जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

“शेती मालाचे भाव का घसरले उत्तर द्या; अन्यथा…”-खा.लोखंडेना खडसावले !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

शिर्डी लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात रंगात आली असून या टप्प्यात सत्ताधारी भाजप आणि मित्र पंक्षांची महायुती आणि विरोधी आघाडीची महाआघाडी उमेदवार मतांच्या बेगमीसाठी गावोगाव फिरत असताना खा.सदाशिव लोखंडे यांनीं दहा वर्षे मतदार संघात पाठ फिरवल्याची चांगलीच किंमत चुकवावी लागत असून नुकतीच कोपरगाव नजीक असलेल्या टाकळी ग्रामपंचायत हद्दीत प्रचार सभा सुरु असताना तेथील शेतकरी मनीष देवकर यांनी त्यांना शेती प्रश्नांवर चांगलेच फैलावर घेतले असून टोमॅटो,कांदा,सोयाबीनच्या पडलेल्या भावाच्या प्रश्नावर आपण संसदेत काय आवाज उठवला असा सवाल केला असता त्यांनी असंबद्ध माहिती देण्यास सुरुवात केली असता त्यांची चांगलीच हजेरी घेतली असून देवकर यांनी त्यांची चांगलीच दांडी उडवल्याने शिर्डी लोकसभा मतदार संघात सर्वत्र याच चर्चेचे उधाण आले आहे.

  

  दरम्यान संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे ग्रामपंचायत हद्दीतील भागवतवाडी येथील हनुमान मंदिरात अशीच घटना घडली असून तेथील ग्रामस्थानीं,”आम्हाला तुम्ही दहा वर्षात खासदार निधीतील सभा मंडपासाठी फुटकी कवडी दिली नाही” अशी तक्रार करून त्यांना बोलण्यास विरोध केला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून त्यांना तेथून आपला बाडबिस्तर आवरता घ्यावा लागला आहे.

   शिर्डी लोकसभा मतदार संघ हा अ.नगर जिल्ह्यातील उत्तर भागात येत असला तरी तो आरक्षणात येत असल्याने अ.नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार येथे आरक्षणामुळे देण्यात येताना दिसून येत आहे.ठाकरे गटाने येथे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना महाआघाडीकडून उमेदवारी दिली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने विद्यमान खा.सदाशिव लोखंडे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला असला तरी त्यांनी उमेदवारी देऊन तोंड झोडण्याचा वेळ आली असल्याचे दिसून येत आहे.वंचित बहुजन आघाडीनेही येथून काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी दिली असून प्रहार-जनशक्ती अभिजित पोटे यांना उमेदवारी देऊन आपली शक्ती आजमावत असले तरी त्याबाबत ते पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.तर सर्व मिळून वीस जण आपले नशीब आजमावत आहे.मात्र या मतदारसंघात सदर लढती कशा होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.उन्हाळ्याची उष्णता वाढून सर्वत्र जीवांची होरपळ होत असताना निवडणुकीचे वातावरणही चांगलेच तापताना दिसत असून गावोगावी शेतकरी आणि मराठा आरक्षण हे मुद्दे सत्त्ताधारी वर्गाची चांगलीच पंचायत करताना दिसत आहे.
  देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी,नितीन गडकरी आदी नेते चांगले काम करत असले तरी शिर्डीत मात्र लोकसभा मतदार संघात त्यांच्या नावावर निवडून आलेले निष्क्रिय खासदार असल्याने व त्यांना अवघ्या चौदा दिवसात खासदारकी (आंधळ्याच्या टाळीत कावळा गवसल्याने) मिळाल्याने त्यांची किंमत त्यांना कळाली नाही त्यामुळे त्यांनी या मतदार संघात पाठ फिरवल्याने एकनाथ सेनेचा मित्र पक्ष असलेल्या भाजपची चांगलीच पंचायत झाली आहे.नाही म्हणायला भाजपने शेती मालाचा कचरा केल्याने व दूध भावाची नीचांकी घसरण केल्याने शेतकरी अच्छा खांसा नाराज आहे.त्यामुळे दिसेल तेथे शेतकरी सत्ताधारी गटास टोकताना दिसत असून भाजपचा मित्र पक्षाचे खासदार सदाशिव लोखंडे यांना या अडचणीचा सामना करावा लागत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे उघडकीस आली असून त्यांचा दौरा शनिवार दि.०४ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता दत्त मंदिर येथे असतां त्याची त्यांच्या समर्थकांनी पूर्ण तयारी केली होती.


  

 

दरम्यान त्या ठिकाणी सदर बैठक सुरु झाली असतांना तेथील प्रगतशील शेतकरी मनीष देवकर यांनी खा.लोखंडे यांना शेती प्रश्नावर घेरले व तुम्ही गत दहा वर्षांत शेती मालाच्या पडलेल्या भावावर किती प्रश्न विचारले असा थेट सवाल केला.खा.लोखंडे यांनी आपण संसदेत ११८ प्रश्न विचारल्याची मल्लिनाथी केली असता त्यांनी देवकर यांनी यात सोयाबीन,कांदा,टोमॅटो आदी वर किती प्रश्न विचारले असा थेट भिडणारा सवाल केला असता देवकर यांनी माझ्याकडे तुम्ही संसदेत विचारलेल्या प्रश्नांचा डाटा असल्याचे सांगितले त्यामुळे खा.लोखंडे यांची पाचावर धारण बसली असल्याचे दिसून आले आहे.याखेरीज देवकर यांनी पंतप्रधान मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या सौर वाहिनी सौर पंप याबाबत छेडले व नाशिक जिल्ह्यात प्रत्येक गावात १०-२० शेतकऱ्यांना सौर पंप मिळाले असल्याची अधिकची माहिती दिली असता शिर्डी लोकसभा मतदार संघात किती शेतकऱ्यांना तुम्ही सौरपंप दिले अशी माहिती विचारली त्यावेळी त्यांनीं असंबंध निळवंडे धरणाची माहिती दिली त्यावेळी त्यांनी त्या ब याबत आम्ही विचारले नाही ते काम निळवंडे कालवा कृती समितीने उच्च न्यायालयात जाऊन केले आहे ते सांगू नका आम्ही सर्व सज्ञान आहे.त्यावेळी त्यांनी दुसरे अस्त्र बाहेर काढून,”पश्चिमेचे पाणी आपण आणणार” असल्याची भलामण करणारी माहिती दिली असता त्या बाबत देवकर यांनी,”त्या बाबत तुम्हाला विचारले नाही व तुम्ही जे विचारले त्यावर बोला” असे दटावले असता चेहरा पाहण्यालायक झाला त्यावेळी तेथील सुरक्षेतील अधिकाऱ्याने,”पुढे जायला उशीर होत असल्या”चे सांगून खा.लोखंडे यांची कशीबशी सुटका केल्याने त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.याची सर्व शिर्डी लोकसभा मतदार संघात जोरदार उलटसुलट चर्चा सुरु आहे.

   दरम्यान संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे ग्रामपंचायत हद्दीतील भागवतवाडी येथील हनुमान मंदिरात अशीच घटना घडली असून तेथील ग्रामस्थानीं,”आम्हाला तुम्ही दहा वर्षात खासदार निधीतील सभा मंडपासाठी फुटकी कवडी दिली नाही” अशी तक्रार करून त्यांना बोलण्यास विरोध केला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे खा.लोखंडे यांची सर्वत्र प्रचार करताना पंचायत होत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत असून मतदार संघात न फिरल्याची चांगलीच किंमत चुकवावी लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close