जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

खा.लोखंडे जनसेवा करण्यात अपयशी-…या आमदारांचा घरचा आहेर !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी लोकसभा मतदार संघातील जनतेच्या अपेक्षा दहा वर्षात पूर्ण करण्यात खा.सदाशिव लोखंडे कमी पडले असल्याचा घरचा आहेर नुकताच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे यांनी नुकताच दिला आहे.त्यामुळे शिर्डी मतदार संघात उलटसुलट चर्चेला उधाण झाले आहे.त्यामुळे उपस्थितांत खा.लोखंडे यांना हा घरचा आहेर मानला जात आहे.

खा.लोखंडे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या विजय संकल्‍प मेळावा प्रसंगी बोलताना आ.आशुतोष काळे.

“राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या सहकार्यामुळे व दिलेल्या निधीमुळे कोपरगाव मतदार संघाचा विकास झालेला आहे.शिर्डीचे खा.लोखंडे यांना मागील निवडणुकीत निवडून देण्यात कोपरगाव मतदार संघातील मतदारांचे मोठे योगदान राहिले असून हि परंपरा यावेळी देखील अबाधित राहणार आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.


   शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडूक जाहीर झाली असून इच्छुकांनी आपला प्रचार सुरु केला उमेदवारी भरण्यास दि.१८ एप्रिल पासून प्रारंभ होत आहे.त्यातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात नुकताच महायुतीच्‍या वतीने विजय संकल्‍प मेळावा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.आशुतोष काळे हे होते.

खा.लोखंडे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या विजय संकल्‍प मेळावा प्रसंगी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे,शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर,खा.सदाशिव लोखंडे,आ.आशुतोष काळे आदी मान्यवर.

  

दरम्यान या मेळाव्यास महायुतीत असताना माजी आ.स्नेहलता कोल्हे या व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र अनुपस्थितीत राहिले असल्याचे दिसून आले असून हि अनुपस्थिती मोठा चर्चेचा विषय ठरली आहे.गणेश सहकारी कारखाना निवडणुकीत महसूल मंत्री विखे व कोल्हे यांच्यात मोठे वितुष्ट आल्याने हि परिस्थिती ओढवली असल्याचे बोलले जात आहे.

सदर प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे,शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर,महानंदाचे माजी अध्यक्ष राजेश परजणे,माजी आ.भाऊसाहेब कांबळे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणेआदींसह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    सदर प्रसंगी आ.काळे पुढे म्हणाले की,”निवडणुका आल्या की,विकासाचे मुद्दे येतात.त्यामुळे खा.लोखंडे यांनी निवडून आल्यानंतर कोपरगाव मतदार संघाकडे लक्ष द्यावे.२०१४ ते २०२४ मध्ये जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात तुम्ही कमी पडलात ते यापुढे होवू देवू नका” असा घरचा आहेर देऊन त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी केलेल्या सहकार्यामुळे व दिलेल्या निधीमुळे कोपरगाव मतदार संघाचा विकास झालेला आहे.शिर्डीचे खा.लोखंडे यांना मागील निवडणुकीत निवडून देण्यात कोपरगाव मतदार संघातील मतदारांचे मोठे योगदान राहिले असून हि परंपरा यावेळी देखील अबाधित राहणार असून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देणार असल्याचा विश्वास आ.काळे यांनी व्यक्त केला आहे.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील संकटे थांबता थांबत नाही.एका संकटाशी संघर्ष सुरु असतांनाच दुसरे संकट उभे राहत आहे.दुष्काळी परिस्थितीत समन्यायीचे भूत अगोदरच गोदावरी कालव्यांच्या मानगुटीवर बसलेले असून त्याचा परिणाम मिळणाऱ्या आवर्तनावर होत असल्यामुळे लाभक्षेत्रावर मोठा अन्याय झाला आहे त्याबाबत प्रत्येक अधिवेशनात आपण आवाज उठविला आहे.सरकार कोणतेही असो सातत्याने नगर-नाशिकच्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असून त्याबाबत बैठका घ्याव्यात व अन्याय दूर करून दिलासा द्यावा.नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यावर १० वक्राकार दरवाजे बसविले जाणार असल्यामुळे गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोच्या पाण्यापासून मुकावे लागू शकते यामध्ये देखील लक्ष घालण्याची मागणी त्यांनी पालकमंत्री विखे यांच्याकडे केली.गोदावरी कालव्याचे सिंचनाचे आवर्तन आटोपले असून धरणात जवळपास साडे तीन ते चार टीएमसी पाणी उपलब्ध आहे.त्यामुळे दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनासाठी देखील आवर्तन होवू शकते त्याबाबत पालकमंत्र्यांनी सहकार्य करावे.यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे मतदार संघातील पूर्व भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेल्या पालखेड कालव्याच्या आवर्तनातून पाणी द्यावे त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी पालकमंत्री ना.विखे यांच्याकडे त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close