जलसंधारण
शेतीला बळ देणारा महत्त्वाकांक्षी जलसंधारण प्रकल्प-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वेस-सोयेगाव साठवण तलाव हा वेस सोयेगाव परिसरातील शेतीला बळ देणारा महत्त्वाकांक्षी जलसंधारण प्रकल्प असून हा बंधारा परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच कोपरगाव तालुक्यातील वेस येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्थापन झाल्यापासून आजवर सत्ता कायमच विरोधकांकडे होती.मात्र पहिल्यांदाच जिल्हा परिषद आपल्याकडे आली.त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवता आल्या.त्यामुळे सार्वजनिक विकासासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्ता आपल्या हातात द्या”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव तालुक्यातील वेस-सोयगाव येथे १0 कोटी रुपये निधीतून होणाऱ्या रूपांतरित साठवण तलावाचे भूमिपूजन आ.काळे यांच्या हस्ते काल मोठ्या उत्साहात व असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

“झगडे फाटा ते तळेगाव दिघे हा रोड अवजड वाहतूक जास्त असल्याने खराब झाला आहे.एवढ्या एकच रस्त्याचे काम बाकी आहे.आचारसंहितेमुळे या रस्त्याचे अंदाजपत्रक पूर्ण होवू शकले नाही.हा संपूर्ण रस्ता सहा ते सात फुट खोल उकरून सिमेंट काँक्रीटचा होणार आहे”-आ.आशुतोष काळे.
सदर प्रसंगी कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,माजी उपाध्यक्ष सचिन रोहमारे,कारखाना संचालक वसंत आभाळे,राहुल रोहमारे,बहादरपुर सरपंच गोपीनाथ रहाणे,माजी सरपंच नेश्वर गव्हाणे,बाबुराव थोरात,प्रभाकर गुंजाळ,बाबासाहेब गुंजाळ,किसन पाडेकर आदिसंह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थिती होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून शासनाच्या जलसंधारण खात्याकडून सुमारे १० कोटी रुपये निधी मंजूर करून आणला.साठवण तलाव प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खोलीकरणाचे काम पूर्ण होवून साठवण तलावाची उंची साधारणपणे दोन मीटरने वाढणार असल्यामुळे साठवण क्षमता वाढणार आहे.यामुळे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी अधिक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असून याचा थेट लाभ शेतकरी वर्गाला मिळणार आहे.मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पावसाचे पाणी साठवून ठेवता येणार आहे.त्यामुळे भूजल पातळीत वाढ होवून त्याचा फायदा शेती सिंचनासाठी होणार असून उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी मदत होणार आहे.विशेषतः सोयगाव व परिसरातील शेतकऱ्यांना या साठवण तलावाचा मोठा फायदा होणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदामंत्री यांच्या माध्यमातून निळवंडे कालव्यांच्या कामाला निधी उपलब्ध करून गती दिल्यामुळे जलदगतीने चाऱ्यांची कामे सुरू असून,काकडी,मल्हारवाडी आणि डांगेवाडी येथे चारी क्रमांक ३ मधून पाणी मिळत आहे.तसेच चारी क्रमांक ४ आणि टेल लाईनचे काम चालू आहे,या तिन्ही चाऱ्यांमधून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होवून संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे.
निळवंडे धरणाचे पाणी येईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत उजनी योजना बंद होऊ देणार नाही असा शब्द नागरीकांना दिला होता.तो शब्द पूर्ण करतांना आजही शहापूर,जवळके आणि धोंडेवाडी या गावांना उजनी योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे.पूर चारीच्या माध्यमातून परिसरातील सर्व बंधारे एकमेकांशी जोडले जाणार आहे.
झगडे फाटा ते तळेगाव दिघे हा रोड अवजड वाहतूक जास्त असल्याने खराब झाला आहे.एवढ्या एकच रस्त्याचे काम बाकी आहे.आचारसंहितेमुळे या रस्त्याचे अंदाजपत्रक पूर्ण होवू शकले नाही.हा संपूर्ण रस्ता सहा ते सात फुट खोल उकरून सिमेंट काँक्रीटचा होणार असल्याचा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.



