नदी प्रदूषण
गोदावरीचे प्रवाहित ठेवण्याचे व शुद्ध करण्याचे काम मोठे-प्रांताधिकारी
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
गोदावरीचे प्रवाहित ठेवण्याचे व शुद्ध करण्याचे काम मोठे आहे मात्र ते अशक्य नाही असे प्रतिपादन शिर्डी येथील प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी कोपरगाव येथे गोदावरी नदी काठी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“भारताची संस्कृती महान असून माणसाला भौतिक सुख म्हणजे सर्व काही नाही.नद्या आणि परिसरात माणसाची संस्कृती बहरत गेली आहे.हा इतिहास आहे.त्यामुळे प्राचीन नदीचे महत्व अधोरखीत होते.नद्या उत्तोरोतर प्रदूषित होत गेल्या व भौतिक सुखाकडे पाहून व औद्योगिकरणाच्या नादी लागुन त्यांच्याकडे माणसाचे दुर्लक्ष होत गेले हे खरे आहे.मात्र पुन्हा मागे वळून पाहताना आता नद्याकडे वळल्या शिवाय पर्याय नाही हे स्पष्ट होत आहे”-गोविंद शिंदे,प्रांताधिकारी,शिर्डी उपविभाग.
महाराष्ट्र शासनाच्या,’चला जाणू या नदीला’ या मोहिमेअंतर्गत देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ नद्या अमृतवहिनी करण्याची मोहीम हाती घेतली असून त्या अंतर्गत अगस्ती नदीची परिक्रमा आणि अभ्यास दौरा करण्यासाठी अ.नगर जिल्ह्यातील गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे व नदी अभ्यासक डॉ.वसुदेव साळुंखे यांची निवड करण्यात येऊन वर्धा येथे जलाभ्यासक डॉ.राजेंद्र सिंग यांनी कलश व तिरंगा देऊन या मोहिमेला सुरुवात करून दिली आहे त्याची आज सकाळी प्रसिद्धी सिनेअभिनेते चिन्मय उदगिरकर यांच्या हस्ते कलश पूजा करण्यात आली आहे त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,विश्वस्त संदीप रोहमारे,डॉ.रामदास आव्हाड,माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,मंगेश पाटील,कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे,वणीकरण विभागाच्या वनाधिकारी प्रतिभा सोनवणे,सिनेअभिनेते चंद्रकांत शिंदे,नारायण अग्रवाल,राजेश पिंडे,कोपरगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष सत्येनं मुंदडा,कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक दिनार कुदळे,प्रा.शैलेंद्र बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”आपण सुरुवातीच्या कालखंडात नंदुरबार जिल्ह्यात सेवेची सुरुवात केली होती.त्यावेळी नर्मदा नदी परिसरात काम करण्याचा योग आला.त्यावेळी नर्मदा परिक्रमा व त्याचे प्राचीन महत्व आपल्याला समजले आहे.भारताची संस्कृती महान असून माणसाला भौतिक सुख म्हणजे सर्व काही नाही.नद्या आणि परिसरात माणसाची संस्कृती बहरत गेली आहे.हा इतिहास आहे.त्यामुळे प्राचीन नदीचे महत्व अधोरखीत होते.नद्या उत्तोरोतर प्रदूषित होत गेल्या व भौतिक सुखाकडे पाहून व औद्योगिकरणाच्या नादी लागुन त्यांच्याकडे माणसाचे दुर्लक्ष होत गेले हे खरे आहे.मात्र पुन्हा मागे वळून पाहताना आता नद्याकडे वळल्या शिवाय पर्याय नाही हे स्पष्ट होत आहे.त्यासाठी जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंग यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.नद्यांच्या आणि प्राचीन माहात्म्य जाणून घेण्याशिवाय आता पर्याय नाही हे स्पष्ट झाले आहे. आणि त्या कार्यात आदिनाथ ढाकणे आणि त्यांचे सहकारी सामील होत आहे हि नगर जिल्ह्यासाठी मोठी भूषणाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले आहे व त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्तविक आदिनाथ ढाकणे यांनीं केले आहे.त्यावेळी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,नारायण अग्रवाल,नमामी गोदा फौंडेशनचे राजेश पंडित,सत्येनं मुंदडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.तर उपस्थितांचे आभार डॉ.वसुदेव साळुंखे यांनी मानले आहे.