जयंती,पुण्यतिथी अभिवादन
डॉ.आंबेडकरांच्या विचारांवर कार्यकर्त्यांनी वाटचाल करावी-आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो,तसा तो शिक्षणाअभावी दुसऱ्याचा गुलाम होतो म्हणून समाजाने शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम समजून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आपले कल्याण करून घ्यावे असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना जगभरातून अभिवादन केले जात आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील चैत्यभूमीवर जात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केले.डॉ.आंबेडकर हे द्रष्टे नेते होते.त्यांनी शेकडो वर्षे गुलामगिरीत जगणाऱ्या वंचितांसाठी यशस्वी लढा दिला.त्याबाबत आज कोपरगाव सह राज्यात अभिवादन करण्यात आले आहे.
डॉ.आंबेडकर याना आज कोपरगाव शहरासह तालुक्यात अभिवादन केले जात आहे.कोपरगाव येथील डॉ.आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आ.काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे,दिनार कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,संदीप पगारे,कृष्णा आढाव,रमेश गवळी,फकीर कुरेशी,अजीज शेख,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष कार्तिक सरदार,सुनील मोकळ,प्रकाश दुशिंग,डॉ.तुषार गलांडे,राहुल देवळालीकर,चंद्रशेखर म्हस्के,सचिन परदेशी,सुनील बोरा,दादासाहेब साबळे,संदीप कपिले,संतोष शेजवळ,रोशन शेजवळ,कैलास मंजुळ,शंकर घोडेराव,आकाश डागा,मनोज कडु,एकनाथ गंगूले,राजेंद्र आभाळे,हारुण शेख,शिवाजी कुऱ्हाडे,प्रदीप कुऱ्हाडे,विलास पाटोळे, महेश कोळपे,दिनेश संत आदी उपस्थित होते.