारीख आहे. ३० ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. ४ नोव्हेंबर अर्ज माघारीची अंतिम तारीख आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती श्री.आहेर यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close