जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

कोपरगावच्या भूमिपुत्रांच्या पुस्तकाचे परदेशात उद्घाटन !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगावचे भूमिपुत्र असलेले भूमिपुत्र कर्नल घनश्याम उगले लिखित,टेरे पॉलीसि सेंटर तर्फे प्रकाशित “सैरनी नदीचे पुनरुज्जीवन” या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच स्टोकहोम(स्वीडन)येथे जागतिक जल सप्ताहानिमित्त मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.बाल्टिक वाॅटर कॉन्फरन्समध्ये स्टोकहोम ते हेलसिंकी दरम्यान गॅब्रीएला क्रुझवर झाले. दि.२६ ऑगस्ट रोजी पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले.

“केंद्र शासनाच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत दोन अडीच वर्षे काम करण्याची संधी मिळाली होती. एनजीओने याबाबत पुढाकार घेवून संशोधन सादर करण्यास सांगितले होते.तेच पुस्तक स्वरूपांत प्रकाशित झाले आहे”-ले.कर्नल घनश्याम उगले.

   स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट 1991 पासून दरवर्षी जागतिक जल सप्ताहाचे आयोजन करते.2024 चा कार्यक्रम 25-29 ऑगस्ट दरम्यान स्टॉकहोम वॉटरफ्रंट काँग्रेस सेंटर येथे संपन्न झाला आहे.जागतिक जल सप्ताह ही एक प्रमुख परिषद आहे जी जागतिक जल समस्यांवर लक्ष केंद्रित करते आणि निर्णय घेणारे, व्यावसायिक नेते,शहर नियोजक,कार्यकर्ते आणि संशोधकांसह जगभरातील लोकांच्या विविध गटांना एकत्र आणते.जागतिक जल सप्ताह २०२४ हा शांतता आणि सुरक्षिततेसाठी जल सहकार्यावर केंद्रित आहे.अनेक देशातील सुमारे २० शास्रज्ञासह प्रकाशन करण्यात आले.सदरचे पुस्तक हेलसिंकी विद्यापीठाच्या ग्रंथालयात सादर करण्यात आले.

याप्रसंगी आयएएएम स्वीडनचे महासंचालक आशुतोष तिवारी,कॅलीफोर्निया विद्यापीठाचे चेर मिंग टॅन,पॉलीसी आणि गव्हर्नर्स आय आय डब्ल्यू एशियाचे अध्यक्ष आर.के.तिवारी,एशिया पासिफिक असोसियेशनचे कार्यकारी संचालक ईको ये,सैरनी नदीचे पुनरुज्जीवन प्रकल्पाचे प्रणेते व जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंह,टेरे पॉलीसी सेंटरचे संस्थापक डॉ.विनिता आपटे आदि उपस्थित होते.

सदर प्रसंगी डॉ.सिंह यावेळी म्हणाले,”नदी पुनरुज्जीवनाचा हा प्रवास दहा ते बारा वर्षापूर्वी सुरु झाला होता. आता हि जनतेची एक चळवळ झाली आहे.या चळवळीच्या माध्यमातून शेकडो गावामधून हजारो लोक आता या सार्वजनिक सहभागाद्वारे जल स्वातंत्र व शाश्वतता या उद्दिष्टाला प्राधान्य देण्यासाठी एकत्र येत आहेत.

डॉ.आपटे म्हणाल्या,”मानवी संस्कुतीचा मुळचा आधार नद्या आहेत. ज्या ताजे पाणी पुरवतात.सर्व प्राचीन आणि सध्याच्या संस्कुतीचा जन्म नद्यांच्या किनारीच झाला आहे.उगले यांनी पुनरुज्जीवनचा हा प्रवास खूपच बारकाईने आणि संशोधनासह मांडला आहे.

दरम्यान कोपरगाव येथील ले.कर्नल घनश्याम उगले यांचे प्राथमिक शिक्षण येथील श्रीमान गोकुळचंद विद्यालयात झाले आहे.श्रीमान गोकुळचंद विद्यालायाचे निवृत्त शिक्षक कै.चंद्रकांत  उगले यांचे ते चिरंजीव आहे.

   “केंद्र शासनाच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत दोन अडीच वर्षे काम करण्याची संधी मिळाली होती. एनजीओने याबाबत पुढाकार घेवून संशोधन सादर करण्यास सांगितले होते.तेच पुस्तक स्वरूपांत प्रकाशित झाले आहे”- ले.कर्नल घनश्याम उगले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close