जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

…तर भाजप मधील असंतोष उफाळून येईल -…या नेत्याचा इशारा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव – (नानासाहेब जवरे )

    राज्यातील भाजप निष्ठावान कार्यकर्त्यांच्या असंतोषाला पक्षाने वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत वाट मोकळी करून दिली पाहिजे,त्यांचे रास्त म्हणणे ऐकले तर त्याचा पक्ष वाढीस नक्कीच फायदा होईल अन्यथा त्यांचा असंतोष उफाळून आला तर त्याची मोठी किंमत आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला चुकवावी लागू शकते असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते व कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना एका प्रसिध्दी पात्रकांवये दिला आहे.

“वर्षानुवर्षे निष्ठेने भाजपाचे काम करणाऱ्या जुन्या-जेष्ठ कार्यकर्त्यांना फारसे विचारात घेतले जात नाही.त्यांचे म्हणणे ऐकलेही जात नसल्याने खरे दुखणे आहे.परिणामी त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसावे.निष्ठावंत कार्यकर्ते पक्षविरोधी काम करणार नाही,पण तेच कार्यकर्ते मनापासून कार्यरत झाले नाहीतर पक्षाची हानी होणार हे उघड आहे.म्हणून विधानसभा निवडणुकीपूर्वी जुन्या कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकले पाहिजे.तसे झाले नाही तर कार्यकर्त्यांच्या मनात साठलेला असंतोष ऐन निवडणुकीत उफाळून येऊ शकतो”-विजय वहाडणे,जेष्ठ नेते,भाजप.

  लोकसभा निवडणुकीत राज्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष,मराठा आरक्षण तसेच उत्तर महाराष्ट्रातील कांद्याचा प्रश्न आणि विरोधकांकडून तयार करण्यात आलेले नॅरेटिव्ह रोखण्यात अपयश आल्याने राज्यात भाजपला अपयश मिळाल्याची कबुली राज्यातील एका नेत्याने बोलताना दिली होती.तसेच आगामी विधानसभेला भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष असेल,असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला होता.महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे.23 पैकी फक्त 09 जागा भाजपला वाचवता आल्या आहेत.राज्यातील भाजपचा चेहरा तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील अपयशामुळे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती.मात्र वरिष्ठ नेते आणि संघाने त्यांना तूर्त थांबवले असल्याचे मानले जात आहे.भाजपला निवडणुकांमध्ये हवं तसं मिळालेले नाही.याला अनेक कारणे आहेत.त्यात लोकसभा निवडणुकीत राज्यातील शेतकऱ्यांचा शेतमालाच्या दराचा मुद्दा,कांद्याचा मुद्दा,मराठवाड्यातील मराठा आरक्षण तसेच उमेदवारांची उशीरा झालेली निवड,उशिराने जाहीर केलेली उमेदवारी याचा फटका बसल्याची कबुली देताना भाजप नेत्यांनी सोशल मीडियात देखील विरोधकांकडून तयार करण्यात आलेले नरेटिव्ह थांबवण्यात भाजपला अपयश आल्याची कबुली दिली आहे.मात्र अन्य पक्षातील नेत्यांना पायघड्या तर निष्ठावान भाजप नेत्यांना उपेक्षा वाट्याला आली होती.याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.त्याचा फटका राज्यातच नव्हे तर देशभरच्या उमेदवारांना बसला असल्याचे मानले जात आहे.आगामी दिड महिन्यात देशातील चार राज्यातील निवडणुका संपन्न होत आहे.त्यात देशात आघाडीचे महाराष्ट्र राज्य आहे.त्यामुळे गत निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करण्याची ही योग्य वेळ असून त्या पार्श्वभूमीवर हे प्रसिध्दी पत्रक हाती आले आहे.त्यामुळे त्यास महत्व प्राप्त झाले आहे.

   सदर प्रसिध्दी पत्रकात वहाडणे यांनी पुढे म्हंटले आहे की,”आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाचे अनेक पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्रभर संपर्क अभियान सुरू आहे.भाजपा कार्यकर्त्यांचे मोठमोठे मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जात आहे.संबोधन-प्रबोधन करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने प्रचारयंत्रणा राबविली पाहिजे,सर्वांनी पक्षासाठी झोकून देऊन काम केले पाहिजे असे विचार मांडून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.हे सर्व प्रयत्न अत्यंत उपयुक्तच आहेत यात शंका नाही.पण वर्षानुवर्षे निष्ठेने भाजपाचे काम करणाऱ्या जुन्या-जेष्ठ कार्यकर्त्यांना फारसे विचारात घेतले जात नाही.त्यांचे म्हणणे ऐकलेही जात नसल्याने हे खरे दुखणे आहे.परिणामी त्यांच्यात मोठा असंतोष-नाराजी सर्वत्र जाणवते.त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसावे असे वाटते.निष्ठावंत कार्यकर्ते पक्षविरोधी काम करणार नाहीतच,पण तेच कार्यकर्ते मनापासून कार्यरत झाले नाहीतर पक्षाची हानी होणारच हेही सत्य नाकारून चालणार नाही.म्हणून विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रभर अभियान राबवून जुन्या कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकले गेले पाहिजे.त्यांच्या मनातील नाराजी-असंतोष जाणून घ्यायला हरकत नाही.तसे झाले नाही तर कार्यकर्त्यांच्या मनात साठलेला असंतोष ऐन निवडणुकीत उफाळून आला तर अवघड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.आपण हे म्हणणे आपले नसून ते अनेक कार्यकर्त्यांच्या मनातील आहेत.त्या कार्यकर्त्यांना मनातील भावना मांडण्याची संधी दिल्याने पक्षाचे काहीही नुकसान होणार नाही.कार्यकर्त्यांच्या निष्ठेची जाणीव ठेवून त्यांना व्यक्त होऊ द्यावे.पक्ष व नेत्यांकडून कार्यकर्त्यांना सातत्याने मार्गदर्शन व सूचना चालूच असतात.पण कार्यकर्त्यांनी कुणासमोर आपल्या व्यथा-मनोगत मांडायच्या हाच प्रश्न आहे.म्हणूनच आपण या पत्राची दखल घ्यावी असे आवाहन माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केले आहे.आता पक्षाचे नेते यावर काय भूमिका घेणार याकडे राज्यातील निष्ठावान कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close