जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

शिक्षक मतदारसंघ निवडणूक पुढे ढकलली,भाजपचा कोल्हेना दणका ?

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण व मुंबई विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच मुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील रिक्त झालेल्या जागांकरिता भारतीय निवडणूक आयोगाने दि.०८ मे २०२४ रोजी द्विवार्षिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी असे निवेदन आयोगाकडे प्राप्त झाले होते त्या नुसार हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असला तरी यावर कोपरगाव तालुक्यातील राजकारणावर मोठा प्रतिकूल परिणाम होणार असून याची उमेदवारी विवेक कोल्हेना देऊनही आपली पुढील चाल खेळली असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसुल मंत्री राधाकृष्ण विखे यांना मात करण्याच्या नादात तोंडघशी पडण्याचा अनास्था प्रसंग गुदरला असल्याचे बोलले जात आहे.

 

लोकसभा निवडणुकीपूर्वी कोल्हे वस्ती येथील बैठकीत लोकसभा निवडणुकीत सक्रिय होण्यासाठी त्यांनी विधान परिषद शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूकित उमेदवारी देण्याचा शब्द घेतला होता अशी माहिती उपलब्ध झाली असून सदर जागा हि येवल्याचे आ.किशोर दराडे हे भूषवत आहे.त्यामुळे सदर तडजोडीमुळे (सौद्यामुळे) ईशान्य गडावरील सर्व यंत्रणा जोरात कामाला लागली असताना हि  निवडणूक पुढे ढकलून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पुढील खेळी खेळली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी पार पडलं आहे.राज्यातील ११ तर देशातील ९६ मतदारसंघातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला असला तरी आपल्या महायुती आणि महाआघाडी मधील घटक पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना एकत्र करण्यात या महायुती आणि महाआघाडीतील वरिष्ठ नेत्यांना मोठी किंमत चुकवावी लागली असल्याची माहिती आहे. शिर्डी मतदार संघातील कोपरगाव तालुक्यातील माजी आ.स्नेहलता कोल्हे त्यांचे पती कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे,युवराज विवेक कोल्हे आदींना सक्रिय करण्यात भाजप शिर्षस्थ नेत्यांची मोठी ऊर्जा खर्ची पडली होती.त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी येथे माजी आ.स्नेहलता कोल्हे यांची भेट घेऊनही उपयोग झाला नव्हता.त्या नंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,त्या पाठोपाठ राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि आपल्या पायधूळ गोदावरी डाव्या कालव्याच्या कडेला झाडली होती.यांनी आपली पत पणाला लावली होती.मात्र त्यात त्यांना यश आले नाही.अखेर भाजपला आपल्या ठेवणीतील अस्त्र बाहेर काढावे लागले होते; नव्हे हि ईशान्य गडाची थेट अटच होती.त्यामुळे शिर्डी दौऱ्यात त्यांनी कोपरगाव शहरातील सभा प्रस्तावित करून सर्व प्रमुख कार्यकर्ते तहसील मैदानाच्या ठिकाणी नादी लावून आपल्या वस्तीवर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना बोलावून त्यांचे आगतस्वागत केले होते.व त्या ठिकाणी जेष्ठ नेते बिपीन कोल्हे आणि माजी आ.स्नेहलता कोल्हे या हजर होत्या.मात्र युवराज यांनी महसूल मंत्री विखे यांना मात देण्यासाठी बैठकीस सोयीस्कर दांडी मारली होती.नव्हे तसे आपले बोटे सोडविण्यासाठी ‘ती’ चाल खेळली होती मात्र या राजकीय चाणक्यासमोर त्याची दांडी उडाली असल्याचे मानले जात आहे.

  दरम्यान सदर बैठकीत लोकसभा निवडणुकीत सक्रिय होण्यासाठी त्यांनी विधान परिषद शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूकित उमेदवारी देण्याचा शब्द घेतला होता अशी माहिती उपलब्ध झाली असून सदर जागा हि येवल्याचे आ.किशोर दराडे हे भूषवत आहे.त्यामुळे सदर तडजोडीमुळे (सौद्यामुळे) ईशान्य गडावरील सर्व यंत्रणा जोरात कामाला लागली होती.त्यांनी आपल्या घोड्याना नाल,मेख,तंग तोबरा करून आपल्या तोफा बाहेर काढल्या होत्या.व मतदार संघात आपली यंत्रणा कामाला लावली होती अशी माहिती हाती आली आहे.

   दरम्यान कोल्हे पती-पत्नीनी नाशिक विधान परिषद शिक्षक मतदार संघात विवेक कोल्हे यांना आगामी १० जून रोजी संपन्न होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शद्ब पक्का केला होता.सदर बैठकीनंतर लागलीच आपले घोडे बाहेर काढून शिर्डी लोकसभा मतदार संघाची निवडणूक सोडून आधी आपल्या लक्षाकडे आगेकूच सुरु केली होती व शिक्षकांच्या याद्या काढून भेटीगाठी सुरु केल्या होत्या अशी माहिती आहे.त्यात यावल,जामनेर,जळगाव आदी भागात आपल्या गाड्या आणि यंत्रणेतील मनुष्य बळ कामाला लावले होते.मात्र हे समाधान त्यांना जास्त दिवस मिळवता आले नाही.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी लोकसभेची मतदानापर्यंत आपली खेळी यशस्वी करून लागलीच मुंबई गाठल्या गाठल्या चौथ्या टप्प्यातील निवडणूक संपन्न झाल्याझाल्या त्यांनी निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नंतरच्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन ईशान्य गडाच्या शिडातील हवा काढून घेतली असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे फडणवीस-विखे जोडगुळीस भारी पडण्याच्या नादात त्यांनी आपले हसे करून घेतले असल्याचे मानले जात आहे.आता आगामी काळात ईशान्य गडावरील नेते आता कोणती चाल खेळणार व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना मात देणार याकडे तालुक्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close