जलसंपदा विभाग
दुष्काळ हटविण्यासाठी छोट्या नद्याजोड मार्ग गरजेचा -मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातील मौजे वेस येथील बंधाऱ्यातून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याकरिता धोंडेवाडी,जवळके,शहापूर व बहादराबाद या गावांचे पाझर तलाव भरणेसाठी व दुष्काळ हटविण्यासाठी छोट्या नद्या नाले एकमेकांना जोडावे अशी महत्वपूर्ण मागणी आ.आशुतोष काळे यांनी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे दिलेल्या पत्रात नुकतीच केली आहे.
वर्तमानात मोठा दुष्काळ आहे.शेतकऱ्यांना रब्बी पिकांना व पिण्यास पाणी शिल्लक नाही.चारा पिकांना पाणी उपलब्ध नाही.त्यामुळे आत्ताच माय लेकराला धरेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.दुसऱ्या आवर्तनात किमान मनेगाव,वेस-सोयगाव,अंजनापूर,बहादरपूर,जवळके,धोंडेवाडी,शहापूर,बहादराबाद,शहापूरआदीसह पुंच्छ भागातील वाकडी,चितळी,धनगरवाडी,दिघी आदी तलावात निळवंडेचे चाचणीचे पाणी सोडलेले नाही.अद्याप या लढ्यात निळवंडे कालवा कृती समितीच्या माध्यमातून योगदान देणारी गावे व कार्यकर्ते,शेतकरी पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहे.त्यामुळे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची वेळीच दखल घेऊन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निळवंडे डावा कालवा संपूर्ण लाभक्षेत्रातील किमान पाझर तलाव व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून पिण्याच्या पाण्यासाठी व चारा पिकांना वंचित गावांना तातडीने पाणी उपलब्ध करणे व सर्व बंधारे भरे पर्यंत आवर्तन बंद करू नये या परिसरातील वेस-सोयगाव,अंजनापूर,बहादरपूर,जवळके,धोंडेवाडी,शहापूर,बहादराबाद,पुंच्छ भागातील वाकडी,धनगरवाडी आदी पाझर तलावात व के.टी.वेअर मध्ये निळवंडेचे चाचणीचे पाणी सोडणे गरजेचे आहे.मात्र धोंडेवाडी,जवळके,बहादराबाद,शहापूर आदी ठिकाणी निळवंडेचे चाचणीचे पाणी पोहचले नाही.त्यासाठी शक्यता नाही.त्यासाठी वेस पाझर तलावाच्या वायव्येस असलेल्या हॉटेल मनोदीप जवळ ओहळाच्या मार्गे हे पाणी जाऊ शकत असल्याचे बाब जवळके येथील कार्यकर्त्यानी समक्ष भेटीत आ.काळे यांच्या लक्षात आणून दिले आहे.व त्यासाठी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून त्यासाठी आर्थिक तरतूद करून सदर नदी जोड प्रकल्प मार्गी लावावा अशी मागणी नानासाहेब जवरे,सुखदेव थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,बंडू थोरात,दत्तात्रय थोरात,चंद्रकांत थोरात,विश्वनाथ थोरात,जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात,उपसरपंच सुनील थोरात,सदस्य भाऊसाहेब थोरात,मीना विठ्ठल थोरात,इंदूबाई नवनाथ थोरात,वनिता रखमा वाकचौरे,गोरक्षनाथ वाकचौरे,विजय शिंदे,नवनाथ थोरात आदींनी केली आहे.त्याची दखल आ.काळे यांनी घेतली असून त्या संबंधी राज्याच्या जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे कडे केली असून त्याचे कालवा कृती समितीचा कार्यकर्त्यानी स्वागत केले आहे.