निवडणूक
…या ग्रामपंचायतीची दुरंगी लढत

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जवळके ग्रामपंचायतीच्या,’सरपंच’ पदासह सात सदस्यांच्या निवडणुकीत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आ.आशुतोष काळे गटाविरुद्ध
स्थानिक सत्यशोधक पॅनल व माजी सरपंच बंडोपंत थोरात यांच्या युतीची दुरंगी लढत होत असून यात सरपंच पदासाठी थोरात सारिका विजय (सत्यशोधक गट) व पोकळे रुपाली नवनाथ (काळे गट) यांच्यात सरळ लढत होत आहे.त्याकडे जवळके आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

राज्यभरातील सुमारे २ हजार ३६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे.नुकतेच आपले नामनिर्देशन पात्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी इच्छुक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.त्यात जवळकेसह कोपरगाव तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतीत निवडणूक होत आहे.
दरम्यान यात सरपंच पदासाठी स्थानिक गटाच्या थोरात सारिका विजय व काळे गटाच्या पोकळे रुपाली नवनाथ यांच्यात सरळ लढत होत आहे.
दरम्यान प्रभाग क्रमांक एक मध्ये सर्वसाधारण पुरुष जागेसाठी थोरात भाऊसाहेब कचरू यांची लढत थोरात सौरभ रावसाहेब यांचेशी होत आहे.तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या पदासाठी थोरात अर्चना संतोष यांची वाकचौरे वनिता रखमा यांचेशी लढत होत आहे.तर सर्वसाधारण महिला या पदासाठी थोरात मिना विठ्ठल यांची लढत सरवार मोनिका राहुल यांचेशी होत आहे.
तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये सर्वसाधारण पुरुष जागेसाठी थोरात सुनील वामन यांची लढत थोरात सुनील सोपान यांचेशी तर सर्वसाधारण महिला या जागेसाठी वाकचौरे भाग्यश्री सचिन यांची गाठ शिंदे इंदूबाई नवनाथ यांचेशी पडली आहे.
दरम्यान प्रभाग क्रं.तीन मध्ये सर्वसाधारण पुरुष गटात थोरात अरुण भास्कर यांचा थोरात सोमनाथ नवनाथ (काळे गट)यांचेशी सामना होत आहे.तर सर्व साधारण महिला या गटात थोरात योगिता गणेश यांची लढत वाकचौरे रोहिणी गोरक्षनाथ यांचेशी होत आहे.
दरम्यान या लढतीसाठी जनमंगल ग्रामविकास संस्थेचे संस्थापक नानासाहेब जवरे,जलसंपदाचे माजी उपअभियंता एस.के.थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,बंडोपंत थोरात,जेष्ठ कार्यकर्ते रावसाहेब सु. थोरात,दत्तात्रय थोरात,बाळासाहेब थोरात,बाबासाहेब थोरात,माजी उपसरपंच नवनाथ थोरात,डी.के.थोरात,नवनाथ पन्हाळे,अलकाताई शिंदे,संजय थोरात,नवनाथ शिंदे,आण्णासाहेब भोसले,ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सुनीता रा.थोरात,राजेंद्र थोरात,रामनाथ थोरात,जनमंगल ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव थोरात,बाळासाहेब थोरात,प्रशांत थोरात,परशराम शिंदे,विजय शिंदे,गोरक्षनाथ शिंदे,संदीप थोरात,आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.