नदी प्रदूषण
…या नगरपरिषदेच्या वतीने,‘निर्मल गोदावरी अभियान!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील पवित्र गोदावरी नदीकाठी साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आणि नदीकाठ प्लास्टिकमुक्त करून स्वच्छ करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने आज ‘निर्मल गोदावरी अभियान’ मोठ्या उत्साहात राबविण्यात आले आहे.या उपक्रमाअंतर्गत शहरातील नागरिकांच्या सहभागातून गोदावरी नदीच्या घाटावर साफसफाई करण्यात आली आहे.

या पुर्वी प्रत्येक नदीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन पवित्र होता.पण हल्ली नदीकडे पाहण्याचा दृष्टिकोन विपरीत होत आहे.पुर्वी नदीचा उपयोग होत असे तर आता नदीत सांडपाणी विसर्जन करणे,दुषित पाणी करणे,घाण टाकुन पवित्र नदीची गटारगंगा करणे. असे प्रकार बंद होण्यासाठी जनजागृती करणे त्यासाठी प्रचार प्रसार करणे हे काम मोठे असले तरी केवळ १५ दिवसांची निर्मल गोदावरी साक्षरता अभियान यात्रा नसुन हे काम कायम स्वरुपी चालणार आहे.यासाठी आंतरराष्ट्रीय किर्तीचे जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्र सिंह यांनी या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधून घेतले आहे.त्यासाठी कोपरगाव येथील भूमिपुत्र आदिनाथ ढाकणे यांनी या प्रश्नाकडे सातत्याने लक्ष दिले आहे.आता नगरपरिषद याकडे लक्ष देत आहे ही समाधानाची बाब आहे.
निर्मल गोदावरी अभियान हे गोदावरी नदी प्रदूषणमुक्त,स्वच्छ आणि अविरत वाहती ठेवण्यासाठी राबवले जाणारे एक महत्त्वाचे जनआंदोलन आहे.नाशिक (त्र्यंबकेश्वर) ते गंगापूरपर्यंत या मोहिमेअंतर्गत गोदावरी पात्रातून प्लास्टिक,निर्माल्य आणि कचरा काढण्याचे काम अनेक स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून केले जाते,जेणेकरून दक्षिण गंगा गोदावरीचे पावित्र्य जपले जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या पुर्वी प्रत्येक नदीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन पवित्र होता.पण हल्ली नदीकडे पाहण्याचा दृष्टिकोन विपरीत होत आहे.पुर्वी नदीचा उपयोग होत असे तर आता नदीत सांडपाणी विसर्जन करणे,दुषित पाणी करणे,घाण टाकुन पवित्र नदीची गटारगंगा करणे. असे प्रकार बंद होण्यासाठी जनजागृती करणे त्यासाठी प्रचार प्रसार करणे हे काम मोठे असले तरी केवळ १५ दिवसांची निर्मल गोदावरी साक्षरता अभियान यात्रा नसुन हे काम कायम स्वरुपी चालणार आहे.यासाठी आंतरराष्ट्रीय किर्तीचे जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्र सिंह यांनी या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधून घेतले आहे.त्यासाठी कोपरगाव येथील भूमिपुत्र आदिनाथ ढाकणे यांनी या प्रश्नाकडे सातत्याने लक्ष दिले आहे.आता नगरपरिषदा याकडे लक्ष देत आहे ही समाधानाची बाब आहे.मात्र या केवळ उत्सवासाठी आणि आपली छबी झळकविण्यासाठी न राहता सातत्यानं राबविणारा उपक्रम ठरला तर काही तरी उपयोग होऊ शकतो.यापूर्वी गोदावरी नदी पात्रात गोवंश हत्येचे पाट वाहत असल्याच्या बातम्या फार जुन्या नाहीत.कोपरगाव शहराचे दूषित पाणी आणि काही संस्थांचे दूषित पाणी हा मोठा प्रश्न आहे.ते बंद केले तरी फार मोठे काम होईल.याकडे राजकीय नेत्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.कोपरगाव येथे नवीन पदाधिकारी आणि नगराध्यक्ष पराग संधान यांनी त्याची सुरुवात केली ही समाधानाची आणि कौतुकाची बाब आहे.मात्र सातत्य ठेवणे ही मोठी तपस्या ठरते याचे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

आज रोजी सकाळी साडेसहा वाजल्यापासून नगराध्यक्ष पराग संधान यांच्या प्रमुख उपस्थितीत,तसेच शहरवासीयांच्या सहकार्याने गोदावरी नदीच्या तीरावर साचलेला कचरा व निर्माल्य हटविण्याचे काम करण्यात आले.यावेळी सदगुरू गंगागीर महाराज कॉलेज कोपरगाव येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत स्वच्छता मोहिमेला मदत केली आहे. तसेच नदीकाठावर साचलेले निर्माल्य संकलित करण्यात आले आहे.
यावेळी उपस्थितांनी गोदावरी नदीपात्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी एकत्र येत नदी स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली.भविष्यात कचरा निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.नदीकाठावर साचणारा प्लास्टिक कचरा नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याने,येत्या काळात नदीकिनारी स्वच्छता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
सदर प्रसंगी कोपरगाव पालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान,गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक आदिनाथ ढाकणे,माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक आरोग्य समिती सभापती वैभव आढाव,नगरसेवक अनिल आव्हाड,आकाश वाजे,योगेश बागुल,संजय उदावंत,दत्तू पगारे,कैलास खैरे,वैभव गिरमे,राहुल खरात,कलविंदर डडियाल,राकेश काले,कैलास सोमासे कुणाल लोणारी ज्ञानेश्वर गोसावी सतीश रानोडे,आप्पासाहेब नवले,प्रज्वल ढाकणे,रामचंद्र साळुंके,सचिन त्रिभुवन,रोहित आढाव,रिंकेश नरोडे,अरुण बोराडे,ज्ञानेश्वर गोसावी, रोहन दरपेल,कुणाल लोणारी,दीपक कराळे,निखिल जोशी,राहुल खंडागळे,श्रीकांत जाधव,फकीर मोहम्मद पहिलवान,शुभम सोनवणे,ओम बागुल,किरण आव्हाड,दीपक पवार,नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच संत सदगुरू गंगागीर महाराज महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.बंडेराव तराळ एन.एस.एस विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी, व गोदामाई प्रतिष्ठानचे सदस्य व योगाचर्य विमलताई पुंडे व यांच्यासह सर्व योगसाधक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



