जलसिंचन
रब्बी हंगाम सिंचन पाणी गरजेचे,सल्लागार समितीच्या बैठकीची केली मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील रब्बी पिकांचे आगामी नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाची बैठक गरजेची असून ती नाशिकचे पालक मंत्री दादा भुसे यांनी तातडीने घ्यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच केली आहे.
संपूर्ण लाभक्षेत्रात एम.एम.आय.एस.एफ.ऍक्ट नुसार पाणी वापर संस्था निर्माण करणे बाबत सल्ला देणे,पाणी वापर संस्थांचे पाणी हक्क,अंमलबजावणीचा आढावा घेणे,पाण्याचे वार्षिक नियोजन करणे,मागील पाणी वापराचा आढावा घेणे,व चालू हंगामाबाबत चर्चा करून नियोजन करणे,त्याचे मेळावे,तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करणे आदी उद्दिष्टे साध्य करणे अभिप्रेत आहेत.या कालवा सल्लागार समितीची बैठक हंगामपूर्ण नियमित घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे.त्यामुळे आ.काळे यांनी केलेल्या मागणीला अर्थ प्राप्त झाला आहे.
राज्याच्या शासन निर्णयानुसार सिंचन प्रकल्पाच्या व्यवस्थापनात लाभधारक शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.दि.१८ मार्च २०१६ च्या शासन निर्णयानुसार दर पाच वर्षांनी अशा सल्लागार समितीची स्थापना करणे गरजेचे आहे.शेती सिंचनाचा वापर काटकसरीने व इष्टतम व्हावा,व वेळेत सिंचन व्हावे यासाठी या कालवा सल्लागार समितीची बैठक अनिवार्य करण्यात आली आहे.यात प्रकल्पाची सिंचन क्षमता प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र यातील तफावतीबाबत चर्चा करणे,संपूर्ण लाभक्षेत्रात एम.एम.आय.एस.एफ.ऍक्ट नुसार पाणी वापर संस्था निर्माण करणे बाबत सल्ला देणे,पाणी वापर संस्थांचे पाणी हक्क,अंमलबजावणीचा आढावा घेणे,पाण्याचे वार्षिक नियोजन करणे,मागील पाणी वापराचा आढावा घेणे,व चालू हंगामाबाबत चर्चा करून नियोजन करणे,त्याचे मेळावे,तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करणे आदी उद्दिष्टे साध्य करणे अभिप्रेत आहेत.या कालवा सल्लागार समितीची बैठक हंगामपूर्ण नियमित घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे.या बैठका फक्त लाभक्षेत्रातच पार पाडण्याची जबाबदारी जलसंपदाचे मुख्य अभियंता,अधिक्षक अभियंता यांचे स्तरावरून करण्याचे आदेश आहेत.त्यासाठी विषयसूची बैठकीचे आधी किमान दहा दिवस सदस्यांना वितरित करणे क्रमप्राप्त आहे.बिगर सिंचन आरक्षण या बैठकीपूर्वी कायम करण्याची पद्धत आहे.व ती कालवा सल्लागार समितीवर बंधन कारक आहेत.हि बैठक नियोजन करण्याची जबाबदारी सदस्य सचिव यांचेवर टाकण्यात आलेली आहे.व या सल्लागार समितीचे निर्णय प्रसिद्धी माध्यमांत प्रसिद्ध करणे,स्थानिक स्वराज्य संस्था यांना पुरवणे आदी नियम करण्यात आले आहे.मात्र या पातळीवर गोदावरी कालव्यांच्या बाबतीत वारंवार अपवाद करण्यात आला आहे.या सर्वच पातळीवर मोठा दुष्काळ दिसून येत असतो.त्यामुळे गतवर्षी लाभक्षेत्रातील शेतकरी संतप्त झाले होते.अशा बैठका होतच नसल्याने संतापाचे हे एक प्रमुख कारण असल्याने खरीप,रब्बी,उन्हाळी पिकांचे निययोजन करणे जिकरीचे बनले आहे.या शेतकऱ्याचे बारमाही ब्लॉक असतानाही त्यांना पाणी देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या कारणावरून गतवर्षी रणकंदन झाले होते.त्या नुसार माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,प्रवीण शिंदे,तुषार विध्वंस,संतोष गंगवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी गतवर्षी जलसंपदा विभागाला धारेवर धरले होते.
चालू वर्षी पर्जन्यमान चांगले असून पाण्याची किती गरज भासणार हे महत्वाचे ठरणार आहे.कारण गतवर्षी धरणातील पाणी शेतकऱ्यांनी किमान पातळीवर वापरले होते.तर सलग तीन वर्षांपासून पर्जन्यमान चांगले असल्याने यावर्षीही पाणी मागणी कमी राहील असे अनुमान आहे.तरीही या वर्षी याची काळजी आ.आशुतोष काळे यांनी घेतली असल्याचे दिसत आहे.व रब्बी हंगाम सुरु होत असताना बैठकीचे मागणी नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री दादा भुसे यांचेकडे केली आहे.
या मागणीनंतर आता नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री भुसे हे कोणती भूमिका घेतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.