नैसर्गिक आपत्ती
कोपरगावातील रस्त्याचा संपर्क तुटला,अन्य रस्त्याचा वापर करा-आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली.कमी वेळेत सुमारे ६ ते ७ इंच पाऊस झाल्याने अनेक ओढे-नाल्याना पूर आल्याने वाहतूक बंद होऊन गावांचा संपर्क तुटला आहे.तालुक्यातील देर्डे-भरवस रस्त्यावर असणाऱ्या नविन पुलाचे काम सूरु असून वेळापूर गावाजवळील-ब्राह्मण नाला येथील पर्यायी सर्व्हिस रोड मुसळधार पावसामुळे दुपारी ०३ वाजेपासून या सर्व्हिस रोडवर पाणी असुन कमी अधिक प्रमाणात २ ते ३ फुट पाणी आहे.त्यामुळें वहानधारकांनी या रस्त्यावरून जाण्याऐवजी पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे यांनी केले आहे.
कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली.कमी वेळेत सुमारे ६ ते ७ इंच पाऊस झाल्याने अनेक ओढे-नाल्याना पूर आल्याने वाहतूक बंद होऊन गावांचा संपर्क तुटला होता.तर सोयाबीनसह बाजरी तत्सम खरीप पिकांत पाणी साचून मोठे नुकसान होत आहे.याशिवाय ऊस,मका,कडवळ,कपाशी,सोयाबीन पिकात मोठे प्रमाणात पाणी साचून आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यातील देर्डे भरवस रस्त्यावर असणारा व आता नविन पुलाचे काम सुरू असणारा वेळापूर गावाजवळील-ब्राह्मण नाला येथील पर्यायी सर्व्हिस रोड मुसळधार पावसामुळे दुपारी ०३ वाजेपासून या सर्व्हिस रोडवर पाणी असुन कमी अधिक प्रमाणात २ ते ३ फुट पाणी आहे.त्या मुळे लासलगाव कडुन शिर्डी कडे तसेच लासलगाव च्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.रस्त्यावरून पाणी वाहत असताना वाहने चालवणे धोकादायक असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे यांनी केले आहे.