जलसंपदा विभाग
गोदावरी कालव्यात बसवा ०३ हजारांत डोंगळा,अधिकाऱ्यांचा अजब फतवा !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
“नाशिक जलसंपदा विभागाच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने एक अजब फतवा काढला असून त्यात त्यांनी,”ज्या शेतकऱ्यांना गोदावरी कालव्यांवर डोंगळा (कालव्याच्या भराव्यात पाणी चोरीसाठीं पाईप टाकून पाणी चोरी करण्याचा आधुनिक प्रकार) टाकायचा असेल त्यांनी प्रति डोंगळा ०३ हजार रुपये जमा करावे;त्यांनाच तो टाकून दिला जाईल” असे गुप्त आवाहन केले असून त्यामुळे आधीच धोक्यात आलेली गोदावरी कालव्यांची सिंचन व्यवस्था धोक्यात येणार असल्याची माहिती जाणकारांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सह्याद्रीच्या घाटमाथ्याच्या पूर्वेस साधारण शंभर कि.मी.पूर्वेस चाळीसगाव पासून ते दक्षिणेस अकलूज पर्यंत असा पर्जन्य छायेचा पट्टा असून याभागात सातत्याने दुष्काळ पडत होता.त्यामुळे शेतकऱ्यांची हातातोंडाची गाठ पडत नव्हती.परिणामी या भागात हजारो शेतकऱ्यांचे भूकबळी जात होते.त्यावर उपाय म्हणून इंग्रज सरकारने एक तज्ज्ञांची समिती नेमून या भागात सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते.त्यातून नाशिक जिल्ह्यात दारणा धरण,नगर जिल्ह्यात म्हाळादेवीं(जे पुढे राजकारणाचा बळी गेले)भंडारदरा धरण,पुण्यात नीरा,खडक वासला आदी धरणे बांधून या दुष्काळी पट्ट्यात सिंचन व्यवस्था केली होती.परिणामी या भागात सन-१९१० च्या सुमारास धरणाबरोबर कालव्यांची निर्मिती झाली व लुटण्यास आलेल्या इंग्रजामुळे सुब्बत्ता आली होती.परिणामी गोदावरी कालव्यांच्या लाभ क्षेत्राखालील भागात सुबत्ता आली होती.आज ११२ वर्षांनंतर काय चित्र निर्माण झाले आहे.तर देश १९४७ साली स्वतंत्र झाल्यानंतर देशात सत्तेवर आलेल्या काळ्या इंग्रजांनी गेली ७७ वर्षात शेती सिंचनासाठी निर्माण झालेले पाणी आपल्या समर्थक उद्योग आणि फुगलेल्या शहरांना वाटून दिले आहे.उरलेसुरले पाणी आपल्या नातेवाईकांच्या उपसा सिंचनाना खिरापतीसारखे दिले आहे.परिणामी आज शेती सिंचनासाठी निर्माण झालेले पाणी सन-२०४१ पर्यंत शिल्लक राहिलेले नाही.हे वास्तव आमच्या प्रतिनिधीने सप्रमाण सन-२०११ साली ‘दै.गावकरी’त प्रसिद्ध केले होते.मात्र आजही येथील नेते,अधिकारी आणि कार्यकर्ते,शेतकऱ्यांना उमजत नाही हे आश्चर्य मानले जात आहे.आजही प्रस्थापित नेते शेती पिके उध्वस्त झाल्यावर आवर्तन देत असून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.वर्तमानात कालव्यातून १०० लिटर सोडलेले पाणी शेतात केवळ ३० लिटर येत आहे.धरणातील पाण्याच्या तब्बल ७० पाणी अपव्यय दाखवून अधिकारी मोकळे होत आहे.वास्तविक हे पाणी अधिकारी आणि राजकारणी राजरोस उद्योग आणि अवैध डोंगळ्याना विकत असून त्यातून कोटी रुपयांची माया गोळा करत आहे.मात्र पैसे देऊन मते विकत घेतलेले पुढारी डोळ्यावर कातडे ओढून घेत असून त्यात गोदावरी लाभक्षेत्राची होळी झाली आहे.
दरम्यान वर्तमानात असाच धक्कादायक प्रकार उघड झाला असून यात एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी कनिष्ठ अधिकाऱ्यांना एक फतवा जारी करून त्यात,”दि.१० मे पर्यंत ज्या शेतकऱ्यांस गोदावरी कालव्यात डोंगळा टाकावयाचा आहे त्याने प्रति डोंगळा (कालव्याच्या भराव्यात पाणी चोरीसाठीं पाईप टाकून पाणी चोरी करण्याचा आधुनिक प्रकार) ०३ हजार रुपये जमा करावे” असा फतवा जरी करून मोठी कमाई केली आहे.त्या मुळें आधीच या चोरीत समाविष्ट असलेल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना नवे प्रोत्साहन मिळाले असून त्यांनी मोठ्या प्रमाणावर डोंगळे टाकले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे आधीच या हजारो डोंगळ्यांनी उध्वस्त झालेले गोदावरी कालवे आणखी उध्वस्त होणार आहे.परिणामी कालवाफुटीचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.याबाबत प्रस्थापित नेते आणि त्यांचे समर्थक ‘च’कार शब्द काढायला तयार असल्याचे दिसत नाही.त्यामुळे अधिकाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे.आजपर्यंत महिला लाच आणि भ्रष्टाचारात सामील होत नाही या समजाला मोठा छेद गेला आहे.या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीने चौकशीची मागणी केली आहे.