जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

धरण उशाला आणि कोरड कालव्याला,गोदावरी कालव्यांची स्थिती,शेतकरी नाराज

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(माणिक उगले)
यंदा मुबलक पावसाळा होऊन धरणात बक्कळ पाणी असताना जलसंपदा विभाग मात्र शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवत असून कालवे कोरडे ठाक असल्याचा अनास्था प्रसंग ओढवला असल्याने कोपरगाव,राहाता तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांत मोठी नाराजी पसरली आहे.

“दारणा धरणात जलसाठा शिल्लक ठेवून जलसंपदा विभाग कोणाचे हित साधणार आहे ?आज शेतकरी पाण्याविना होरपळत आहे.पण या नेत्यांना त्याच कांही सोयरसूतक दिसत नाही.आज जर माजी खा.शंकरराव काळे व माजी मंत्री शंकरराव कोल्हे आदी नेते असते तर अशी दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली नसती.आगामी १५ फेब्रुवारीच्या आत कालवे सोडले तरच कोपरगाव तालुक्यातील शेतकरी जगतील”-रामभाऊ गाढे,कार्यकर्ते व शेतकरी,कोपरगाव.

जानेवारीच्या अखेरच्या टप्पामध्ये जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये ८४ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती आहे.पाण्याची उपलब्धता बघता प्रशासनाने विविध धरणांमधून पिण्याचे पाणी व रब्बी हंगामासाठी मागणीनुसार आवर्तन देण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे.

गेल्या वर्षी पावसाने केलेल्या मोठ्या पर्जन्यामुळे नगर,नाशिक जिल्ह्याचा पाणीप्रश्न मार्गी लागला होता.यावर्षीही जानेवारीत शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमध्ये ५५ हजार ६२ दलघफू साठा उपलब्ध आहे.त्यामुळे नगर आणि नाशिक जिल्हावासीयांची जूनपर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे.नाशिककरांचा हक्काचा धरण समूह असलेल्या गंगापूरमधील चार प्रकल्प मिळून आठ हजार २७३ दलघफू म्हणजेच ८१ टक्के साठा आहे.तसेच इगतपुरीतील दारणा समूहातील सहा प्रकल्पांमध्ये १६ हजार १२८ दलघफू (८५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे.पालखेड समूहातील तीन प्रकल्प मिळून ६७६५ दलघफू (८१ टक्के) तसेच ओझरखेड समूहातील तिन्ही धरणे मिळून एकूण २८१४ दलघफू म्हणजेच ८८ टक्के साठा आहे.धरणांमधील उपयुक्त साठा विचारात घेता गावांसाठी,पाणीवापर संस्था तसेच रब्बी हंगामासाठी निरनिराळ्या प्रकल्पांमधून आवर्तन देण्यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजनावर केले जाणे गरजेचे आहे.त्यामुळे पावसाळ्यापर्यंत कोपरगावसह राहाता तालुकावासीयांना व शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळण्यास मदत होणार आहे.अशी स्थिती असताना वास्तव मात्र वेगळे आहे.

शेतकऱ्यांना पहिले शेती सिंचनाचे आवर्तन तब्बल दीड महिना उशिरा दिले गेले होते.तेही केवळ पंधरा दिवस मिळाले होते.त्यानंतर कालवा दीड महिना बंद होता.त्यामुळे कोपरगाव तालुका कालवा कृती समितीने आवाज उठवला होता.तरीही शेती सिंचनासाठी आवर्तन पुरेसे वेळेवर दिले गेलेले नाही.आताही जलसंपदा विभागाचे अधिकारी शेती सिंचनाचे आवर्तन मार्च च्या पहिल्या आठवड्यात सोडणार असल्याचे सांगत आहे.तर कोपरगाव तालुक्याचे नेते मूग गिळून बसले आहे.त्यामुळे धरणात पाणी असूनही जलसंपदा विभाग नेमके कोणाचे हितसंबंध साधणार आहे असा सवाल निर्माण झाला आहे.आवर्तनाच्या तारखा जाहीर होण्याची वेळ झाली की,कोपरगाव तालुक्यातील पुढारी शेती आवर्तनाची आवई उठवताना दिसतात व आपले श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात.प्रत्येक वेळी हि कोल्हेकुई (!) ठरलेली आहे.आताही तीच स्थिती ओढवणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनीं सावध होणे गरजेचे आहे.व आपल्या वाट्याचे पाणी उद्योजकांना दिले जाणार नाही याची दखल घेणे गरजेचे आहे.त्यासाठी कोपरगाव कृती समितीने आवाज उठवणे गरजेचे आहे.

दारणा धरणात पाणी साठा मुबलक असतांना रब्बीचे आवर्तन पंधरा दिवसात बंद करून दिड महिना कालवे बंद ठेवून एक मार्चला कालवे सोडणार असे जलसंपदा अभियंते सांगतात.रब्बीचे पिके हातातून जाणार आहे.पूढे ऊन्हाळी तीन आवर्तने मग कोणाकरीता हा सवाल शेतकरी विचारत आहे.

दारणा धरणात जलसाठा शिल्लक ठेवून जलसंपदा विभाग कोणाचे हित साधणार आहे.असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ गाढे यांनी कोपरगांवच्या लोकप्रतिनिधींना व अभियंत्यांना विचारला आहे.आज शेतकरी पाण्याविना होरपळत आहे.पण या नेत्यांना त्याच कांही सोयरसूतक दिसत नाही.आज जर माजी खा.शंकरराव काळे व माजी मंत्री शंकरराव कोल्हे आदी नेते असते तर अशी दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली नसती असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.आगामी १५ फेब्रुवारीच्या आत कालवे सोडले तरच शेतकरी जगतील सिंचनाचा जो कार्यक्रम नागपूर बैठकीत नेत्यांनी व अभियंत्यानी ठरवला तो फसला आहे त्याची दुरूस्ती करून घ्यावी अशी शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close