निवडणूक
गडकरींच्या पराभवासाठी रचला भाजपनेच डाव !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर येथील निवडणुक नुकतीच पार पडली यात मतदारांनी मतदान केलेच नाही.याच बरोबर आर.एस.एस.भाजपचा जो मतदार आहे त्यापैकी ६७% लोकांनी जाणीवपूर्वक मतदान केले नाही करीता नागपूर मधे केवळ ४९% मतदान झाले असल्याची विश्वसनीय बातमी आहे.
गेली अनेक वर्ष गडकरी विरूध्द भाजप असा संघर्ष दिसत होता याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर झाला असे मत नागपूरकर व्यक्त करत आहेत.नितिन गडकरी हे विकास पुरुष आहेतच यात शंकाच नाही यास सर्व देशवासीयांची मान्यता आहे.याच बरोबर ते स्वतःला एक साधारण स्वयंसेवक आणि भाजप सदस्य समजतात.भाजप कडुन दोन वर्ष अगोदरच महत्वपूर्ण पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे मानले जात आहे.यामुळे त्यांची भाजपवर असलेली पकड कमजोर झाली असल्याचे खात्रीलायक समजते.
ज्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांना नगरसेवक ते महापौर आणि महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्रीपद मिळवून देण्यात नितीन गडकरी यांची भुमिका महत्वपूर्ण आहे.मात्र त्यांनी त्यांच्यासाठी काय केले आहे प्रश्न निरुत्तर करणारा असल्याचे भाजपमधील जेष्ठांचे म्हणणे आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस त्यांचा विश्वासघात करणार हे अनेकांना माहितच होते परंतु गडकरी यांचा भरोसा मतदारांवर होता त्यामुळेच मला प्रचार करायची गरज नाही असे ते वारंवार बोलत होते.
देशाचे पंतप्रधान व भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी नागपूर जवळ दोन सभा घेतल्या पहिली चंद्रपूर आणि दुसरी रामटेक यादरम्यान नागपूर येथे एक दिवस मुक्कामही केला परंतु नितीन गडकरी यांचा प्रचार करणे सोडा त्यांना भेटण्यापासुन रोखलं गेलं अशी जोरदार चर्चा आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघात मतांची टक्केवारी पाहिली तर भाजप बहुल भागात २० % पेक्षाही कमी मतदान झाले.२०१९ च्या निवडणुकीत याच भागात ७३.८९% मतदान झाले होते आणि यामुळेच नितिन गडकरी प्रचंड बहुमताने निवडून आले.आता भाजपचा मतदार गेला कुठे कोणी रोखलं हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आणि गंभीर आहे.
“अबकी बार ४०० पार”चा नारा देणारे मोदी यांना ४०० मधे नितिन गडकरी का नको असा सवाल तेथील मतदार करत त्यांना करत आहेत.
भाजपचे दिग्गज नेते विकास पुरुष नितिन गडकरी यांची लोकप्रियता संपूर्ण भारतात आहे.२०२४च्या निवडणुकीत गडकरी पंतप्रधान पदावर दावा करतील अशी साधार भिती मोदी-शहांना वाटते म्हणून जर गडकरींना पाडलं तर त्यांना बोलायचा नैतिक अधिकार रहाणार नाही परिणामी त्यांना मागच्या दाराने राज्यसभेत त्यांना घेऊन एखाद-दुसरं मंत्रिपद देऊ असा आशय अमित शहा यांनी व्यक्त केला असल्याची माहिती आहे.
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्या प्रचारार्थ योगी यांना जाणीवपूर्वक का पाठवल गेलं,कारण नितिन गडकरी यांची मुस्लिम प्रभागात चांगलीच पकड आहे आणि मुस्लिम मतदान गडकरी यांना मिळु नये याकरताच योगाची सभा झाली असं स्थानिकांत बोलल जात आहे.
काहिच दिवस अगोदर नितिन गडकरी यांचे चिरंजीव यांनी मुस्लिम बहुल भागात सभा घेतल्या त्यात त्यांनी सांगितलं कि,”माझ्या वडिलांवर भाजपच मोठ संकट आहे आणि भाजप त्यांना निवडणुकीत पाडणार असुन आमची इज्जत तुमच्या हातात आहे” असं भावनिक आवाहन केल होतं.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीच्या सभेमुळे नागपूर येथील मुस्लिम मतदार मोठ्याप्रमाणात गडकरी यांच्या विरोधात गेला.गडकरींना सांगावं लागलं कि,”मि स्वतः योगी यांना बोलावलं नाही तो भाजपचा प्रोटोकॉल होता”
याचा अर्थ स्पष्ट आहे नितिन गडकरी यांना नागपूर लोकसभा मतदारसंघात पराभूत करण्याच कटकारस्थान भाजपने केला.रंगा बिल्ला घाबरला आहे देशात मोदी विरूध्द लाट पसरली असुन कॉंग्रेस च्या जाहीरनाम्यात देश विकासाच्या अनेक तरतुदी आहेत मात्र भाजपचा जाहीरनामा याऊलट आहे आणि प्ररचारातही मोदी आता फक्त हिंदू मुस्लीम,गांधी,नेहरू करताना दिसतात.परंतु त्यांना काय करायच किंवा मागील दहा वर्षात काय केल हे सांगता येत नाही.
नागपूर लोकसभा मतदारसंघात विकास पुरुष नितिन गडकरी पराभूत झाले तर यात भाजपची विशेषतः मोदी शहची भुमिका महत्वपूर्ण असेल असे मानले जात आहे.
साभार-नितिन बोदे,राजकीय अभ्यासक