जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

गोदावरीचे चौथे आवर्तन ठरणार मृगजळ !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव (नानासाहेब जवरे)

   गोदावरी खोऱ्यात डावा व उजवा कालवा खोऱ्यात तीन आवर्तने सोडण्यात येतील अतिरिक्त पाणी बचत झाल्यास चौथे आवर्तन सोडण्याचा विचार करण्यात येईल,अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे यांनी काल राहाता येथे एका कार्यक्रमात बोलताना दिली असताना यावर उलटसुलट चर्चेला उधाण आले असून गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी चौथे आवर्तन द्यावे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.त्यामुळे याचा उहापोह होणे गरजेचे वाटते त्याबाबत हा धांडोळा…

 

माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी निळवंडे कालवा कृती समितीच्या मागणीला दाद देऊन आपली प्रतिष्ठा पणाला लावून पश्चिमेचे पाणी पूर्वेस वळविण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडे आग्रह धरला होता आणि त्यांनी त्याला दाद दिली होती.त्यासाठी त्यांनी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची नाशिक दौऱ्यात घोषणा केली होती आणि पुढे जावून त्याला कृतीची जोड दिली होती.मात्र पुढे महाआघाडी सरकार दोन वर्षात गडगडले आणि तो प्रस्ताव तसाच बासनात गुंडाळला गेला होता.

    राहाता येथे झालेल्या गोदावरी डावा व उजवा कालवां सल्लागार समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे.त्यावेळी अध्यक्षपदावरून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ही घोषणा केली आहे.सदर प्रसंगी खा.भाऊसाहेब वाकचौरे,आ.आशुतोष काळे,आ.हेमंत ओगले,माजी आ.स्नेहलता कोल्हे,समितीचे सदस्य तसेच शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर,नाशिक विभाग मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ,अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने,कार्यकारी अभियंता सोनल शहाणे आदी उपस्थित होते.त्यावर गोदावरी लाभक्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

   याबाबत आमच्या  प्रतिनिधीने याबाबत माहिती घेतली असता त्यात दिसून आले आहे की,”या पूर्वी रब्बी हंगाम हा १५ ऑक्टोबर पासून सुरू होत होता.त्यातून गोदावरी लाभक्षेत्रात रब्बीचे दोन व उन्हाळी दोन असे चार आवर्तने दिली जात होती.वर्तमानात बिगर सिंचन वाढल्याची आवई उठवली जावून सांगितले जात असले तरी शेती सिंचनाच्या आवर्तनासोबत ते दिले तर पाण्याचा अपव्यय टाळतो हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे तरीही त्याचा बागुलबुवा होत आहे.विशेष म्हणजे या वर्षी ऑक्टोबर नंतर पाऊस पडला होता त्यामुळे एक आवर्तनाची बचत झाली आहे.तरीही जलसंपदा विभागाने आणखी एक आवर्तन देण्यास टाळाटाळ केली याचे आक्रित मानले जात आहे.त्यामुळे जलसंपदा मंत्री जिल्ह्यातील असो वा जिल्ह्याबाहेरील त्यात फारसा काही फरक पडत नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

  

मुख्यमंत्री यांनी पश्चिमेचे पाणी मराठवाड्यात नेणार ही घोषणा करूनही जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी तोंड उघडले नाही.नगर नाशिक मधील आमदार संघटित दिसत नाही या उलट मराठवाडा विभागातील आमदार संघटित दिसत असल्याने नगर जिल्ह्याला फार काही हाती लागेल अशी शक्यता दिसत नाही हे वाचायला कटू वाटेल पण वास्तव आहे.

दरम्यान पूर्वी शेवटचे पिण्याचे पाणी हे आगामी ३० जून ही तारीख गृहीत धरून राखून ठेवले जात होते.आता ती तारीख सदर विभागाने आगामी १५ जुलै पासून गृहीत धरली आहे.सदर पावसाचा हंगाम सातत्याने बदलत असून तो आता जलसंपदा विभागाने आता मान्य केला असल्याचे मानले जात आहे.व त्याची मुदत आगामी एक महिना वाढवून ती ३१ जुलै पर्यंत वाढवली आहे.त्यामुळे शेवटचे आवर्तन जलसंपदा विभागाला जून मध्ये सुध्दा देता येऊ शकते असा जलतज्ञांचा व जाणकारांचा दावा आहे.त्यामुळे तीन आवर्तनाची बोळवण बंद करावी व जास्तीचे पाणी हे उद्योजकांना आणि संभाजीनगर येथील मद्य उद्योजकांना देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या वाट्याला येऊ द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.आता पुढे जावून हा हंगाम आणखी पुढे १५ दिवस ढकलावा अशी मागणी अनेक अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे वारंवार केली आहे मात्र सरकार त्याकडे पाहायला तयार नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी फार अपेक्षा न ठेवलेल्या बऱ्या हे उत्तम.

