नदी प्रदूषण
…’त्या’ साखर कारखान्यांचा ‘स्पेंट वॉश’ ठरला जमिनीसाठी डोकेदुखी !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
साखर व दारु कारखानदार त्याच त्या क्षेत्रात वारंवार स्पेन्ट वॉश ओतताना दिसत असून परिणामी शेतीचा पोत खराब होत आहे स्पेंट वाॅश हा एक आम्ल पदार्थ असून त्याचा पी.एच.३.५० ते ४.५० असा आहे. हा पदार्थ जमीनीत पडल्या नंतर जमीनीतील जीवाणू नष्ट होतात परिणामी तो जास्त पडल्यानंतर जमीनीत खोलवर त्याचा अर्क उतरतो,त्यामुळे पावसाळ्यात पाण्यासोबत वाहून जाऊन नदी व नाल्याचे पाणी प्रदुषीत होत असून हि मोठी डोकेदुखी ठरली असल्याचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी अ.नगर येथील प्रदूषण महामंडळाला दिलेल्या निवेदनात नुकतेच म्हटले आहे.
संजीवनी कारखान्यानजीक असलेल्या नारंदी नदीतील प्रदूषित झालेले पाणी छायाचित्रात दिसत आहे.
“संजीवनी साखर कारखान्या नजीक असललेल्या नारंदी नदीतील दूषित पाणी जंगलातील वन्य प्राणी पाणी समजून पित आहे.त्यामुळे त्यांच्या जीवनावर मोठा विपरीत परिणाम होत आहे.या ‘स्पेन्ट वाॅश’ मुळे शेजारील गोदावरी नदीपात्राचे पाणी काळेशार झालेले आहे व हे पाणी मुख्यपात्रात मिसळले जाते तर पुढे सडे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे साठवले जात आहे परिणामी ते प्रदुषीत होऊन जलचरांचे भविष्य धोक्यात आले आहे”-संजय काळे,माहिती अधिकार कार्यकर्ते,कोपरगाव.
प्रभूषण महामंडळाला दिलेल्या निवेदनात पुढे काळे यांनी म्हटले आहे की,”पश्चिम महाराष्ट्रातील साखर व दारू कारखानदार हे गेली अनेक वर्षे परिसराच्या शेतकऱ्यांच्या शेतात अनिर्बंध स्पेन्ट वॉश टाकत आहे हि गंभीर बाब आहे.कृषी विद्यापीठाने केवळ एकदाच एका शेतात हेक्टरी दहा हजार लिटर स्पेन्ट वाॅश टाकण्याची अनुमती दिलेली आहे.ज्या क्षेत्रात स्पेन्ट वॉश टाकले त्यां क्षेत्रात विद्यापीठ जाऊन नऊ इंच खोल पर्यंतची माती परिक्षणासाठी घेऊन जाणार असल्याची तरतूद होती.प्रदुषण महामंडळ देखील त्यावर आपला अंकुश ठेवणार अशी त्या प्रकल्पात तरतूद आहे.साखर व दारु कारखानदार त्याच त्या क्षेत्रात वारंवार स्पेन्ट वॉश ओतताना दिसत असून परिणामी शेतीचा पोत खराब होत आहे स्पेंट वाॅश हा एक आम्ल पदार्थ असून त्याचा पी.एच.३.५० ते ४.५० असा आहे. हा पदार्थ जमीनीत पडल्या नंतर जमीनीतील जीवाणू नष्ट होतात परिणामी तो जास्त पडल्यानंतर जमीनीत खोलवर त्याचा अर्क उतरतो,त्यामुळे पावसाळ्यात पाण्यासोबत वाहून जाऊन नदी व नाल्याचे पाणी प्रदुषीत होत आहे.शेतीची पिके तसेच जलचरांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे.दारुच्या कारखान्यांनी स्पेन्ट वाॅश जाळावे अशी केंद्र शासनाची धारणा आहे.परंतु प्रत्यक्षात कोणताच दारू कारखाना हे नियम पाळत नाही हि दुर्दैवी बाब आहे.
कोपरगाव तालुक्यातील संजीवनी सहकारी साखर कारखाना त्यांचे कारखान्याचे शेजारी असलेल्या नारंदी नदीच्या दोन्ही बाजूला जमीनीवर पेन्ट वॉश टाकत आहे.स्पेन्ट वाॅशचा तलाव करीत आहे.त्या स्पेन्ट वॉश तलावा शेजारीच त्यांचा प्रेस मडची निर्मिती करणारे मैदान आहे.स्पेन्ट वाॅशच्या तलावा शेजारी वन विभागाचे जवळ जवळ १०० एकरचे जंगल आहे.सदर जंगलातील वन्य प्राणी हे पाणी समजून स्पेन्ट वॉश पित आहे.त्यामुळे त्यांच्या जीवनावर मोठा विपरीत परिणाम होत आहे.स्पेन्ट वाॅश मुळे शेजारील नारंदी नदीपात्राचे पाणी काळेशार झालेले आहे व हे पाणी गोदावरी नदीपात्रात मिसळले जाते.सध्या गोदावरी नदीच्यापात्रात सडे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे पाणी साचलेले असल्यामुळे पाणी प्रदुषीत होऊन जलचरांचे भविष्य धोक्यात आले आहे.या पूर्वी सेनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या व जलचर नष्ट होत असल्याची सप्रमाण तक्रार केली होती.मात्र प्रदूषण महामंडळाने त्याकडे डोळेझाक केली होती.
सदर मोकळ्या मैदानातील प्रेसमडच्या निर्मितीमुळे माशांची उत्पत्ती वाढते व पूर्वेला असलेल्या संवत्सर गावाला दुर्गंधी व प्रदुषणांचा वर्षभर सामना करावा लागत आहे.अनेक विहिरींचे पाणी खराब होत आहे.हा प्रदुषणाचा प्रश्न केवळ, त्याच दारुच्या कारखान्याचा नसून जवळ जवळ सर्वच साखर व दारू कारखान्यांचा प्रश्न आहे.तरी आपण ४८ तासात कारवाई करून त्याची माहिती आपल्याला द्यावी अशी मागणी केली आहे.याची दखल न घेतल्यास आपण या विरुद्ध न्यायालयात दावा करू असा इशारा संजय काळे यांनी शेवटी दिला आहे.त्यामुळे सहकारी साखर कारखानदारीत खळबळ उडाली आहे.