जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

…या कारखाना संचालकांची,’विमान वारी’ हुकणार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या ठरणाऱ्या कुंभारी,घोयेगाव,ब्राम्हणगाव,वारी,जवळके,धोत्रे,बोलकी,सुरेगाव,लौकी,मुर्शतपूर,चांदगव्हाण,दहीगाव बोलका, कारवाडी,पोहेगाव,शहाजापूर,मंजूर,कान्हेगाव आदी ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या आधी ऐन दिवाळीत वातावरण स्फोटक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.त्यामुळे तालुक्यात आगामी काळात मातब्बर समजले जाणारे आ.आशुतोष काळे.माजी आ.कोल्हे व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे या प्रमुख गटांसह शिवसेना उद्धव गट आदींत हि रंगत रंगणार आहे.त्यामुळे कार्यकर्ते या आधीच आपल्या तोफेत गोळे सज्ज ठेऊन असून ग्रामपंचायतीच्या या शिमग्याने,ईशान्य गड’ सहकारी कारखान्याच्या सहा संचालकांना आपल्या आगामी काळात होणाऱ्या परराज्य विमान वारीला मुकावे लागणार असल्याची विश्वसनिय माहिती हाती आली आहे.

दरम्यान या निवडणुकीच्या आत कोपरगाव तालुक्यातील ईशान्य गडावरील संचालकांना त्यांच्या नेत्यांनी कारखान्यास राष्ट्रीय पातळीवर मिळालेला पुरस्कार स्विकारण्यासाठी येत्या ११ ऑक्टोबर रोजी मुंबईवरून विमानाने उत्तर प्रदेश कानपुर येथील परराज्य वारी घडविण्याचे ठरवले होते.मात्र निवडणूक घोषणांची कुणकुण लागताच त्यांनी ज्या गटातील ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर होणार आहे अशा सहा संचालकांना आपल्या दौऱ्यातून अचानक वगळले आहे.

राज्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर पडत असताना ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा लवकरच उडणार आहे.तशी माहिती नुकतीच राज्य निवडणूक आयोगाने दिली आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदांच्या तसेच सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी मतदान होणार आहे.

राज्यभरातील सुमारे २ हजार ३६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी मुंबईत नुकतीच केली आहे.

संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे.नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील.नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील.त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.०५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.मतमोजणी ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी होईल.मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.तेथे ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी संपन्न होणार आहे.

कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या यात सतरा ग्रामपंचायती असून यात कुंभारी,घोयेगाव,ब्राम्हणगाव,वारी,जवळके,धोत्रे,बोलकी,सुरेगाव,लौकी,मुर्शतपूर,चांदगव्हाण,दहीगाव बोलका, कारवाडी,पोहेगाव,शहाजापूर,मंजूर,कान्हेगाव आदी ग्रामपंचायतीचा समावेश असल्याची अधिकृत माहिती कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी दिली आहे.

दरम्यान यात कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या यात सतरा ग्रामपंचायती असून यात कुंभारी,घोयेगाव,ब्राम्हणगाव,वारी,जवळके,धोत्रे,बोलकी,सुरेगाव,लौकी,मुर्शतपूर,चांदगव्हाण,दहीगाव बोलका, कारवाडी,पोहेगाव,शहाजापूर,मंजूर,कान्हेगाव आदी ग्रामपंचायतीचा समावेश असल्याची अधिकृत माहिती कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी दिली आहे.त्यामुळे या गावातील राजकीय वातावरण तापणार हे ओघाने आलेच.त्यासाठी निवडणूक विभाग आपल्या कामाला लागला आहे.

   दरम्यान या निवडणुकीच्या आत कोपरगाव तालुक्यातील ईशान्य गडावरील संचालकांना त्यांच्या नेत्यांनी कारखान्यास विविध उपपदार्थ निर्मितीत राष्ट्रीय पातळीवर मिळालेला पुरस्कार स्विकारण्यासाठी येत्या ११ ऑक्टोबर रोजी मुंबईवरून विमानाने उत्तर प्रदेश कानपुर येथील परराज्य वारी घडविण्याचे ठरवले होते.मात्र निवडणूक घोषणांची कुणकुण लागताच त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी ज्या गटातील ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर होणार आहे अशा सहा संचालकांना आपल्या दौऱ्यातून अचानक वगळले आहे.त्यामुळे त्यांना आता आपला मोर्चा ग्रामपंचायतीकडे वळवुन आपल्या ग्रामपंचायतीसाठी मतांची बेगमी करावी लागणार आहे.त्यामुळे त्यांच्यात अच्छि-खांसी नाराजी पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close