दुष्काळ
दुष्काळी १३ गावांना वरदान ठरणारी…ही योजना सुरू !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येकडे दुष्काळी समजल्या जाणाऱ्या रांजणगाव देशमुख,जवळके,धोंडेवाडी,वेस,सोयगाव,अंजनापूर,बहादरपूर,मनेगाव आदी गावांना वरदान ठरणाऱ्या रांजणगाव देशमुख (उजनी) उपसा जलसिंचन योजना पुन्हा एकदा आ.आशुतोष काळे यांनी सुरू केल्याने या दुष्काळी भागातील पाण्याची टंचाई सौम्य होण्यास मदत होणार आहे.त्याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील जिरायती गावांना वरदान असलेली उजनी चारी उपसा जलसिंचन योजना माजी खा.सूर्यभान पाटील वहाडणे यांनी १९९३ साली या भागातील विविध दुष्काळी कार्यकर्त्यांच्या रांजणगाव देशमुख येथील,’रास्ता रोको’आंदोलनानंतर युती शासन १९९५ साली सत्तेत आल्यावर मंजुरी मिळवून दिली होती.सन-१९९९ अखेर पर्यंत बरेच काम पूर्ण झाले असताना युतीचे सरकारने मुदतपूर्व राजीनामा दिला होता.नंतर त्यांनतर राज्यात झालेल्या निवडणुकात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले होते.त्यांनतर या योजनेला तत्कालीन आ.शंकरराव कोल्हे यांनी आधी व नंतर जोरदार विरोध केला होता.सदर योजना व्यवहार्य नाही अशी टिपणी सुरू करून त्याकडे कानाडोळा केला होता.यावर ही मंडळी थांबली नव्हती जलसंपदा मंत्री अजित पवार यांना बोलावून खोटे उदघाटन केले होते.दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना वारंवार सांगूनही काही उपयोग झाला नव्हता.तरी त्यांचा ठेका कायम होता.मात्र १९९५च्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत त्यांना दुष्काळी १३ गावातील शेतकऱ्यांनी त्यांना मतपेटीतून दणका दिल्यावर व अपक्ष उमेदवार कल्पना दत्तात्रय डांगे यांना भरघोस मतांनी निवडून दिल्यावर ते ठिकाणावर आले होते.मात्र सन-२००४ च्या निवडणुकीत या भागातील दुष्काळी गावांनी निर्णायक भूमिका घेतली होती व आ.कोल्हे यांचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने पाडून टाकला होता.त्यांनतर सन-२००४ साली झालेल्या निवडणुकीत या दुष्काळी भागाने सन-२०१९ सारखीच निर्णायक भूमिका घेऊन तत्कालीन सेनेचे उमेदवार अशोक काळे यांना विधानसभेत सन-२००४ साली निवडून दिले होते.त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात त्यांनी या भागाचा धाक घेऊन,”उजनी उपसा सिंचन योजना सुरू केल्याशिवाय आपण सत्कार स्वीकारणार नाही” असे जवळके येथील मराठी शाळेतील सत्कार सभेत जाहीर केले होते.मात्र त्यानंतर त्यांचेकडून काही काळ अनास्था झाली होती.मात्र पुन्हा गाडी रुळावर आली होती.त्यांनी नंतर या प्रश्नी लक्षवेधी करतात या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवत हि योजना पूर्ववत सुरु करून पश्चिम भागातील गावांना त्यांच्या १० वर्षाच्या कार्यकाळात मोठा दिलासा दिला होता.दुर्दैवाने २०१४ नंतर या योजनेकडे माजी आ.शंकरराव कोल्हे यांचा राजकीय वारसा सांगणाऱ्या महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पुन्हा एकदा दुर्लक्ष केले होते.परिणामी या योजनेकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष झाल्यामुळे हि योजना बंद पडून या भागातील शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले असतांना आ.आशुतोष काळे यांनी विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यावर आपल्या २०१९ च्या विधानसभा जाहीरनाम्यात उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु करण्याचे आश्वासन दिले होते.त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा या प्रश्नाकडे लक्ष वेधून दुष्काळात पाणी
बिगर सिंचन पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान या योजनेच्या विद्युत रोहित्रातील तांब्याची तार व त्यातील ऑईल असा दिड लाखांचा ऐवज दोन दिवसापूर्वी चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले होते.मात्र त्यावर सदर संस्थेने अद्याप गुन्हा दाखल का केला नाही हे समजायला मार्ग नाही.तथापि आ.काळे यांनी या अडचणीवर मात करून स्व-खर्चातून ६०० के.व्ही.ए.क्षमतेचा ट्रान्सफार्मर या योजनेसाठी भाडोत्री उपलब्ध करून दिला असल्याची माहिती आहे.
परिणामी रांजणगाव देशमुख,जवळके,धोंडेवाडी,वेस-सोयगाव,अंजनापूर,बहादरपूर,मनेगाव आदी गावातील व परिसरातील शेती व शेतकऱ्यांसाठी अंशतः सिंचनासाठी नव्हे तर दुष्काळात आधार असणाऱ्या या रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेमुळे शेतकऱ्यांना चार पिके व पिण्याच्या पाण्याची अडचण अंशतः दूर होणार असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान या योजनेतून जवळके,धोंडेवाडीसह रांजणगाव देशमुख आधी भागातील पाझर तलाव,के.टी.वेअर भरून द्यावेत अशी मागणी जवळके येथील सरपंच सारिका विजय थोरात व या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.