जलसंपदा विभाग
निळवंडे कालवा कृती समितीची उद्या मोटारसायकल रॅली

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
निळवंडे कालव्यांचे काम अंतिम चरणात आले असून या पावसाळ्यात कालव्यांची चाचणी होत आहे ही अत्यंत समाधानाची बाब असून कालवा कृती समितीने त्यासाठी केलेले सर्व कष्ट आणि परिश्रम शेतकऱ्यांना विदित आहे.आता ५२ वर्षांनी शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा आनंदाचा क्षण आला आहे.त्यामुळे वर्तमान कालव्यांची स्थिती पाहणीसाठी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रूपेंद्र काले यांच्या मार्गदर्शनाखाली व आपले उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघटनेचे अध्यक्ष विधीज्ञ अजित काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या दि.०५ जून रोजी सकाळी ०८.३० वाजता पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे.
निळवंडे कालवा समितीचे योगदान सर्वांना विदित आहे.त्यामुळेच उच्च न्यायालयात सरकारला लेखी प्रतिज्ञा पत्र देऊन या प्रकल्पाची पूर्ण करण्याची वेळ सन-२०२२ पर्यंत निर्धारित करून द्यावी लागली होती.व त्यानुसार निधीही द्यावा लागला होता.तरीही वर्तमान आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माजी खा.प्रसाद तनपुरे व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सहकार्याने अपेक्षेपेक्षा मोठा निधी उपलब्ध करून दिला हे वास्तव आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अप्पर प्रवरा-२ (निळवंडे प्रकल्प) या प्रकल्पाला प्रथम मंजुरी दि.१४ जुलै १९७० रोजी मिळाली.आजता गायत या प्रकल्पाला पन्नास वर्ष उलटत आली आहे.मात्र तरीही हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही.कालव्यांची कामे आधी होणे अभीप्रेत असताना येथे धरणाची भिंत आधी व कालवे बावन्न वर्षात होऊ शकले नाही.त्यामुळे या प्रस्तावित लाभक्षेत्राखालील १८२ दुष्काळी गावातील जवळपास ६४ हजार २६० हेक्टर क्षेत्र शेती सिंचना पासून वंचित राहिले आहे.त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करीत आहे.शिवाय या भागात शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी विवाहासाठी मुली देत नसल्याने मोठा गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झाला होता.या गावातील शेतकऱ्यांना शेती असूनही त्यांना खडी फोडण्यासाठी दुर्दैवाने जावे लागत होते.वर्तमानात या प्रकल्पाच्या मुख्य कालव्यांचे काम जवळपास ३० टक्के तर वितरिकांचे पूर्ण काम बाकी आहे.असे असले तरी या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने याबाबत रस्त्यावर लढा देण्याबरोबरच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात अड्.अजित काळे यांच्या सहकार्याने न्यायिक लढा दिला आहे.काही याचिका सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे.या कामी समितीवर अनेक गुन्हे दाखल झाले.समिती कार्यकर्त्यावर लाठी हल्ले झाले.अनेक कार्यकर्त्यांना वर्तमान सत्ताधाऱ्यांनी तर काही विरोधकांनी पोलिसांचा वापर करून अटक केली होती.आता तो इतिहास झाला असला तरी निळवंडे कालवा समितीचे योगदान सर्वांना विदित आहे.त्यामुळेच उच्च न्यायालयात सरकारला लेखी प्रतिज्ञा पत्र देऊन या प्रकल्पाची पूर्ण करण्याची वेळ सन-२०२२ पर्यंत निर्धारित करून द्यावी लागली होती.व त्यानुसार निधीही द्यावा लागला होता.तरीही वर्तमान आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माजी खा.प्रसाद तनपुरे व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सहकार्याने अपेक्षेपेक्षा मोठा निधी उपलब्ध करून दिला हे वास्तव आहे.परिणाम स्वरूप या प्रकल्पाचे कालवे आता अंतिम टप्यात आले आहे.
त्यामुळे या कालव्यांचे काम खरेच कुठपर्यंत आले याबाबत शेतकऱ्यांत मोठे औत्सुक्य निर्माण झाले होते.ते शमविण्यासाठी हा ‘मोटार सायकल रॅली’चे आयोजन उद्या रविवार दि.०५ जून रोजी सकाळी ८.३० वाजता जवळके येथून केले आहे.त्यासाठी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित राहणार आहे.तरी शेतकऱ्यांनी या रॅली साठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे सचिव कैलास गव्हाणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकानव्ये केले आहे.
सदर रॅलीस कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष मच्छिन्द्र दिघे,संघटक नानासाहेब गाढवे,संदेश देशमुख,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उऱ्हे सर,सचिव कैलास गव्हाणे,दत्तात्रय चौधरी,विठ्लराव देशमुख,विठ्ठलराव पोकळे,संतोष तारगे,बाबासाहेब गव्हाणे,रंगनाथ गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,माजी उपाध्यक्ष गंगाधर रहाणे,रमेश दिघे,माधव गव्हाणे,रामनाथ ढमाले सर,तानाजी शिंदे,ज्ञानदेव शिंदे गुरुजी,सुधाकर शिंदे,विक्रम थोरात,राजेंद्र निर्मळ,भरत शेवाळे,कौसर सय्यद,दौलत दिघे,आप्पासाहेब कोल्हे,अड.योगेश खालकर,सचिन मोमले, महेश लहारे,रावसाहेब मासाळ,नवनाथ शिरोळे,सोमनाथ दरंदले,वाल्मिक नेहे,नामदेव दिघे,संतोष गाढवे,अशोक गांडूळे,विठ्लराव पोकळे,संतोष तारगे,शरद गोर्डे,शिवाजी जाधव,दत्तात्रय आहेर,शिवनाथ आहेर,गोरक्षनाथ शिंदे,सोपान थोरात,दत्तात्रय थोरात,वसंत थोरात,अशोक गाढे,रावसाहेब थोरात,ज्ञानदेव पा.हारदे,बाळासाहेब रहाणे,बाळासाहेब सोनवणे,आबासाहेब सोनवणे,नरहरी पाचोरे,रामनाथ पाडेकर,दगडू रहाणे,भाऊसाहेब चव्हाण,अलिमभाई सय्यद,शब्बीरभाई सय्यद आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार आहे.