जलसंपदा विभाग
दुष्काळी पाझर तलाव भरण्यासाठी… ही योजना सुरू !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील नैऋतेकदील दुष्काळी ११ गावांना वरदान ठरणाऱ्या उजनी उर्फ रांजणगाव देशमुख उपसा सिंचन योजनेच्या पाहिल्या टप्प्यातील नादुरस्त रोहित्र आ.आशुतोष काळे यांच्या सहाय्याने सुरळीत केले असून ही योजना जवळके,धोंडेवाडी, बहादराबाद,शहापूर आदी चार गावांतील पाझर तलाव आणि के.टी.वेअर पूर पाण्याने भरण्यास उपयुक्त ठरणार असल्याची माहिती अजित पवार राष्ट्रवादी गटाचे माजी सरपंच द्यानदेव गव्हाणे यांनी दिली आहे.

“जो नेता सत्तेत येतो तो प्रत्येक वेळी उद्घाटने करून आपली निवडणुकीची मतपेटी भरली की पुन्हा त्या गावचा राहत नाही.आताही आगामी काही दिवसात जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुका आल्याने शेतकरी धास्तावले असून निवडणुकांनंतर या योजनेचे भवितव्य काय ? असा सवाल विचारला आहे.त्या ऐवजी वेस पाझर तलाव ते हॉटेल मनोदिप ही नदीजोड लिंक योजना पूर्ण का केली जात नाही ? – वाल्मीक नेहे,कार्यकर्ते,निळवंडे कालवा कृती समिती,नगर- नाशिक.
निळवंडे कालवा कृती समितीच्या न्यायिक व रस्त्यावरील वीस वर्षाच्या संघर्षानंतर तर मंजुरी नंतर ५३ वर्षांनी कालवे पूर्ण होऊन त्याचे पाणी ०७ तालुक्यातील दुष्काळी भागात पोहाचले आहे.मात्र जवळके,धोंडेवाडी,बहादराबाद, शहापूर,पूर्व अंजनापूर आदी गावांतून वाहणाऱ्या नदीचा उगम वेस आणि रांजणगाव देशमुख शिवारात असल्याने अद्याप अडीच वर्षे उलटूनही या गावांना निळवंडे धरणाच्या पूर पाण्याचा (की नेत्यांचा) काक स्पर्श झालेला नाही.त्यामुळे याभागातील शेतकऱ्यांत मोठी नाराजी आहे.मात्र तालुक्यातील नेते निवडणुका आल्या की तात्पुरती मलमपट्टी करून मोठे वीजबिल आणि जलसंपदा विभागाची पाणी पट्टी थकीत ठेऊन आपल्या निवडणुकांचा शिमगा साजरा करण्यासाठी या योजनेचा वापर करताना आढळून येत आहे.

निळवंडे धरणाचे पूर पाणी दुष्काळी भागातील पाझर तलाव भरून थेट गोदावरी नदीपात्रात गेले आहे.मात्र निळवंडे पाण्यासाठी लढा देणाऱ्या प्रसंगी जेलमध्ये जाणाऱ्या,लाठ्याकाठ्या खाणाऱ्या गावांना आणि कार्यकर्त्यांना राजकीय व्यवस्था अद्याप पाणी जाणीवपूर्वक पाणी देत नाही ही घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दुष्काळी भागात उमटली आहे.
या योजनेचे विद्युत रोहित्रातील ऑइल आणि तांब्याच्या तारा वारंवार चोरीस जातात.पण त्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे धाडस संबंधित संस्थाचालक आणि प्रशासन दाखवत तर नाहीच पण यदाकदाचित दाखवले तर शिर्डी पोलिस तपास करत नाही.त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे साधन असून ‘ अडचण नसून खोळंबा ‘ बनली असून आहे.सन -१९९३ साली जवळके,रांजणगाव देशमुख,बहादरपूर,वेस,मनेगाव आदी परिसरातील दुष्काळी शेतकऱ्यांनी व युवा कार्यकर्त्यांनी राजणगाव देशमुख येथे “रास्ता रोको” आंदोलन करून या दुष्काळी शेतकऱ्यांची व्यथा जगाच्या वेशीवर टांगली होती.त्यानंतर सत्तेत शिवसेना भाजपचे युती शासन सत्तेत आल्यावर १९९७ साली या जनतेच्या हाकेला ‘ओ’ देऊन तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.सूर्यभान वहाडणे यांनी युती शासनाकडून ३.९४ कोटी रुपयांची ही योजना मंजूर केली होती.मात्र १९९९ ला मुदतपूर्व निवडणुका होऊन पुन्हा एकदा आघाडी सरकार सत्तेत आल्यावर या दुष्काळी गावांच्या हालास पारावर राहिला नाही.जो नेता सत्तेत येतो तो प्रत्येक वेळी उद्घाटने करून आपली निवडणुकीची मतपेटी भरली की पुन्हा त्या गावचा राहत नाही.आताही आगामी काही दिवसात जिल्हा परिषद निवडणुका आल्याने शेतकरी धास्तावले असून निवडणुकांनंतर या योजनेचे भवितव्य काय ? असा सवाल विचारला आहे.त्या ऐवजी वेस पाझर तलाव ते हॉटेल मनोदिप ही नदीजोड लिंक योजना पूर्ण का केली जात नाही ? असा सवाल निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते वाल्मीक नेहे यांनी विचारला आहे.
निळवंडे धरणाचे पूर पाणी दुष्काळी भागातील पाझर तलाव भरून थेट गोदावरी नदीपात्रात गेले आहे.मात्र निळवंडे पाण्यासाठी लढा देणाऱ्या प्रसंगी जेलमध्ये जाणाऱ्या,लाठ्याकाठ्या खाणाऱ्या गावांना आणि कार्यकर्त्यांना अद्याप पाणी जाणीवपूर्वक दिले जात नाही ही घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दुष्काळी भागात उमटली आहे.मात्र याबाबत दुष्काळी जनतेची मते लाटून सत्तास्थानी बसणाऱ्या नेत्यांनी झोपेचे सोंग घेतल्याने त्यांना याची आठवण राहिली नसल्याची खेदजनक बाब समोर आली आहे.