जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

..’त्या ‘ दुष्काळी गावांना मिळणार पाणी-माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   निळवंडे कालवा कृती समितीच्या उच्च न्यायालयातील लढयास यश येवून 31 मे 2023 रोजी निळवंडे धरणाच्या उजव्या डाव्या अशा दोन्ही कालव्यास पाणी सोडण्यात आले होते.मात्र कोपरगाव तालुक्यातील जवळके,बहादरपुर आणि परिसरातील जवळपास सहा दुष्काळी गावे या पाण्यापासून वंचित राहिली होती.त्यासाठी समितीने जलसंधारण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.त्याला यश आले असून सदर बंदिस्त वितरण प्रणाली योजनेचे संकल्पन आणि नियोजनासाठी 3.26 लाखांच्या निधीस नगर येथील जलसंधारण विभागाने मंजुरी दिली असल्याची माहिती जलसंधारण अधिकारी पी.बी.गायसमुद्रे यांनी दिली आहे.त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

  

निळवंडे कालवा कृती समितीच्या मोठ्या न्यायिक व रस्त्यावरील संघर्षाने निळवंडे धरणाचे पाणी आणल्यानंतर बहुतांशी सर्व गावांना निळवंडे धरणाचे पाणी पाझर तलाव,के.टी.वेअर आदींच्या सहाय्याने 31 मे 2023 नंतर पाणी उपलब्ध झाले होते.मात्र ज्यांनी मोठा संघर्ष केला,लाठ्या काठ्या खाल्ल्या,जेलमध्ये जावे लागले,अनेक गुन्हे दाखल करून घ्यावे लागले त्या जवळकेसह संघर्षशील गावांना मात्र गेली दोन अडीच वर्षे पाणी मिळत नव्हते.या योजनेने उर्वरित दुष्काळी गावांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

   याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”निळवंडे कालवा कृती समितीने उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील 182 गावातील दुष्काळी शेतकऱ्यांना निळवंडे धरणाचे पाणी मिळावे यासाठी सन-2006 पासून अनेक आंदोलने केली होती.त्यातील तळेगाव दिघे आणि  निर्मळ पिंपरी येथील आंदोलने विशेष गाजली होती.10 ऑगस्ट 2014 सोजी ऐन राखी पौर्णिमेच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सभेत शांत बसलेल्या शेतकऱ्यांवर काही राजकारणी लोकांनी पोलिसांचा वापर करून बेछूट लाठीमार केला होता.सदर आंदोलन देशभर गाजेले होते.केंद्रातून निधी मिळण्यासाठी निळवंडे धरणासाठी खा.भाऊसाहेब वाकचौरे याचे मार्फत 17 पैकी 14 मान्यता मिळवल्या होत्या.उर्वरित मान्यता मिळविण्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांचे मोफत विधी सहाय्याने उच्च न्यायालयात याचिकाकर्ते नानासाहेब जवरे,विक्रांत रुपेंद्र काले यांनी जनहित याचिका (क्रं.१३३/२०१६) दाखल करून उर्वरित तीन मान्यता मिळवून सदर प्रकल्प ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मिळवले होते.त्यानुसार मोठ्या न्यायिक व रस्त्यावरील संघर्षाने निळवंडे धरणाचे पाणी आणल्यानंतर बहुतांशी सर्व गावांना निळवंडे धरणाचे पाणी पाझर तलाव,के.टी.वेअर आदींच्या सहाय्याने 31 मे नंतर पाणी उपलब्ध झाले होते.मात्र ज्यांनी मोठा संघर्ष केला,लाठ्या काठ्या खाल्ल्या,जेलमध्ये जावे लागले,अनेक गुन्हे दाखल करून घ्यावे लागले त्या जवळकेसह संघर्षशील गावांना मात्र गेली दोन अडीच वर्षे पाणी मिळत नव्हते.त्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,सेवानिवृत्त उपअभियंता सुखदेव थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,सदस्य आदींनी सर्वात प्रथम वेस पाझर तलावापासून पाणी जवळके नदीत सोडण्याची व नदीजोड करण्याची सर्वात प्रथम मागणी करून शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना वेस बंधाऱ्याजवळ असलेल्या सोसायटीजवळ भेट देऊन तेथून पूर पाणी ‘ हॉटेल मनोदिप’ पर्यंत आणण्याची संकल्पना मांडली होती.जवळके ग्रामपंचायतने त्याची रीतसर व वेळोवेळी मागणी केली होती.

निळवंडे दुष्काळी भागातील वंचित गावांसाठी नलिका प्रणालीचे संकल्पन व नियोजन निविदा आज ‘सार्वमत’ या वर्तमानपत्रात आज (दि.११ नोव्हेंबर २०२५) प्रसिद्ध झाली आहे.त्यासाठी आ.आशुतोष काळे,नाशिक जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता हरीभाऊ गीते,कार्यकारी अभियंता पी.बी.गायसमुद्रे आदींसह अनेक अभियंते,विविध गावचे सरपंच कार्यकर्ते,आदींचे मोठे योगदान लाभले असल्याची माहिती निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे यांनी दिली आहे.

  दरम्यान त्यासाठी बहादरपुर,धोंडेवाडी,बहादराबाद,शहापूर आदी ग्रामपंचायतचे ठराव घेऊन पाठपुरावा सुरू केला होता.त्याचे अंदाजपत्रक ०६ कोटींचे झाले होते.म्हणून अन्य कमी खर्चाचा पर्याय अंजनापूर येथील बंधाऱ्यातून पाणी आणून नदी जोड पर्याय समोर आला होता.तर बहादरपूर पूर्व भागासाठी आधी सिन्नर तालुक्यातील सायाळे येथून पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.त्यासाठी मोठी लोकवर्गणी केली होती.मात्र जिल्हा हद्दीची अडचण आली होती.परिणामी या भागासाठी प्रस्तावित बंदिस्त चारी मधून पाणी आणणे संयुक्तिक ठरणार असल्याचे उघड झाल्याने खोकड माळ चिंचोली गुरव (पूर्व माथा) येथून पाण्याची मागणी केली होती.त्याचा गेली दोन अडीच वर्षे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.त्यासाठी नाशिक येथील जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता हरिभाऊ गीते,नगर येथील कार्यकारी अभियंता पी.बी.गायसमुद्रे,उपअभियंता सौ.पी.एस.खेमनर आदीकडे लेखी पाठपुरावा सुरू ठेवला होता.त्याला कोपरगाव विधानसभेचे आ.आशुतोष काळे याचे मोठे सहाय्य झाले होते.त्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या.
  
    दरम्यान त्या नलिका प्रणालीचे संकल्पन व नियोजन निविदा आज ‘सार्वमत’ या वर्तमानपत्रात आज (दि.११ नोव्हेंबर २०२५) प्रसिद्ध झाली आहे.त्यासाठी आ.आशुतोष काळे,नाशिक जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता हरीभाऊ गीते,कार्यकारी अभियंता पी.बी.गायसमुद्रे आदींसह अनेक अभियंते,विविध गावचे सरपंच कार्यकर्ते,आदींचे मोठे योगदान लाभले असल्याची माहिती निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे यांनी दिली आहे.आगामी दोन महिन्यात या नलिका वितरण प्रणालीचे संकल्पन तयार होऊन कोणते आर्थिकदृष्ट्या संयुक्तिक आहे.ही बाब समोर येणार असून पुढील कार्यवाही सोपी होणार आहे.त्यामुळे या दुष्काळी भगातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close