जयंती,पुण्यतिथी अभिवादन
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची जयंती साजरी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैय्या महाविदयालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री स्व.विलासराव देशमुख यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
“स्व.विलासराव देशमुख हे मराठवाडा भागातील एक मातब्बर राजकीय नेतृत्व होते.त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील जनतेची अतोनात सेवा केली.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. देशमुख यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालित लोकनेते म्हणून ओळख निर्माण केली होती”-अशोक रोहमारे,अध्यक्ष,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी.
स्व.विलासराव दगडोजीराव देशमुख हे मराठी,भारतीय राजकारणी होते. इ.स.१९७४ साली बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव १८ ऑक्टोबर,इ.स.१९९९ ते १६ जानेवारी,इ.स.२००३ व १ नोव्हेंबर, इ.स. २००४ ते ४ डिसेंबर,इ.स.२००८ या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.ते मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.त्यांची जयंती कोपरगावात साजरी करण्यात आली आहे.त्यावेळी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे.
यावेळी संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे,महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस यादव यांच्या समवेत महाविदयालयातील सर्व प्राध्यापक व विदयार्थी उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे म्हणाले की,”स्व.विलासराव देशमुख हे मराठवाडा भागातील एक मातब्बर राजकीय नेतृत्व होते.त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील जनतेची अतोनात सेवा केली.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. देशमुख यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालित लोकनेते म्हणून ओळख निर्माण केली होती.आपल्या महाविदयालयाच्या शैक्षणिक जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.राजकीय परिपक्वता, उत्तम प्रशासकीय कौशल्य व जनसंपर्क या गुणांमुळे ते सदैव सर्वाच्या स्मरणात राहतील.
यावेळी संस्थेचे सचिव अॅड. संजीव कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात स्व.विलासराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला.