जलसंपदा विभाग
दुष्काळी भागातील पाझर तलाव भरून द्या-निळवंडे कालवा समिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
निळवंडे डाव्या कालव्यांची नुकतीच जलसंपदा विभागाने चाचणी केली असून आगामी काळात दुष्काळाची चिन्हे आहे.दरम्यान धरणात पाणी शिल्लक असल्याने सदर कालव्याद्वारे धरणाच्या लाभक्षेत्रातील पाझर तलाव व के.टी.वेअर भरून दयावे अशी महत्वपूर्ण मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते अशोक गांडोळे यांनी केली आहे.
“अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर डोंगराच्या कडेने कालवे गेले आहे.परिणामी आगामी काळात या कालव्यांना पाणी सोडणे जिकरीचे ठरणार आहे.वर्तमान स्थितीत धरणात सुमारे दोन टि.एम.सी.पाणी शिल्लक असताना त्यामुळे दुष्काळी १८२ गावात पाणी पोहचणे अवघड बनले आहे.परिणामस्वरूप या दुष्काळी भागात पाणी सोडणे कठीण बनले आहे.त्यासाठी कालवा कृती समिती पुन्हा एकदा अकोले तालुक्यातील ० ते २८ कि.मी.तील अस्तरीकरण करण्याची सदर मागणी करत आहे”-रंगनाथ गव्हाणे,कार्यकर्ते,निळवंडे कालवा कृती समिती,नगर-नाशिक.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”निळवंडे डाव्या कालव्यांचे काम विक्रांत काले व नानासाहेब जवरे यांनीं निळवंडे कालवा कृती समितीच्या जनहित याचिकेद्वारे व अड्.अजित काळे यांच्या सहकार्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाने जवळपास पूर्ण झाले असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी गत महिन्यात दि.३१ मे २०२३ रोजी दुपारी १२.१० वाजता निळवंडे धरणाच्या कालव्यांचे विधिवत ‘जलपूजन’ केले आहे.त्यासाठी कालवा कृती समिती व लाभक्षेत्रातील दुष्काळी १८२ गावातील शेतकऱ्यांनीं समाधान व्यक्त केले आहे.दरम्यान निळवंडे डाव्या कालव्यांची तळेगाव दिघे आणि कोपरगाव शाखेसह सुमारे १२ दिवसात म्हणजेच दि.११ जून २०२३ पर्यंत पाणी चाचणी राज्यात विक्रमी म्हणजेच सर्वाधिक वेगाने पूर्ण झाली आहे.त्यासाठी जलसंपदा विभागाचे सुमारे ५० अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिन डोळ्यात तेल घालून या कालव्यांवर देखरेख करत होते त्यामुळे ते अभिनंदनास पात्र झाले आहे.त्यासाठी निळवंडे कालवा कृती समिती आपले व त्यांचे अभिनंदन करत आहे.
दरम्यान या पाण्याच्या चाचणीत सर्वात मोठा अडथळा म्हणजे सदर मुख्य कालवा हा अकोले तालुक्यातील डोंगराळ व उंच भागातून जात आहे.त्यामुळे या डोंगराळ भागातील खडकास मोठ्या प्रमाणावर सप असून परिणामस्वरूप त्यातून मोठ्या प्रमाणावर मुरबाड जमिनीत पाणी मूरत आहे.त्यामुळे अकोले तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची घरे,पशुधन,कुक्कुटपालन आदी व्यवसाय व उभी उन्हाळी पिके अडचणीत आले आहे.घर आणि गोठ्यात पाणी घुसले आहे.व उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.परिणामी पुढील भागात पाणी जाणे अवघड बनले होते.आमच्या निळवंडे कालवा कृती समितीने या पूर्वीच सदर मुख्य कालवा हा अस्तरीकरण करावा अशी मागणी वरील संदर्भांव्ये केली होती.व त्यासाठी ०१ हजार ४०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली होती.त्यानुसार आपल्या विभागाने त्यासाठी पाचवी आर्थिक सुधारित प्रशासकीय ०५ हजार १७७ कोटी ३८ लाख रुपयांची मान्यता मंजूर करून घेतली हि समाधानाची बाब आहे.मात्र त्यास आर्थिक तरतूद करून त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.परिणामी आगामी काळात या कालव्यांना पाणी सोडणे जिकरीचे ठरणार आहे.वर्तमान स्थितीत धरणात सुमारे दोन टि.एम.सी.पाणी शिल्लक असताना त्यामुळे दुष्काळी १८२ गावात पाणी पोहचणे अवघड बनले आहे.परिणामस्वरूप या दुष्काळी भागात पाणी सोडणे कठीण बनले आहे.त्यासाठी कालवा कृती समिती पुन्हा एकदा अकोले तालुक्यातील ० ते २८ कि.मी.तील अस्तरीकरण करण्याची सदर मागणी करत आहे.शिवाय सदर कामास नुसते अस्तरीकरण करून उपयोग नाही बऱ्याच ठिकाणी सदर कालवा हा डोंगराच्या कडेने जात आहे.त्या डोंगरास व खडकात मोठ्या प्रमाणावर सप (पाणी जमिनीत झिपरण्यासाठी असलेला सच्छिद्र व पोकळ भाग)आहे.परिणामी मोठ्या प्रमाणावर होणारी सिंचन गळती कमी होणार आहे.त्यामुळे निव्वळ अस्तरीकरण करणे पुरेसे ठरणार नाही त्यासाठी अकोले व संगमनेर तालुक्यात लोखंडी शिस्याचा वापर करून अस्तरीकरण करणे आवश्यक आहे.
“वर्तमानात सदर कालव्यांना पाणी सोडल्यावर सदर पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना देण्यासाठी अद्याप पाईप चाऱ्या जलसंपदा विभागाने निर्माण केलेल्या नाही.त्यामुळे सदर पाणी तात्पुरते लाभक्षेत्रातील नदी,नाले,पाझर तलाव,के.टी.वेअर,बंडीग आदीत संगमनेर तालुक्यापासून खाली सर्वत्र तातडीने सोडण्यासाठी नदी,नाल्याच्या ठिकाणी एस्केप व फाटके बसवणे गरजेचे आहे.त्यासाठी आपण मोठी तरतुद करून सदर काम युद्ध पातळीवर हाती घ्यावे”-विठ्ठलराव देशमुख,जेष्ठ कार्यकर्ते,निळवंडे कालवा कृती समिती.
दरम्यान अद्याप पाईप चाऱ्यांचा उपग्रहीय सर्वेक्षण संबंधिताकडून ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण होणे अभिप्रेत होणे गरजेचे होते.मात्र ते झालेले नाही हि बाब चिंताजनक आहे.त्यासाठी वर्तमानात आपण वरील दोन बाबीसाठी आर्थिक तरतुद करणे गरजेचे आहे.आगामी काळात मुख्य चाऱ्या व पाईप चाऱ्यासाठी आर्थिक तरतूद करून त्याच्या निविदा प्रसिद्ध कराव्या लागणार आहे.
या शिवाय वर्तमानात सदर कालव्यांना पाणी सोडल्यावर सदर पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना देण्यासाठी अद्याप पाईप चाऱ्या जलसंपदा विभागाने निर्माण केलेल्या नाही.त्यामुळे सदर पाणी तात्पुरते लाभक्षेत्रातील नदी,नाले,पाझर तलाव,के.टी.वेअर,बंडीग आदीत संगमनेर तालुक्यापासून खाली सर्वत्र तातडीने सोडण्यासाठी नदी,नाल्याच्या ठिकाणी एस्केप व फाटके बसवणे गरजेचे आहे.त्यासाठी आपण मोठी तरतुद करून सदर काम युद्ध पातळीवर हाती घ्यावे अशी अशोक गांडोळे यांनी शेवटी केली आहे.
सदर प्रसिद्धी पत्रकावर कालवा कृती समितीचे कार्यकर्ते नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उऱ्हे,सचिव कैलास गव्हाणे,रमेश दिघे,उत्तमराव जोंधळे,नामदेव दिघे,पाटीलबा दिघे,तानाजी शिंदे,बाबासाहेब गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,माधव गव्हाणे,कौसर सय्यद,आप्पासाहेब कोल्हे,संदेश देशमुख,दत्तोबा आहेर,गोरक्षनाथ शिंदे,रावसाहेब थोरात ज्ञानदेव हारदे वाल्मिक नेहे बाळासाहेब रहाणे आदींनीं मागणी केली आहे.