आरोग्य
…या ट्रस्ट मार्फत आता ग्रामीण भागात मोफत वैद्यकीय सुविधा !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीतील जंगली महाराज ट्रस्टच्या आत्मा मालिक हॉस्पिटलचा फिरता दवाखाना प्रामीण भागासाठी नाविन्यपूर्ण आरोग्यसेक मोबाईल हॉस्पिटल सेवा आता खोडोपाडी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती डॉ.यांनी आज सकाळी १०.४५ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांचे वतीने डॉ.मयुर शिंदे यांनी दिली आहे.

ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेच्या अपुर्तेमुळे लोकांना अनेक हाल सोसावे लागतात, जसे की वेळेवर उपचार न मिळणे, आरोग्य सुविधांचा अभाव आणि अपुरे वैद्यकीय कर्मचारी.यामुळे गंभीर आजार बळावतात आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात.या परिस्थितीमुळे लोकांमध्ये आरोग्य साक्षरतेचा अभाव दिसून येतो आणि आरोग्याविषयी माहितीचा मर्यादित प्रवेश असतो.वैद्यकीय सेवेच्या अपुर्तेचे विपरीत परिणाम होत असून त्यामुळे त्यांना वेळेवर उपचार न मिळत नाही.तातडीच्या आणि आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी शहरांमध्ये जावे लागते,ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातात.परिणामी त्यांना गंभीर आजार होऊन प्रसंगी मृत्यू येतो.प्राथमिक उपचारांच्या अभावामुळे छोटे आजार गंभीर रूप धारण करतात आणि काही वेळा मृत्यूलाही आमंत्रण देतात.याची गंभीर दखल घेऊन आत्मा मालिक हॉस्पिटलने ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अत्यंत माफक दरात अत्याधुनिक सुविधा,देण्यासाठी हे पाऊल उचले आहे व आधुनिकीकरण केले आहे.

“आत्मा मालिक हॉस्पिटल मध्ये या शिवाय एक्स-रे व सोनोग्राफी सुविधा-डिजिटल एक्स-रे,सोनोग्राफी,कलर डॉपलर सुविधा औषध वितरण -24 तास मेडिकल स्टोअर,डॉक्टरांनी दिलेल्या सर्व औषधांची उपलब्धता फिरता दवाखाना उपलब्ध होणार आहे.त्यातून ग्रामपातळीवर नियमित आरोग्य तपासणी,बी.पी.,शुगर, प्राथमिक उपचार,औषध वितरण पूर्णपणे मोफत,गंभीर रुग्णांसाठी रुग्णवाहिका व रेफरल सेवा. विमा योजनांतर्गत उपचार- महात्मा फुले जनआरोग्य योजना,आयुष्मान भारत योजना पात्र रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार.चोवीस तास रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे”-डॉ.मयूर शिंदे, व्यवस्थापक.आत्मा मालिक हॉस्पिटल.
वर्तमान काळात हॉस्पिटलमध्ये खालील सर्व सुविधा नियमितपणे चोवीस तास आपत्कालीन सेवा आठवड्याचे सातही दिवशी देण्याचा निर्णय घेतला आहे असे डॉ.शिंदे यांनी सांगितले आहे.
दरम्यान यात आपत्कालीन रुग्ण सेवा प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग स्टाफ,ऑक्सिजन सुविधा,अत्यावश्यक औषधे सतत उपलब्ध होत आहे.तर ओपीडी सेवा जनरल मेडिसिन ओपीडी,बालरोग विभाग,सर्जरी,ऑर्थो ओपीडी,सेवा पुरविण्यात येणार आहे.,साप्ताहिक स्पेशालिस्ट डॉक्टर भेट आयसीयू व क्रिटिकल केअर अत्याधुनिक आयसीयू ,व्हेंटिलेटर सुविधा,मॉनिटरिंग सिस्टीम, प्रशिक्षित आय.सी.यू.स्टाफ नवजात बालकांसाठी प्राथमिक उपचार NICU ऑपरेशन थिएटर (OT)- पूर्णपणे आधुनिक OT.जनरल व छोटी-मोठी शस्त्रक्रिया सर्व आधुनिक उपकरणांसह निर्जंतुक वातावरण लॅबोरेटरी- रक्त तपासणी,मूत्र तपासणी,शुगर, हिमोग्लोबिन,युरिक ऍसिड,लिपिड प्रोफाइल इतर सर्व आवश्यक तपासण्या होणार आहे.

दरम्यान या शिवाय एक्स-रे व सोनोग्राफी सुविधा-डिजिटल एक्स-रे,सोनोग्राफी,कलर डॉपलर सुविधा औषध वितरण -24 तास मेडिकल स्टोअर,डॉक्टरांनी दिलेल्या सर्व औषधांची उपलब्धता फिरता दवाखाना उपलब्ध होणार आहे.त्यातून ग्रामपातळीवर नियमित आरोग्य तपासणी,बी.पी.,शुगर, प्राथमिक उपचार,औषध वितरण पूर्णपणे मोफत,गंभीर रुग्णांसाठी रुग्णवाहिका व रेफरल सेवा. विमा योजनांतर्गत उपचार- महात्मा फुले जनआरोग्य योजना,आयुष्मान भारत योजना पात्र रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार.चोवीस तास रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे.त्यात ऑक्सिजन सुविधा,प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध राहणार आहे.परिणामी ग्रामस्थांना फिरता दवाखाना मोबाइल हॉस्पिटल सेवा उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घराजवळ उच्च दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.

यात बहुतांशी सेवा मोफत देण्यात येणार आहे.त्यासाठी ग्रामीण भागात प्रशिक्षित डॉक्टर सोबत असणार आहे.
गावनिहाय वेळापत्रक ठरविण्यात येणार आहे.त्यात राहाता तालुक्यातील रुई,पुणतांबा आदी गावात ही वैद्यकीय गाडी जाणार आहे.
दरम्यान त्यात राहाता तालुक्यातील सोमवार रुई – सकाळी १० ते १२ शिंगवे–दुपारी १२.३० ते ०२.३० पुणतांबा–दुपारी ०३ ते ०८.३०, मंगळवार जवळके -सकाळी १० ते १२ बहादरपूर -दुपारी १२.३० ते ०२.३० सायाळे – दुपारी ०३ ते ०५.३०,बुधवार खंबाळा – सकाळी १० ते १२,धोत्रे दुपारी १२.३० ते ०२.३० खोपडी – दुपारी ०३ ते ०५.३० गुरुवार सावळीविहिर – सकाळी १० ते १२ कनकुरी – दुपारी १२.३० ते ०२.३० नांदुर्खी -दुपारी दुपारी ०३ ते ०५.३०,शुक्रवार- पिंपळवाडी -सकाळी १० ते १२ एकरखे–दुपारी १२.३० ते ०२.३० रामपूरवाडी- दुपारी ०३ ते ०५.३०,रविवार दहेगाव,पिंपळस,केलवड -सकाळी १० ते १२ खडकवाके- दुपारी १२.३० ते ०२.३० निर्मळ पिंपरी -दुपारी ०३ ते ०५.३० आदी ठिकाणी ही वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे.याचा ग्रामीण भागातील ग्रामस्थानी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.मयूर शिंदे यांनी शेवटी केले आहे.