निळवंडे धरणाचे लाभक्षेत्रात १८२ आणि अकोले तालुक्यातील उच्च कालव्याच्या लाभक्षेत्रात आणखी गावांची भर पडली आहे तर लाभक्षेत्र ७८ हजार ८७८ हेक्टर अशा विक्रमी पातळीवर जावून पोहचले आहे.आणि पाणी केवळ ८.३२ टी.एम.सी आहे.त्यामुळे अर्थातच हे पाणी दुष्काळी गावांना आठमाही सुद्धा पुरेसे नाही हे स्पष्ट आहे.मात्र या धरणाचे पाणी वाढविण्यासाठी हिवरानाला आणि साम्रदनाला याचे पावणेदोन टी.एम.सी.पाणी वाढवता येऊ शकते यावर कोणीही नेता तोंड उघडणार नाही.

   जलसंपदा मंत्री पद नगर जिल्ह्यात मिळाले असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.आता तरी पश्चिम घाट माथ्याचे पाणी नगर नाशिक जिल्ह्यातला मिळणार का असा सवाल  निर्माण झाला आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत आपण पश्चिमेचे पाणी मराठवाड्यात देणार याची मोठे ढोल बडवून घोषणा केली आहे.त्यावर नगर-नाशिक जिल्ह्यातील एकाही आमदाराने ‘च ‘ कार शब्द काढलेला नाही हे विशेष ! (आणि काढू शकणार नाही) निळवंडे धरणाचे लाभक्षेत्रात १८२ आणि अकोले तालुक्यातील उच्च कालव्याच्या लाभक्षेत्रात आणखी गावांची भर पडली आहे तर लाभक्षेत्र ७८ हजार ८७८ हेक्टर अशा विक्रमी पातळीवर जावून पोहचले आहे.आणि पाणी केवळ ८.३२ टी.एम.सी आहे.त्यामुळे अर्थातच हे पाणी दुष्काळी गावांना आठमाही सुद्धा पुरेसे नाही हे स्पष्ट आहे.मात्र या धरणाचे पाणी वाढविण्यासाठी हिवरा नाला आणि साम्रदनाला याचे पावणेदोन टी.एम.सी.पाणी वाढवता येऊ शकते मात्र त्यावर कोणालाही बोलायला वेळ नाही हे विशेष.केवळ निळवंडे धरणाचे पाणी मी आणले आणि मी ” जलनायक ‘आणि मीच ‘जलदुत ‘ यावर उठसूट पोरखेळ सुरू आहे.यातून ही मंडळी बाहेर पडली तर दुष्काळी जनतेचे कल्याण होऊ शकते मात्र ते संभवत नाही कारण यांचे मते मिळविण्याची दुकाने बंद पाडण्याचा धोका आहे.

   महाआघाडीच्या काळात जलसंपदा मंत्री पद हे जयंत पाटील यांना मिळाले होते त्यावेळी माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी निळवंडे कालवा कृती समितीच्या मागणीला दाद देऊन आपली प्रतिष्ठा पणाला लावून पश्चिमेचे पाणी पूर्वेस वळविण्यासाठी त्यांना आग्रह धरला होता आणि त्यांनी त्याला दाद दिली होती.त्यासाठी त्यांनी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची नाशिक दौऱ्यात घोषणा केली होती आणि पुढे जावून त्याला कृतीची जोड दिली होती.मात्र पुढे महा आघाडी सरकार दोन वर्षात गडगडले आणि ते प्राधिकरण केवळ कागदावर उरले होते.आता ही संधी नगर जिल्ह्याला आली आहे.मात्र त्याचे मंत्री राधाकृष्ण विखे किती सोने करणार हा खरा प्रश्न आहे.मात्र मागील त्यांचा इतिहास बघितला तर शेतकऱ्यांनी फार अपेक्षा न ठेवलेल्या बऱ्या ठरतील असे एकूण वातावरण आहे.कारण विखे आणि जामनेरचे आ.गिरीश महाजन आदींना मंत्री पद मिळणार नव्हते मात्र अखेरच्या क्षणी अमित शहा यांनी हस्तक्षेप केला आणि पुढचा अनर्थ टाळला आसल्याचे मानले जात आहे.मात्र त्यातून त्यांना दोघांना सदर जलसंपदा मंत्री पद अर्धे-अर्धे वाटून घ्यावे लावले असल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्यातच नगर नाशिक मधील आमदार संघटित दिसत नाही या उलट मराठवाडा विभागातील आमदार संघटित दिसत असल्याने नगर जिल्ह्याला फार काही हाती लागेल अशी शक्यता दिसत नाही हे वाचायला कटू वाटेल पण वास्तव आहे.तरीही मंत्री विखे या जिल्ह्यातील शेती पाण्याच्या समस्या किती तळमळीने मांडणार आणि सोडविणार याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

मो.9423 43 9946.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close